CIDCO Bharti 2024 : सरकारी नोकरी शोधणाऱ्या उमेदवारांसाठी मोठी सुवर्णसंधी चालून आलेली आहे, शहर आणि औद्योगिक विकास महामंडळामध्ये विविध पदांसाठी भरतीची नवीन जाहिरात प्रकाशित करण्यात आलेली आहे.
यासाठी इच्छुक व पात्र उमेदवारांनी सविस्तर जाहिरात वाचून अर्ज ऑफलाईन पद्धतीने आवश्यक त्या सर्व कागदपत्रांसह लवकरात लवकर अर्ज सादर करायचे आहेत. इच्छुक व पात्र उमेदवाराने या संधीचा फायदा घ्यावा.सिडको मध्ये हि भरती जाहीर झाली असून पदांच्या तपशीलसह सविस्तर माहिती खाली दिलेली आहे.
City and Industrial Development Corporation has published a new recruitment advertisement for various posts. For this, the interested and eligible candidates should read the detailed advertisement and submit the application online as soon as possible along with all the required documents. |
◾भरतीचा विभाग : हि नोकरी शहर आणि औद्योगिक विकास महामंडळामध्ये निघाली आहे,विविध पदांसाठी भरतीची जाहिरात प्रकाशित करण्यात आली आहे.
◾भरतीचा प्रकार : कायमस्वरूपी सरकारी नोकरी
◾पदांचे नाव : सहाय्यक विकास अधिकारी (सामान्य), क्षेत्राधिकारी (सामान्य)
◾शैक्षणिक पात्रता : पदानुसार शैक्षणिक पात्रता असून उमेदवाराने जाहिरात वाचून अर्ज सादर करावा.
◾अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाईन पद्धतीने खाली दिलेल्या लिंकवरून अर्ज सादर करू शकणार आहेत.
◾पदांचे नाव व आवश्यक अर्हता
- सहाय्यक विकास अधिकारी (सामान्य) – 24 जागा
- क्षेत्राधिकारी (सामान्य) – 05 जागा
1] पदानुसार वेगवेगळी पात्रता दर्शविण्यात आलेली आहे.
2] संबंधित पदासाठी जाहिरातीमध्ये दिल्याप्रमाणे अनुभव असणे आवश्यक आहे.
3] निवड झालेल्या उमेदवाराला दरमहा 41,800 – 1,77,500 पगार देण्यात येईल
◾नोकरीचे ठिकाण : नवी मुंबई व इतर
◾वयोमर्यादा : कमीत कमी 18 वर्ष व जास्तीत जास्त 33 वर्षे (वयोमर्यादेची शिथिलतेसाठी मूळ जाहिरात वाचावी)
◾अर्ज करण्याची शेवटची तारीख : उपलब्ध नाही.
◾निवड प्रक्रिया : संगणक परीक्षेद्वारे निवड केल्या जाईल.
◾अर्जाचे शुल्क : जाहिरात वाचावी.
PDF जाहिरात | येथे क्लिक करा |
ऑनलाईन अर्ज | येथे क्लिक करा |
◾अधिकृत संकेतस्थळ : https://cidco.maharashtra.gov.in/
उमेदवारांसाठी महत्त्वाच्या सूचना
◾पात्र उमेदवारांनी सहाय्यक विकास अधिकारी (सामान्य) व क्षेत्राधिकारी (सामान्य) या पदांच्या सरळसेवा भरतीसाठी https://ibpsonline.ibps.in/cidcogjul24/ या संकेतस्थळावर दि. 12.12.2024 पासून दि.11.01.2025 पर्यंत ऑनलाईन अर्ज भरावेत.
◾स्पर्धात्मक ऑनलाईन परीक्षा स्थगित वा रद्द करणे, परीक्षेचे स्वरूप, तारीख व ठिकाणात बदल करणे, पदसंख्या, अनुशेष व आरक्षण यात वाढ किंवा घट करण्याचे अंतिम अधिकार महामंडळास राहतील. वर दर्शविण्यात आलेल्या समांतर आरक्षणाचा पात्र उमेदवार प्राप्त न झाल्यास सामाजिक आरक्षणाच्या त्याच राखीव प्रवर्गातील इतर पात्र उमेदवारांचा नियमानुसार विचार केला जाईल.
◾भरती प्रक्रिये संदर्भातील तक्रारींवर निर्णय घेण्याचा अंतिम अधिकार सिडको व्यवस्थापनाकडे राहील, याबाबत कोणत्याही पत्रव्यवहाराची दखल घेतली जाणार नाही. 4) ज्या उमेदवारांनी यापूर्वी त्यांचे नाव रोजगार व स्वयंरोजगार मार्गदर्शन केंद्राकडे सेवायोजन कार्यालय / समाज कल्याण / आदिवासी विकास प्रकल्प अधिकारी / जिल्हा सैनिक बोर्ड अपंग कल्याण कार्यालय इ. कार्यालयात नोंदविलेले आहे, अशा उमेदवारांनादेखील परीक्षेसाठी स्वतंत्ररित्या ऑनलाईन अर्ज करणे आवश्यक राहील.
◾सदर पदभरतीसाठी निव्वळ ऑनलाईन पद्धतीने अर्ज स्विकारले जातील, उमेदवारांचे अर्ज ऑनलाईन (Online) पध्दतीने स्विकारण्यात येणार असल्याने अर्ज करतांना शैक्षणिक कागदपत्रे, अन्य प्रमाणपत्रे जोडणे आवश्यक नाही. तथापि ऑनलाईन अर्जामध्ये उमेदवाराने त्यांच्या पात्रतेनुसार काळजीपूर्वक संपूर्ण व खरी माहिती भरणे आवश्यक आहे.
◾ऑनलाईन पध्दतीने अर्ज भरतांना काही चुका झाल्यास किंवा त्रुटी राहील्यास व त्यामुळे भरतीच्या कोणत्याही टप्यावर अर्ज नाकारला गेल्यास त्याची सर्वस्वी जबाबदारी संबंधित उमेदवाराची राहील. याबाबत उमेदवारास तक्रार करता येणार नाही. ऑनलाईन अर्जात भरलेली माहिती बदलता येणार नाही. जाहिरातीत नमूद केलेल्या सर्व अटी तसेच शैक्षणिक अर्हता, आरक्षण, वयोमर्यादा, शिथीलीकरण इत्यादी पात्रता तपासूनच उमेदवारांनी ऑनलाईन अर्ज भरावा.
◾वरील लेखात माहिती अर्धवट असू शकते संपूर्ण माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात काळजीपूर्वक वाचावी व अर्ज सादर करावा.