BMC Bharti 2025 : बृहन्मुंबई महानगरपालिकेमध्ये विविध पदे भरण्यासाठी 137 रिक्त जागांसाठी जाहिरात प्रकाशित करण्यात आलेले आहे यासाठी इच्छुक तसेच पात्र उमेदवाराने ऑफलाइन पद्धतीने अर्ज सादर करायचा आहे सविस्तर माहिती व जाहिरात खाली दिलेल्या लिंक वर उपलब्ध असून इच्छुक तसेच पात्र उमेदवार आणि त्या पद्धतीने सविस्तर वाचून अर्ज सादर करावा.
Brihanmumbai Municipal Corporation has published an advertisement for 137 vacancies for filling up various posts as well as interested and eligible candidates are requested to submit their application through offline mode. |
◾भरतीचा विभाग : हि बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या उपनगरीय रुग्णालयांमधील विविध पदांसाठी प्रकाशित करण्यात आली आहे.
◾भरतीचा प्रकार : सरकारी नोकरीची संधी
◾पदांचे नाव : जाहिरातीमध्ये नमूद केल्याप्रमाणे
◾शैक्षणिक पात्रता : वर पदानुसार शैक्षणिक पात्रता वेगवेगळी असून उमेदवाराने जाहिरात वाचून अर्ज सादर करावा.
◾अर्ज करण्याची पद्धत : ऑफलाईन पद्धतीने कार्यालयातून अर्ज घेऊन व्यवस्थित भरून सादर करावेत.
◾पदांचे नाव व आवश्यक अर्हता
- वैद्यकीय अधिकारी व इतर – 137 जागा
◾शिक्षण : पदानुसार वेगवेगळे आहे मूळ जाहिरात वाचावी.
◾वयोमर्यादा : वैदयकीय अधिकारी / सहाय्यक वैदयकीय अधिकारी या पदांवर कंत्राटी तत्त्वावर उमेदवारांची नियुक्ती करण्यासाठी अर्हताधारक तसेच अनुभवी उमेदवार प्राप्त होत नसल्याने सदर वैद्यकीय संवर्गाच्या पदांसाठी कमाल वयोमर्यादा ६२ वर्षे इतकी आहे.
१. वैदयकीय संवर्गासाठी उमेदवाराचे वय १८ वर्षापेक्षा कमी व ६२ वर्षापेक्षा जास्त असता कामा नये.
२. भौतिकोपचार तज्ञ पदाकरीता उमेदवाराचे वय १८ वर्षापेक्षा कमी व ३८ वर्षापेक्षा जास्त असता कामा नये.
◾नोकरीचे ठिकाण : बृहन्मुंबई महानगरपालिका
◾शेवटची तारीख : अर्ज 12 फेब्रुवारी 2025 पूर्वी ऑफलाईन अर्ज सादर करायचे आहेत.
◾अर्ज पाठविण्याचा पत्ता : प्रमुख वैद्यकीय अधिक्षक व खाते प्रमुख (माध्यमिक आरोग्य सेवा) यांचे कार्यालय, ७ वा मजला, बांद्रा भाभा रुग्णालय इमारत, वांद्रे पश्चिम, मुंबई ४०००५०
◾अधिकृत संकेतस्थळ : https://portal.mcgm.gov.in/
महत्त्वाच्या सूचना
◾रिक्त पदांच्या उपलब्धतेनुसार आणि आवश्यकतेनुसार तात्पुरत्या स्वरुपात कंत्राटी तत्त्वावर नेमणूका करण्यात येतील. तथापि नियुक्ती केलेल्या उमेदवारांना महानगरपालिकेतील नोकरीवर हक्क सांगता येणार नाही.
◾जाहिरातींमध्ये दिलेल्या पदांची संख्या बदलण्यासापेक्ष आहे.
◾उपरोक्त संवर्गात नियमित तत्त्वावर कर्मचारी प्राप्त झाल्यास अथवा पदे कमी झाल्यास सदर कंत्राटी उमेदवारांची सेवा संपुष्टात येईल.
◾अर्ज स्वहस्ताक्षरात, सर्व दृष्टीने परिपूर्ण भरलेले असावेत. विहित नमुन्यामध्ये न भरलेले व अपूर्ण अर्ज विचारात घेतले जाणार नाहीत.
◾अलिकडच्या काळात काढलेले पारपत्र आकारातील उमेदवाराचे छायाचित्र त्याच्या स्वाक्षरीसह अर्जावर नमूद केलेल्या ठिकाणी चिकटवावे.
◾उमेदवारांनी स्वतः निश्चित करावयाचे आहे की, ते आवेदित पदांच्या सर्व अर्हता व अटी पूर्ण करतात. उमेदवार विहित अर्हता व अटी पूर्ण करीत नसल्याचे कोणत्याही क्षणी निदर्शनास आल्यास त्यांची उमेदवारी रद्द करण्यात येईल. नेमणूक झाली असल्यास कोणतीही पूर्वसुचना न देता सेवेतून कमी करण्यात येईल.
PDF जाहिरात | येथे क्लिक करा |
ऑनलाईन अर्ज | येथे क्लिक करा |
Discover more from Job Placement
Subscribe to get the latest posts sent to your email.