महाराष्ट्र जलसंपत्ती नियमन प्राधिकरण (सुधारणा) अधिनियम, २०१६ (सन २०१७ चा महाराष्ट्र अधिनियम क्रमांक ८) अंतर्गत महाराष्ट्र जलसंपत्ती नियमन प्राधिकरणाचे सदस्य (विधी) या पदाच्या नियुक्तीसाठी जाहीर सूचना :-
महाराष्ट्र शासनाने राज्यामधील जलसंपत्तीचे विनियमन करण्याकरीता, जलसंपत्तीचे प्रमाणित, समन्याय व टिकाऊ व्यवस्थापन, वाटप व वापर सुकर करण्याकरिता आणि कृषि, औद्योगिक, पिण्याच्या व इतर प्रयोजनांसाठी वापरावयाच्या पाण्याचे दर निश्चित करण्याकरिता महाराष्ट्र जलसंपत्ती नियमन प्राधिकरण अधिनियम, २००५ करण्यात आला आहे.
खालील सही करणाऱ्यांकडून महाराष्ट्र जलसंपत्ती नियमन प्राधिकरण, मुंबई येथे सदस्य (विधी) या पदावर निवड करण्यासाठी निवड समितीच्या वतीने सोमवार, दि. १७ मार्च, २०२५ रोजी सायंकाळी ५.०० वाजेपर्यंत किंवा त्यापूर्वी नामनिर्देशने मागविण्यात येत आहेत. याबाबत महाराष्ट्र जलसंपत्ती नियमन प्राधिकरण (सुधारणा) अधिनियम, २०१६ (सन २०१७ चा महाराष्ट्र अधिनियम क्रमांक ८) अंतर्गत सदर पदासाठी पात्रता, सेवाशर्ती इत्यादी नामनिर्देशनासोबत द्यावयाची आहे.
PDF जाहिरात | येथे क्लिक करा |
अर्जाचा नमुना | येथे क्लिक करा |