बृहन्मुंबई महापालिकेत ग्रंथपाल पदांसाठी मोठी भरती;त्वरित अर्ज करा | BMC Bharti 2024

BMC Bharti 2024 : बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या म.वा. देसाई रुग्णालय मालाड पूर्व, स्वातंत्र्यवीर वि.दा. सावरकर रुग्णालय मुलुंड, संत मुक्ताबाई रुग्णालय घाटकोपर आणि क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले रुग्णालय बोरवली पूर्व या उपनगरीय रुग्णालयामध्ये विविध पदे भरण्यासाठी जाहिरात प्रकाशित करण्यात आली आहे.

व्हाट्सअप ग्रुप जॉईन व्हा
टेलिग्राम ग्रुप जॉईन व्हा

यासाठी इच्छुक तसेच पात्र उमेदवार नियुक्तीसाठी अर्ज मागविण्यात येत आहेत इच्छुक तसेच पात्र उमेदवाराने संपूर्ण जाहिरात वाचावी व त्यानंतर पात्र असल्यास अर्ज सादर करावा, अर्जाचा नमुना जाहिरातीमध्ये दिलेला आहे, विहित नमुना डाऊनलोड करून अर्ज 06 सप्टेंबर 2024 पर्यंत सादर करायचे आहेत.

पदांचा तपशील

  • कनिष्ठ ग्रंथपाल – 04 जागा
  • कनिष्ठ आहार तज्ञ – 04 जागा

शैक्षणिक अर्हता

व्हाट्सअप ग्रुप जॉईन व्हा
टेलिग्राम ग्रुप जॉईन व्हा
  • कनिष्ठ ग्रंथपाल : उमेदवार मुंबई विद्यापीठ अथवा इतर मान्यताप्राप्त विद्यापीठातील लायब्ररी सायन्स मधील पदवी किंवा पदविका धारक असणे आवश्यक आहे, उमेदवारास पूर्वीचा अनुभव असल्यास प्राधान्य देण्यात येईल.
  • कनिष्ठ आहार तज्ञ : उमेदवार मान्यता प्राप्त विद्यापीठातून विज्ञान शाखेतील होम सायन्स, न्यूट्रिशन डायटीक्स विषय घेऊन पदवी उत्तीर्ण होणे आवश्यक आहे आणि त्यांनी मान्यता प्राप्त विद्यापीठाचे न्यूट्रिशन मधील पदवी पदव्युत्तर पदवी परीक्षा उत्तीर्ण असणे आवश्यक आहे, उमेदवारास मराठी भाषेचे ज्ञान असणे सुद्धा गरजेचे असेल.

वेतन : दोन्ही पदासाठी दरमहा 25 हजार रुपये एवढे एकत्रित ठोक वेतन देण्यात येणार आहे.

अर्ज करण्याची पद्धत : इच्छुक तसेच पात्र उमेदवाराने खाली दिलेल्या लिंक वरून जाहिरातीमधील अर्जाचा नमुना प्रिंट करून व्यवस्थित रित्या भरून नमूद केलेल्या तारखेस सादर करावा.

अर्ज करण्याची तारीख : इच्छुक उमेदवाराने विहित नमन्यातील अर्ज १९ ऑगस्ट २०२४ पासून 06 सप्टेंबर 2024 या कालावधी सकाळी 11 ते 4 वाजेपर्यंत जमा करावेत.

अर्ज पाठवण्याचा पत्ता : लोकमान्य टिळक महानगरपालिका सर्वसाधारण रुग्णालयाच्या आवक जावक विभागात (महाविद्यालय इमारत तळमजला, कॉलेज कॅन्टीन जवळ) प्रत्यक्ष सादर करावेत.

नमूद केलेल्या कालावधीनंतर प्राप्त झालेल्या अर्जाचा अपूर्ण भरलेल्या अर्जाचा विचार करण्यात येणार नाही याची कृपया नोंद घ्यावी.

निवड प्रक्रिया : प्राप्त झालेल्या अर्जाची पडताळणी करून मुलाखतीद्वारे उमेदवारांची निवड केल्या जाणार आहे, पात्र उमेदवारांना मुलाखतीची वेळ, दिनांक व ठिकाण ईमेलद्वारे कळविण्यात येईल.

अर्जाचे शुल्क : विहित नमुन्यातील अर्ज जाहिराती सोबत जोडला असून त्याची प्रिंट घेण्यात यावी सदर पदासाठी 710 रुपये व जीएसटी एवढे शुल्क लोकमान्य टिळक महानगरपालिका सर्वसाधारण रुग्णालयाच्या रोखपाल विभागात भरून त्याची मूळ पावती अर्ज सोबत जोडून उमेदवारांनी विहित नमुन्यातील अर्ज कार्यालयीन कामकाजाच्या दिवशी जमा करायचे आहेत.

उमेदवारांसाठी सूचना

  • निवड झालेल्या उमेदवारास मुंबई महानगरपालिकेच्या कोणत्याही उपनगरीय रुग्णालयामध्ये जेथे पद रिक्त असेल ते त्यांनी नियुक्त करण्यात येईल.
  • निवड झालेल्या उमेदवारास नियुक्तीनंतर प्रत्येक सहा महिन्यानंतर एका दिवसाचा तांत्रिक खंड देण्यात येईल.
  • उमेदवाराला मुलाखतीसाठी स्वखर्चाने उपस्थित राहावे लागेल.
  • उमेदवारांना विनंती आहे की मुलाखतीस येताना त्यांनी अर्ज सोबत सादर केलेला शैक्षणिक अर्हता प्रमाणपत्राच्या साक्षांकित प्रति व सर्व मूळ कागदपत्र पडताळणीसाठी सोबत घेऊन यावेत.

मूळ जाहिरात अर्जाचा नमुना : डाऊनलोड करा

अधिकृत संकेतस्थळ पाहण्यासाठी : इथे क्लिक करा

हे ही वाचा….

जिल्हा परिषदेमध्ये 10 वी पासवर 90 जागांसाठी भरती; पगार तब्ब्ल 75000 रुपये | ZP Hingoli Recruitment