Cosmos Bank Recruitment 2024 : द कॉसमॉस कॉ-ऑपेरेटीव्ह बँक लिमिटेड मुंबई आणि पुणे येथे विविध पदे भरण्यासाठी जाहिरात प्रकाशित करण्यात आली असून यासाठी इच्छुक तसेच पात्र उमेदवारांना 29,30 आणि 31 जुलै रोजी सकाळी 11 ते 4 या वेळेमध्ये मुलाखतीसाठी बोलवण्यात येत आहे.
तरी इच्छुक तसेच पात्र उमेदवार आणि खालील लिंक वरून मूळ जाहिरात डाऊनलोड करावी संपूर्ण पात्रता तपासावी आणि दिलेल्या तारखेला मुलाखतीस हजर राहावे.
पदांचा तपशील
1.व्यवस्थापक
शैक्षणिक पात्रता : मान्यताप्राप्त विद्यापीठातून प्रथम श्रेणीमध्ये पदवी धारण केलेली असावी किंवा उमेदवार MBA असावा किंवा उमेदवार प्राप्त विद्यापीठातून CA /ICWA असावा
वयोमर्यादा : उमेदवाराचे वय 30 जून 2024 रोजी जास्तीत जास्त 40 वर्ष असावे.
अनुभव : एकूण दहा वर्षाचा अनुभव बँकिंग क्षेत्रामध्ये असेल तर असे उमेदवारास प्राधान्य देण्यात येणार आहे.
2.सहाय्यक व्यवस्थापक
शैक्षणिक पात्रता : मान्यता प्राप्त विद्यापीठामधून प्रथम श्रेणीमध्ये कॉमर्स विषय घेऊन पदवी धारण केलेले असावे अथवा MBA असावे अथवा सीए,सीएस,आयसीडब्ल्यूए शिक्षण धारण केलेले असावे.
वयोमर्यादा : 30 जून 2024 रोजी जास्तीत जास्त 35 वर्ष
अनुभव : बँकिंग क्षेत्रामधील कमीत कमी पाच वर्षाचा अनुभव असावा.
3.कनिष्ठ अधिकारी
शैक्षणिक पात्रता : मान्यताप्राप्त विद्यापीठातून प्रथम श्रेणीमध्ये पदवीधर किंवा पदव्युत्तर असावा.
वयोमर्यादा : 30 नोव्हेंबर 2023 रोजी जास्तीत जास्त 28 वर्ष
अनुभव : उमेदवाराकडे कमीत कमी दोन वर्षाचा फायनान्शिअल इन्स्टिट्यूट मध्ये अनुभव असावा, मागील एका वर्षामध्ये आयबीपीएसची परीक्षा पास केलेल्या उमेदवारास प्राधान्य देण्यात येईल.
निवड प्रक्रिया
थेट मुलाखती द्वारे हे भरती होणार असून उमेदवाराने व नमूद केलेल्या तारखेला आवश्यक ते कागदपत्र सोबत मुलाखतीला हजर राहावे, अनुभवी उमेदवाराला वयोमर्यादेमध्ये शिथिलता देण्यात येईल.
मुलाखतीची तारीख
29,30 आणि 31 जुलै 2024 सकाळी 11 ते 4 वाजेपर्यंत
मुलाखतीचे ठिकाण
मुंबई : द कॉसमॉस को-ऑपरेटिव्ह बँक लिमिटेड, हरिसन बिल्डिंग फर्स्ट अँड सेकंड फ्लोर, रानडे रोड जंक्शन, गोखले रोड, दादर (डब्ल्यू), मुंबई – 400028
पुणे : द कॉसमॉस कॉपरेटिव बँक लिमिटेड, प्लॉट नंबर ६, आयसीएस कॉलनी, युनिव्हर्सिटी रोड, गणेश खिंड, शिवाजीनगर, पुणे – 411007
महत्वाच्या सूचना (Cosmos Bank Recruitment)
- इच्छुक तसेच पात्र उमेदवारांनी खाली दिलेल्या लिंक वरून मूळ जाहिरात अर्ज डाऊनलोड करावा व्यवस्थित रित्या भरावा.
- अर्जासोबत आवश्यक असलेल्या कागदपत्राच्या प्रतीचा संच व कागदपत्र सोबत ठेवावेत तसेच दोन पासपोर्ट साईज फोटो उमेदवाराने मुलाखतीसाठी सोबत न्यायचे आहेत.
- मुलाखतीला उमेदवाराला स्वखर्चाने जायचं आहे यासाठी कोणताही भत्ता दिला जाणार नाही याची नोंद घ्यावी.