शिपाई,चालक व इतर पदांसाठी महाराष्ट्र सहकारी बँकेमध्ये 10 वी पासवर भरती | MSC Bank Bharti 2025

MSC Bank Bharti 2025 : दि महाराष्ट्र स्टेट को-ऑपरेटिव्ह बँक मर्यादित अंतर्गत विविध पदांसाठी भरतीची नवीन जाहिरात प्रकाशित करण्यात आलेली आहे या भरतीमध्ये शिपाई, टायपिस्ट, कनिष्ठ अधिकारी, सहाय्यक, ड्रायव्हर इत्यादी पदाचा समावेश राहणार आहे. या पदभरतीसाठी इच्छुक तसेच पात्र उमेदवाराला ऑनलाईन पद्धतीने अर्ज सादर करायचे असून या अर्ज ची लिंक खाली त्या लिंक वरून तुम्ही 06 ऑगस्ट 2025 पूर्वी ऑनलाईन अर्ज सादर करू शकता.

व्हाट्सअप ग्रुप जॉईन व्हा
टेलिग्राम ग्रुप जॉईन व्हा

पदांचा तपशील

  1. शिकाऊ कनिष्ठ अधिकारी – 44 जागा
  2. शिकाऊ सहाय्यक – 50 जागा
  3. शिकाऊ टायपिस्ट – 9 जागा
  4. शिकाऊ ड्रायव्हर – 06 जागा
  5. शिकाऊ शिपाई – 58 जागा

शैक्षणिक पात्रता व इतर निकष

सर्व प्रकारच्या पदाची शैक्षणिक पात्रता जाहिरातीमध्ये त्या पदा समोर दर्शवण्यात आलेली आहे. कमीत कमी दहावी पास उमेदवार या ठिकाणी अर्ज करू शकणार असून उमेदवारांनी अर्ज करण्या अगोदर आपले शैक्षणिक पात्रता पाहून त्यानुसारच पदाची निवड करावी. उमेदवाराचे वय 18 ते 30 वर्ष दरम्यान असावे 01 जून 2025 रोजी ग्राह्य धरण्यात येईल या पदभरतीसाठी कोणत्याही प्रकारच्या अनुभवाची आवश्यकता नाही.

अर्ज पद्धती

उमेदवाराने सविस्तर जाहिरात वाचून ऑनलाइन पद्धतीने अर्ज सादर करायचा आहे 17 जुलै 2025 पासून 06 ऑगस्ट 2025 पर्यंत ऑनलाईन पद्धतीने तुम्ही अर्ज सादर करू शकणार आहात. ऑनलाइन अर्जाची लिंक खाली दिलेली आहे त्यावर जाऊन सविस्तर माहिती घेऊ शकता.

अर्जाचे शुल्क

पदानुसार सर्व प्रवर्गासाठी अर्जाचे शुल्क वेगवेगळे असून पदानुसार उमेदवारांनी जाहिरातीमध्ये दिलेले शुल्क भरणे आवश्यक असेल हे शुल्क ऑनलाईन पद्धतीने भरायचे असून यासाठी तुम्ही यूपीआय, डेबिट कार्ड, क्रेडिट कार्डचा वापर करू शकता.

व्हाट्सअप ग्रुप जॉईन व्हा
टेलिग्राम ग्रुप जॉईन व्हा

आवश्यक कागदपत्रे (MSC Bank Recruitment 2025)

  • अलीकडच्या काळातील पासपोर्ट साईज फोटो
  • सर्व वर्षाचे प्रमाणपत्र व गुणपत्रक
  • आधार कार्ड
  • जन्मतारखेचा पुरावा

निवडीचे निकष

उमेदवारांची निवड ऑनलाईन परीक्षेद्वारे होणार असून मुंबई, पुणे, नागपूर, नाशिक, छत्रपती संभाजी नगर, नांदेड आणि कोल्हापूर या ठिकाणी ही परीक्षा घेतली जाणार आहे उमेदवाराला ताळमेळ साधता येईल अशा ठिकाणी परीक्षा केंद्र निवडायचे आहेत.

पगार (MSC Bank Bharti 2025)

या पद भरती मध्ये निवड झालेल्या उमेदवाराला किमान 20000 रुपये व जास्तीत जास्त 30000 रुपये एवढे मासिक वेतन दिले जाणार आहे.

तुम्ही सुद्धा या पदभरतीसाठी इच्छुक असाल तसेच पात्र असाल तर अर्ज करण्या अगोदर संपूर्ण जाहिरात व्यवस्थितरित्या वाचावी त्या पदासमोर दिलेली आवश्यकता धारण करत असल्यास उमेदवाराने खालील लिंक करून ऑनलाईन अर्ज सादर करावा जाहिरातीमध्ये दिलेल्या शुल्क व्यतिरिक्त कोणतेही शुल्क उमेदवाराने देऊ नये तसेच फसवणुकीपासून सावध राहावे.

PDF जाहिरातयेथे क्लिक करा
ऑनलाईन अर्जयेथे क्लिक करा