PCMC Fireman Bharti 2024 : पिंपरी चिंचवड महानगरपालिका च्या अग्निशमन विभागास आवश्यक असणाऱ्या अग्निशमन विमोचक तथा फायरमन रिस्क्युअर या पदाची रिक्त पदे सरळ सेवेने भरण्याकरिता जाहिरात प्रकाशित करण्यात आली होती त्यानुसार उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात आले होते.
या भरतीसाठी ऑनलाईन लेखी परीक्षा 29 ऑगस्ट 2024 मध्ये घेण्यात आली होती व त्याची उत्तर तालिका महानगरपालिकेचे संकेतस्थळावर सुद्धा प्रसिद्ध करण्यात आली त्यानंतर विहित मुदतीत उमेदवारांकडून यावर हरकती/आक्षेप मागवण्यात आले होते, उमेदवाराने घेतलेल्या हरकती आणि आक्षेप नंतर अंतिम निकाल महानगरपालिकेच्या संकेतस्थळावर 04 ऑक्टोबर 2024 रोजी प्रसिद्ध करण्यात आला त्यानुसार निवड झालेल्या उमेदवाराला कागदपत्र पडताळणी आणि शारीरिक क्षमता मैदानी चाचणीसाठी बोलवण्यात येत आहे.
कागदपत्र पडताळणी
उमेदवाराची निवड व प्रतीक्षा यादी तयार करण्यापूर्वी ऑनलाइन फॉर्म मध्ये भरलेल्या माहितीच्या कागदपत्राची पडताळणी, उमेदवाराचे वय, शैक्षणिक अर्हता, जातीचा प्रवर्ग व समांतर आरक्षण, अनुभव इत्यादी विषय कागदपत्राची पडताळणी होणे आवश्यक आहे. त्यासाठी उमेदवाराची यादी खाली प्रकाशित केलेली आहे त्या यादीमधील उमेदवारांना कागदपत्र पडताळण्यासाठी व मैदानी चाचणी करिता बोलवण्यात येत आहे त्या तारखेला उपस्थित रहावे.
खाली यादी ची लिंक दिलेली आहे ती पीडीएफ यादी अर्जदाराने डाउनलोड करावी व त्यामध्ये नाव असल्यास 22 जानेवारी 2025 ते 24 जानेवारी 2025 या कालावधीत त्यांच्या नावापुढे नमूद केलेल्या तारखेस व वेळेस कागदपत्र पडताळणी व शारीरिक क्षमता मैदानी चाचणी करिता पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे, संत ज्ञानेश्वर क्रीडा संकुल, इंद्रायणी नगर, सेक्टर २, स्वामी समर्थ शाळेसमोर, भोसरी, पुणे 411 026 येथे सकाळी सहा वाजेपासून उपस्थित राहावे.
महत्त्वाच्या सूचना
उमेदवारांनी कागदपत्र पडताळणी करता येताना परिशिष्ट ब मध्ये नमूद केल्याप्रमाणे मूळ कागदपत्र तसेच त्या कागदपत्राच्या साक्षांकित प्रतीचा एक संच बरोबर आणावा. कागदपत्रे पडताळणी व शारीरिक क्षमता मैदानी चाचणी करता अनुपस्थित राहणाऱ्या, अपूर्ण कागदपत्र सादर करणाऱ्या, अथवा कागदपत्रे तपासांती उमेदवार शैक्षणिक अर्हता तसेच इतर बाबीची पूर्तता करत नसल्याचे निदर्शनास आल्यास अशा उमेदवारांना शारीरिक क्षमता मैदानी चाचणीसाठी अपात्र केले जाईल.
पात्र उमेदवारांना शारीरिक क्षमता मैदानी चाचणीमध्ये किमान गुण प्राप्त नसल्याचे निदर्शनास आल्यास अशा उमेदवारांचा निवड प्रक्रियेच्या पुढील टप्प्या करिता विचार केला जाणार नाही याची उमेदवाराने नोंद घ्यावी. तसेच याबाबत कोणत्याही प्रकारच्या तक्रारीची दखल घेतली जाणार नाही व त्या उमेदवारासोबत पत्र व्यवहार केला जाणार नाही याची सर्व संबंधित उमेदवारांनी नोंद घ्यावी.
शारीरिक मोजमाप आणि विहित केलेले उंची वजन कोणत्याही एका शारीरिक मोजमापामध्ये उमेदवारा पात्र न ठरल्यास पुढील उर्वरित चाचण्या घेण्यात येणार नाहीत व त्याला निवड प्रक्रियेतून बाद ठरवण्यात येईल. संबंधित चाचण्या घेण्यासाठी नेमणूक करण्यात आलेले सनियंत्रण अधिकारी यांचा निर्णय अंतिम राहील.
उमेदवराला शारीरिक क्षमता मैदानी चाचणीच्या वेळी स्मार्ट वॉच, स्टॉप वॉच, मोबाईल तसेच कोणतेहि इलेक्ट्रॉनिक डिजिटल उपकरणे/साधने जवळ बाळगता येणार नाही तर त्या उमेदवारास बाद करण्यात येईल याची सर्व उमेदवाराने नोंद घ्यावी. आवश्यक कागदपत्राची यादी व उमेदवारांची नावाची यादी खाली दिलेली आहे ती संपूर्ण यादी डाऊनलोड करून उमेदवार आणि पडताळणीसाठी हजर राहावे.
पीडीएफ यादी : डाऊनलोड करा