BMC Bharti 2024 : बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या विविध या रुग्णालयामध्ये प्रयोगशाळा तंत्रज्ञ या संवर्गाची पदे भरण्यासाठी जाहिरात प्रकाशित करण्यात आली आहे.
यासाठी इच्छुक तसेच पात्र उमेदवार नियुक्तीसाठी अर्ज मागविण्यात येत आहेत इच्छुक तसेच पात्र उमेदवाराने संपूर्ण जाहिरात वाचावी व त्यानंतर पात्र असल्यास अर्ज सादर करावा, अर्जाचा नमुना जाहिरातीमध्ये दिलेला आहे, विहित नमुना डाऊनलोड करून अर्ज 20 सप्टेंबर 2024 पर्यंत सादर करायचे आहेत.
◼️पदांचा तपशील : प्रयोगशाळा तंत्रज्ञ – 18 जागा
◼️शैक्षणिक अर्हता
अ) उमेदवार मान्यता प्राप्त विद्यापीठातून बीएस्सी उत्तीर्ण होणे आवश्यक आहे आणि महाराष्ट्र राज्य तंत्र शिक्षण मंडळाची DMLT पदविका धारण केलेली असावी. किंवा उमेदवाराने 12 वी नंतर महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ यांचेकडील निम वैद्यकीय तंत्रज्ञान या शाखेतील लॅबोरेटरी मेडिसीन या विषयातील (Bachelor of Paramedical Technology in Laboratory Medicine) पदवी धारण करणारा असावा.
(ब) उमेदवार महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाची शालांत परीक्षा वा तत्सम परीक्षा किमान 50 गुणांची प्रश्नपत्रिका असलेला मराठी विषय घेऊन उत्तीर्ण झालेला असावा.
(क) उमेदवारांना संगणकाचे ज्ञान अवगत करणे आवश्यक आहे. त्याने / तिने (डी.ओ.ई., ए.सी.सी.) सोसायटीचे (सी.सी.सी.) किंवा (ओ स्तर) किंवा (ए स्तर) किंवा (बी स्तर) किंवा (सी स्तर) स्तरावरील प्रमाणपत्र किंवा महाराष्ट्र राज्य आणि तांत्रिकी शिक्षण मंडळाचे एम. एस.सी.आय.टी. किंवा जी.ई.सी.टी. चे प्रमाणपत्र धारण करणे आवश्यक आहे.
◼️वेतन : दरमहा 20 हजार रुपये एवढे एकत्रित ठोक वेतन देण्यात येणार आहे.
◼️अर्ज करण्याची पद्धत : इच्छुक तसेच पात्र उमेदवाराने खाली दिलेल्या लिंक वरून जाहिरातीमधील अर्जाचा नमुना प्रिंट करून व्यवस्थित रित्या भरून नमूद केलेल्या तारखेस सादर करावा.
◼️अर्ज करण्याची तारीख : इच्छुक उमेदवाराने विहित नमन्यातील अर्ज 11 सप्टेंबर 2024 पासून 20 सप्टेंबर 2024 या कालावधी मध्ये खालील पत्त्यावर जमा करावेत.
◼️अर्ज पाठवण्याचा पत्ता : विहित नमुन्यात सर्व बाबींची पूर्तता केलेले अर्ज, अलिकडेच काढलेल्या पासपोर्ट आकाराचे छायाचित्र त्यावर चिकटवून अर्ज बा.य.ल. नायर धर्मा. रुग्णालय, डॉ. ए.एल. नायर रोड, मुंबई सेंट्रल, मुंबई- 400 008 यांच्या आवक-जावक कार्यालयात दि. 11.09.2024 पासून दि.20.09.2024 पर्यंत सर्व शनिवार, रविवार आणि सर्व सार्वजनिक सुट्ट्या वगळून सादर करावेत. विहित दिनांक / वेळेनंतर आलेले अर्ज विचारात घेतले जाणार नाहीत किंवा सदर बाबत कोणत्याही प्रकारचा पत्रव्यवहार स्विकारला जाणार नाही.
◼️निवड प्रक्रिया : प्राप्त झालेल्या अर्जाची पडताळणी करून मुलाखतीद्वारे उमेदवारांची निवड केल्या जाणार आहे, पात्र उमेदवारांना मुलाखतीची वेळ, दिनांक व ठिकाण ईमेलद्वारे कळविण्यात येईल.
◼️अर्जाचे शुल्क : जाहिरातीमध्ये नमूद केलेले नाही.
◼️उमेदवारांसाठी सूचना
- पोस्टाच्या विलंबामुळे कोणतीही माहिती प्राप्त होण्यास किंवा कळविण्यास विलंब झाला तर त्याची जबाबदारी बृहन्मुंबई महानगरपालिकेची राहणार नाही.
- नियुक्तीनंतर कोणत्याही क्षणी उमेदवाराने चुकीची माहिती / प्रमाणपत्रे/कागदपत्रे सादर केल्याचे किंवा कोणतीही माहिती दडवून ठेवल्याचे निदर्शनास आल्यास त्यांची उमेदवारी रद्दबातल करण्यात येईल. तसेच नियुक्ती झाली असल्यास कोणतीही पूर्व सूचना न देता त्यांची नियुक्ती समाप्त करण्यात येईल.
- प्रशासकीय किंवा अन्य कारणास्तव निवड प्रक्रिया कोणत्याही वेळेस कोणत्याही टप्प्यावर थांबविण्याचे अधिकार मा. अधिष्ठाता, टो. रा. वैद्यकीय महाविद्यालय आणि बा.य.ल. नायर धर्मा. रुग्णालय यांना आहेत.
- निवड झालेल्या उमेदवाराना बा.य.ल. नायर धर्मा रुग्णालय व टो. रा. वैद्यकीय महाविद्यालयाच्या नियुक्त केलेल्या ठिकाणी तिन्ही पाळीत काम करणे बंधनकारक आहे.
मूळ जाहिरात अर्जाचा नमुना : डाऊनलोड करा
अधिकृत संकेतस्थळ पाहण्यासाठी : इथे क्लिक करा
हे ही वाचा..