BNCMC Bharti 2024 : भिवंडी निजामपूर शहर महानगरपालिकेत विविध पदांसाठी भरती;पगार 32000 रुपये

BNCMC Bharti 2024 : भिवंडी निजामपूर शहर महानगरपालिकेमध्ये विविध पदे भरण्यासाठी नवीन जाहिरात प्रकाशित करण्यात आली असून यासाठी 12 ऑगस्ट 2024 पर्यंत ऑफलाइन पद्धतीने अर्ज सादर करायचे आहेत.

व्हाट्सअप ग्रुप जॉईन व्हा
टेलिग्राम ग्रुप जॉईन व्हा

तुम्ही सुद्धा या पदाभरती साठी इच्छुक तसेच पात्र असेल तर खालील लिंक वरून जाहिरात डाउनलोड करा सविस्तर जाहिरात वाचून पात्र असाल तर 12 ऑगस्ट 2024 रोजी सर्व कागदपत्रे घेऊन मुलाखतीला हजर राहा.

पदांचा तपशील

सहाय्यक विधी अधिकारी – 07 जागा

व्हाट्सअप ग्रुप जॉईन व्हा
टेलिग्राम ग्रुप जॉईन व्हा

शैक्षणिक पात्रता 

मान्यता प्राप्त विद्यापीठाचे पदवी शासकीय, निम शासकीय, स्थानिक स्वराज्य संस्था संबंधित न्यायालयात कामकाजाचा किमान पाच वर्षाचा अनुभव किंवा पाच वर्षे सत्र न्यायालयातील वकील कामाचा अनुभव.

वयोमर्यादा

खुल्या प्रवर्गाकरिता 35 वर्ष आरक्षित प्रवर्गाकरिता 38 वर्ष राहील.

मानधन  

32000 रुपये दरमहा निवड झालेल्या उमेदवाराला अदा करण्यात येईल.

अर्ज करण्याची पद्धत

ही पदभरती थेट मुलाखतीद्वारे होणार असून उमेदवाराने सर्व मूळ कागदपत्रासह एक साक्षांकित प्रत घेऊन थेट मुलाखतीला घेऊन उपस्थित राहावे.

मुलाखतीची तारीख

12 ऑगस्ट 2024 रोजी सकाळी 11 वाजता ही मुलाखत घेतली जाणार आहे.

आवश्यक कागदपत्र

सविस्तर अर्ज मूळ व साक्षांकित प्रतीसह सर्व कागदपत्र नाव, पत्ता, नागरिकत्व, जन्मतारीख, शैक्षणिक अर्हता,अनुभव प्रमाणपत्र, रहिवासी प्रमाणपत्र आणि इतर आवश्यक दस्तावेज सह उपस्थित राहणे आवश्यक आहे.

मुलाखतीचे ठिकाण

भिवंडी निजामपूर शहर महानगरपालिका मुख्यालय या ठिकाणी मुलाखत घेतली जाणार आहे.

उमेदवारासाठी सूचना

  • मुलाखती साठी उमेदवाराने स्वखर्चाने हजर राहायचे आहे महानगरपालिकेतर्फे कोणताही खर्च दिला जाणार नाही.
  • पदाचा संख्येमध्ये बदल करण्याचा अथवा पदभरती स्थगित करण्याचा अधिकार उपायुक्त महानगरपालिकेने राखून ठेवलेला आहे.
  • उमेदवारांनी मुलाखतीसाठी मूळ कागदपत्रासह सर्व कागदपत्राच्या एक साक्षांकित प्रति सोबत ठेवाव्यात मुलाखतीला ठरलेल्या तारखेला ठरलेल्या वेळेअगोदर उपस्थित राहणे आवश्यक आहे.

मूळ जाहिरात : डाउनलोड करा

हे हि वाचा…

Pimpri Chinchwad Pune Bharti : पिंपरी चिंचवड पुणे स्मार्ट सिटी अंतर्गत लेखापाल पदांसाठी भरती;परीक्षा नाही,पगार 40000 रुपये दरमहा