Co-Op Bank Bharti 2024 : बँकेत नोकरी शोधणाऱ्या उमेदवारांसाठी सुवर्णसंधी पीपल्स कॉ-ऑपरेटिव्ह बँकेत कॉम्पुटर ऑपरेटर (संगणक चालक), लिपिक इतर विविध पदांसाठी भरतीची नवीन जाहिरात प्रकाशित करण्यात आलेली आहे. यासाठी इच्छुक व पात्र उमेदवारांनी सविस्तर जाहिरात वाचून अर्ज ऑनलाइन पद्धतीने आवश्यक त्या सर्व कागदपत्रांसह लवकरात लवकर अर्ज सादर करायचे आहेत. इच्छुक व पात्र उमेदवाराने या संधीचा फायदा घ्यावा.पीपल्स कॉ-ऑपरेटिव्ह बॅंकेअंतर्गत हि भरती जाहीर झाली असून पदांच्या तपशीलसह सविस्तर माहिती खाली दिलेली आहे.
People’s Co-operative Bank has published a new recruitment advertisement for Computer Operator/Clerk and various other posts for the candidates who are looking for bank jobs. For this, the interested and eligible candidates should read the detailed advertisement and submit the application online and offline on below mentioned address. |
◾भरतीचा विभाग : हि भरती बँकेमधील विविध विभागात निघाली आहे,विविध पदांसाठी भरतीची जाहिरात प्रकाशित करण्यात आली आहे.
◾भरतीचा प्रकार : पीपल्स कॉ-ऑपरेटिव्ह बँकेमध्ये भरती राहणार आहे.
◾पदांचे नाव : बँक अधिकारी, शाखा व्यवस्थापक आणि संगणक चालक/लिपिक
◾शैक्षणिक पात्रता : पदानुसार शैक्षणिक पात्रता वेगवेगळी असून उमेदवाराने जाहिरात वाचून अर्ज सादर करावा.
◾अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाईन ईमेलवर व ऑफलाईन पद्धतीने अर्ज सादर करू शकणार आहेत.
PDF जाहिरात | येथे क्लिक करा |
अधिक माहिती | येथे क्लिक करा |
◾पदांचे नाव व आवश्यक अर्हता
▪️बँक अधिकारी
1]पदवीधर किंवा पदव्युत्तर JAIIB परीक्षा उत्तीर्ण
2]संगणकाचे ज्ञान आवश्यक आहे, किमान 5 वर्षांचा बँकिंग क्षेत्रातील अनुभव असावा
3]उमेदवारांचे वय 35 वर्षाहून अधिक नसावे.
▪️शाखा व्यवस्थापक
1]पदवीधर किंवा पदव्युत्तर JAIIB परीक्षा उत्तीर्ण
2]संगणकाचे ज्ञान आवश्यक आहे
3]किमान 8 वर्षांचा बँकिंग क्षेत्रातील अनुभव असावा.
4]उमेदवारांचे वय 40 वर्षाहून अधिक नसावे.
▪️क्लर्क (लिपिक)/कॉम्पुटर ऑपरेटर (संगणक चालक)
1]वाणिज्य किंवा विज्ञान शाखेतील पदवीधर किंवा पदव्युत्तर.
2]सहा महिन्याचा संगणकाचा कोर्स उत्तीर्ण असणे आवश्यक.
3]शासन मान्य संस्थेतून मराठी व इंग्रजी टायपिंग कोर्स उत्तीर्ण असावा
4]उमेदवारांचे वय 25 वर्षाहून अधिक नसावे.
◾नोकरीचे ठिकाण : शिरपूर, जिल्हा -धुळे
◾अर्ज करण्याची शेवटची तारीख : अर्ज 05 नोव्हेंबर 2024 पूर्वी पोहचतील अश्या बेताने ईमेलवर किंवा खाली पत्त्यावर पाठवावेत.
◾अर्ज पाठवण्याचा पत्ता : मुख्य कार्यकारी अधिकारी, दि.शिरपूर पिपल्स को-ऑप बँक ली., शिरपूर महाराजा कॉम्प्लेक्स, मेन रोड, शिरपूर, धुळे.
◾ईमेल ऍड्रेस : info@shirpurbank.co.in
उमेदवारांसाठी महत्त्वाच्या सूचना
◾उमेदवारांनी अर्ज सविस्तर वाचून पात्रता व अटींची पूर्तता करत असल्यास सादर करावेत.
◾उमेदवारांनी अर्जामध्ये स्वतःचा सद्यस्थितीत चालू असलेला ई-मेल पत्ता व मोबाईल क्रमांक अचूक नमूद करायचा आहे.
◾अर्धवट भरलेले अर्ज स्वीकारले जाणार नाहीत तसेच वर दिलेल्या तारखेनंतर आलेल्या अर्जाचा विचार केला जाणार नाही याची नोंद घ्यावी.
◾उमेदवाराने अर्जामध्ये दिलेली माहिती खोटी अथवा चुकीची आढळल्यास अर्ज रद्द केले जातील.
◾वरील लेखात माहिती अर्धवट असू शकते संपूर्ण माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात काळजीपूर्वक वाचावी व अर्ज सादर करावा.