Aaykar Vibhag Bharti 2024 : आयकर विभागामध्ये दहावी पास वर भरतीची जाहिरात प्रकाशित झाली असून यासाठी अर्जदाराने 22 सप्टेंबर 2024 पर्यंत ऑनलाईन पद्धतीने अर्ज सादर करायचे आहेत.
इन्कम टॅक्स विभागामार्फत नोकरीची चांगली संधी चालून आली असून इच्छुक उमेदवाराने खाली दिलेली जाहिरात वाचून, खालीच दिलेल्या लिंकवरून ऑनलाईन अर्ज सादर करावेत.
◼️पदांचा तपशील : कॅन्टीन अटेंडंट – 25 जागा
◼️शैक्षणिक पात्रता : मान्यताप्राप्त बोर्डातून कमीत कमी दहावी उत्तीर्ण अथवा समकक्ष परीक्षा उत्तीर्ण असणे आवश्यक.
◼️वयोमर्यादा : अर्जदाराचे वय 22 नोव्हेंबर 2024 रोजी 18 ते 25 पर्यंत असावे. सरकारी नोकरदारास 40 वर्षापर्यंत वयोमर्यादामध्ये शिथिलता ठेवण्यात आलेली आहे.
◼️अर्ज सादर करण्याचा कालावधी : इच्छुक तसेच पात्र उमेदवाराने ऑनलाईन पद्धतीने अर्ज 08 सप्टेंबर 2024 पासून 22 सप्टेंबर 2024 पर्यंत सादर करायचा आहे.
◼️अर्जाचे शुल्क : या भरती प्रक्रियेसाठी कोणतेही अर्ज शुल्क ठेवण्यात आलेले नाही.
◼️अर्ज कसा करावा : उमेदवाराने ऑनलाइन अर्ज करण्यासाठी खालील लिंक वर जावे तिथे गेल्यानंतर नोंदणी करून घ्यावी नोंदणी झाल्यानंतर विचारलेली माहिती सविस्तर व अचूक भरून अर्ज सादर करावा, आवश्यक असलेले सर्व कागदपत्रे अर्जासोबत जोडणे बंधनकारक असेल.
◼️निवड प्रक्रिया : प्राप्त अर्जाची पडताळणी केल्यानंतर पात्र उमेदवारांची लेखी परीक्षा घेण्यात येईल व लेखी परीक्षा मध्ये पास झालेल्या तसेच सर्वाधिक गुण मिळवलेल्या उमेदवारांना पुढील प्रक्रियेसाठी बोलवण्यात येईल.
◼️लेखी परीक्षेची तारीख : लेखी परीक्षा 06 ऑक्टोबर 2024 रोजी 11 ते 01 वाजे दरम्यान घेण्यात येईल, इतर सविस्तर माहिती उमेदवारांनी नमूद केलेले ई-मेल आयडीवर देण्यात येईल.
◼️उमेदवारांसाठी महत्त्वाच्या सूचना
- उमेदवाराने अर्ज सादर करण्याअगोदर व्यवस्थित रित्या जाहिरात वाचावी व त्यानंतरच अर्ज सादर कराव.
- एकापेक्षा अधिक अर्ज सादर केल्यास त्या अर्जाची निवड केल्या जाणार नाही.
- पदभरती मध्ये बदल करण्याचा पदाच्या संख्येत बदल करण्याचा तसेच पदभरती रद्द करण्याचा अधिकार आयकर विभागाने राखून ठेवलेला आहे.
- मागासवर्गीय प्रवर्गातून अर्ज करणाऱ्या उमेदवाराने जातीचा दाखला जोडणे बंधनकारक असेल.
तुम्ही सुद्धा या पद्धतीसाठी इच्छुक तसेच पात्र असाल तर खालील लिंक वरून मूळ जाहिरात डाऊनलोड करा तसेच ऑनलाईन पद्धतीने खालील लिंक वरून सादर करा.
मूळ जाहिरात : डाऊनलोड करा
ऑनलाईन अर्ज करण्यासाठी : येथे क्लिक करा
👇👇या महिन्यातील लेटेस्ट जॉब्स👇👇
युनियन बँक ऑफ इंडिया मध्ये 500 जागांसाठी मेगा भरती; लगेचच अर्ज करा | Union Bank Recruitment