Jilhadhikari Karyalay Bharti 2024 : महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेची अंमलबजावणी करताना सर्व साधारण जनतेकडून प्राप्त होणाऱ्या तक्रारींचा निपटारा करणे व योजनेच्या कामात पारदर्शकता राखण्याकरीता उपाययोजना सुचविणे यासाठी महाराष्ट्र रोजगार हमी अधिनियम १९७७ च्या (६ ऑगस्ट, २०१४ पर्यंत सुधारित) अनुसूची-२ मधील कलम २९ नुसार पालघर जिल्ह्याकरिता भरतीची जाहिरात प्रकाशित करण्यात अली आहे. इच्छुक तसेच पात्र उमेदवाराने व्यवस्थित जाहिरात वाचून पात्र असाल तर दिल्याप्रमाणे अर्ज सादर करावा, इतर सर्व माहिती खाली दिलेली आहे ती वाचूनच अर्ज सादर करावा हि विनंती.
The Collector’s office has announced a vacancy for the position of Ombudsperson. Interested and eligible candidates should apply offline using the prescribed format. Applicants must ensure that their application reaches the office before the due date. |
पदांचे नाव : तक्रार निवारण प्राधिकारी (Ombudsperson)
किमान पात्रता :-
1] केंद्र शासनाचे क्र.L-११०११/२१/२०१२/RE-VII दि.१६/०१/२०१४ रोजीच्या मार्गदर्शक सूचनांच्या निकषानुसार पात्र उमेदवार असावा.
2] उमेदवार कोणत्याही शाखेचा पदवीधर असावा.
3] उमेदवारास लोकप्रशासन/विधी/सामाजिक कार्य शैक्षणीक किंवा व्यवस्थापन क्षेत्रातील किमान वीस वर्षांचा अनुभव असावा, उमेदवार पालघर जिल्ह्यातील रहिवासी असावा.
4] उमेदवार हा राजकिय पक्षाशी संबंधित नसावा. उमेदवार शारीरिक दृष्ट्या सदृढ तसेच जिल्ह्यातील अतिदुर्गम भागात दौरे, निरिक्षण करण्यास सक्षम असावा.
वयोमर्यादा : उमेदवाराचे वय दिनांक 01/12/2024 रोजी 67 वर्षापेक्षा जास्त नसावे.
कालावधी : या पदावरील नियुक्तीचा कार्यकाल दोन वर्षाकरिता असेल तथापि, कामगिरी समाधानकारक नसल्यास नियुक्ती रद्द करण्यात येईल, त्यांचे कार्यालय संबंधित जिल्ह्याच्या मुख्यालयाच्या ठिकाणी असेल.
मानधन : शासन परिपत्रक क्र. २०१३/प्र.क्र. १६५/रोहयो ६ अ दि.१४/०८/२०१३ रोजीच्या मार्गदर्शक सूचनांनुसार तक्रार निवारण प्राधिकारी यांना प्रती बैठक रु.1000/- या दराने (कमाल रु.20000/- प्रति माह या मर्यादेत) मानधन देण्यात येईल.
अर्ज करण्याची पद्धत : इच्छुक उमेदवारांनी स्वतःची शैक्षणीक अर्हता व अनुभवासंबंधीच्या प्रमाणपत्रांसह जिल्हाधिकारी तथा जिल्हा कार्यक्रम समन्वयक, पालघर यांच्या नांवाने अर्ज तयार करावा व सदर अर्ज उपजिल्हाधिकारी (रोहयो) पालघर, (पहिला मजला क्र. १११), जिल्हाधिकारी कार्यालय पालघर, पालघर-बोईसर रोड, कोळगांव, ता. पालघर, जिल्हा-पालघर पिनकोड- ४०१४०४ यांचे कार्यालयात सादर करावा.
अर्ज करण्याचा कालावधी : दिनांक 11/12/2024 ते दिनांक 18/12/2024 सायं. 5.30 वाजेपर्यंत सादर करावा, उशिराने प्राप्त होणारे अर्ज विचारात घेतले जाणार नाहीत. उपजिल्हाधिकारी (रोहयो) पालघर कार्यालयात प्राप्त झालेल्या अर्जाची नामांकने मुळ कागदपत्रांसह खालील तक्त्यात नमूद केल्याप्रमाणे शासनास सादर करण्यात येतील.
PDF जाहिरात | येथे क्लिक करा |
ऑनलाईन अर्ज | येथे क्लिक करा |
Discover more from Job Placement
Subscribe to get the latest posts sent to your email.