Brihanmumbai Municipal Corporation Bharti : बृहन्मुंबई महानगरपालिका अंतर्गत विविध पदांसाठी मुलाखतीद्वारे भरती करण्यात येत आहे या साठी इच्छुक तसेच पात्र उमेदवाराकडून 21 ऑगस्ट 2024 पूर्वी संध्याकाळी पाच वाजेच्या आत ऑफलाइन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत.
तरी इच्छुक पात्र उमेदवार आणि अंतिम दिनांक अगोदर खालील दिलेल्या रोहित नमुन्यात अर्ज सादर करावेत जेणेकरून मिळालेली सुवर्णसंधी वाया जाणार नाही.
पदांचा तपशील (Posts at Brihanmumbai Municipal Corporation Bharti)
1.वैद्यकीय अधिकारी – 01 जागा
शैक्षणिक अर्हता : एमबीबीएस डीसीएस असल्यास प्राधान्य
अनुभव : राष्ट्रीय आरोग्य कार्यक्रमाच्या कामाचा अनुभव असला उमेदवार प्राधान्य देण्यात येईल.
पगार : ६०००० रुपये दरमहा
वयोमर्यादा : 18 ते 38 वर्ष खुला प्रवर्ग व 18 ते 60 वर्ष राखीव प्रवर्ग
2.सार्वजनिक आरोग्य परिचारिका (स्टाफ नर्स) – 02 जागा
शैक्षणिक पात्रता : जीएनएम बेसिक बीएससी नर्सिंग/एमएससी नर्सिंग
अनुभव : राष्ट्रीय आरोग्य अभियान कार्यक्रमाच्या कामाचा अनुभव असल्यास उमेदवारांना प्राधान्य.
पगार : 20000 रुपये दरमहा
वयोमर्यादा : 18 ते 38 वर्षे खुला प्रवर्ग 18 ते 43 वर्ष राखीव प्रवर्ग
3.परिचर (सपोर्ट स्टाफ) – 01 जागा
शैक्षणिक अर्हता : दहावी पास
अनुभव : राष्ट्रीय आरोग्य अभियान कार्यक्रमाच्या कामाचा अनुभव असल्यास उमेदवारांना प्राधान्य.
पगार : 15500 रुपये
वयोमर्यादा : 18 ते 38 वर्षे खुला प्रवर्ग 18 ते 43 वर्ष राखीव प्रवर्ग
4. लॅक्टशन सुपरवायझर कम ट्रेनर – 01 जागा
शैक्षणिक अर्हता : कोणत्याही शाखेतील वैद्यकीय पदवी, बीएससी होम सायन्स अन्न आणि पोषण, बीएससी नर्सिंग.
पगार : 40000 रुपये दरमहा
वयोमर्यादा : 18 ते 38 वर्षे खुला प्रवर्ग 18 ते 43 वर्ष राखीव प्रवर्ग
अर्ज करण्याची पद्धत
इच्छुक तसेच पात्र उमेदवारांनी खालील नमूद केलेल्या पत्त्यावर मूळ कागदपत्रांच्या साक्षांकित प्रतिसह 21 ऑगस्ट 2024 संध्याकाळी 5 वाजेपर्यंत समक्ष अथवा पोस्टाने अर्ज सादर करावेत.
अर्ज पाठवण्याचा पत्ता
अधिष्ठाता, लोकमान्य टिळक महानगरपालिका सर्वसाधारण रुग्णालय व लोकमान्य टिळक महानगरपालिका वैद्यकीय महाविद्यालय, शीव (सायन रुग्णालय) यांच्या कार्यालयात सादर करावेत,अर्जाचा नमुना जाहिरातीमध्ये दिलेला आहे
आवश्यक कागदपत्रे (Required Documents for Brihanmumbai Municipal Corporation Bharti)
अर्जासोबत उमेदवारांनी खालील नमूद केलेल्या कागदपत्राच्या साक्षांकित प्रति जोडाव्यात
- दहावीचे प्रमाणपत्र
- शैक्षणिक अर्हतेचे सर्व प्रमाणपत्र
- कामाचा अनुभव असल्याचा अनुभव प्रमाणपत्र
- ओळखपत्राची साक्षांकित प्रत
निवड प्रक्रिया
विहित नमुन्यात प्राप्त झालेल्या अर्जाची पडताळणी करून पात्र उमेदवारांना मुलाखतीसाठी बोलावण्यात येईल व त्याद्वारे अंतिम निवड केल्या जाईल.
उमेदवारासाठी सूचना
- रिक्त पदाच्या संख्येत उपलब्धतेनुसार बदल होऊ शकतो.
- सदर मानधन एकत्रितपणे देण्यात येईल.
- निवड यादीतील उमेदवार मुलाखतीस पात्र असतील.
- उच्च शिक्षण आणि अनुभव असलेल्या उमेदवारांना प्राधान्य (Apply Brihanmumbai Municipal Corporation Bharti) दिले जाईल.
- पदाच्या संख्येत बदल करण्याचा, निवड प्रक्रिया रद्द करण्याचा सर्वाधिकार कार्यकारी आरोग्य अधिकारी यांच्याकडे असतील.
- निवड यादीतील पात्र उमेदवारांना मुलाखतीसाठी आपल्या मोबाईल व ईमेलद्वारे संपर्क साधून कळविण्यात येईल.
मूळ जाहिरात व अर्जाचा नमुना : डाऊनलोड करा
हे ही वाचा…
MBMC Recruitment 2024 : मिरा भाईंदर महानगरपालिका मध्ये थेट मुलाखती द्वारे भरती सुरू,त्वरित अर्ज करा