Ladki Bahin Yojana Big Update : खुशखबर! निकालाआधीच सर्वात मोठी अपडेट, लाडक्या बहिणींना मिळणार 2100 रुपये, फक्त…

Created By Aditya, date : 22.11.2024

व्हाट्सअप ग्रुप जॉईन व्हा
टेलिग्राम ग्रुप जॉईन व्हा

Ladki Bahin Yojana Big Update : खुशखबर! निकालआधीच सर्वात मोठी अपडेट अली आहे लाडक्या बहिणींना 2100 मिळणार आहेत , निवडणुकीच्या निकालाअगोदर महायुतीकडून मोठी घोषणा करण्यात अली आहे.

महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीसाठी बुधवारी 20 नोव्हेंबर 2024 ला एकाच टप्प्यात मतदान झालं. तत्पूर्वी लाडकी बहीण योजनेबाबत एक मोठी अपडेट समोर आली होती.

व्हाट्सअप ग्रुप जॉईन व्हा
टेलिग्राम ग्रुप जॉईन व्हा

केंद्रीय मंत्री पियुष गोयल यांनी गुरुवारी 14 नोव्हेंबरला मोठी घोषणा केली होती. “महाराष्ट्रात महायुतीचं सरकार आल्यावर लाडकी बहीण योजनेची रक्कम वाढवून 2100 रुपये केली जाईल”, असं गोयल म्हणाले होते.

रिपोर्टनुसार, राज्य सरकारकडून आतापर्यंत 2.34 कोटी लाभार्थी महिलांना लाडकी बहीण योजनेचा लाभ मिळाला आहे या योजनेच्या माध्यमातून महिलांना आर्थिकदृष्या सक्षम करण्यासाठी दरमहा 1500 रुपये दिले जात आहेत. राज्यातील महिलांना या योजनेच्या माध्यमातून पाच महिन्यांचा 1500 रुपयांचा हफ्ता मिळाला आहे.

पियुष गोयल पुढे म्हणाले, पुढील पाच वर्षात त्या वयोगटातील प्रत्येक महिलेला दरवर्षी 1.25 लाख रुपये मिळतील, विरोधी महाविकास आघाडीने महालक्ष्मी योजनेच्या माध्यमातून दरमहा 3000 हजार रुपये देण्याचं आणि राज्य परिवहनच्या एसटीत मोफत प्रवासाची सुविधा देणार असल्याचं आश्वासनं दिलंय.

पैसे कधी येणार पाहण्यासाठी येथे क्लिक करा

आता महिलांना औपचारिक अर्थव्यवस्थेत नेण्याची आवश्यकता आहे. महायुती महाराष्ट्रात पुन्हा एकदा येईल, असा मला विश्वास आहे, गुरुवारी सीएनबीसी टीव्ही 18 ग्लोबल लीडरशीप समिट 2024 मध्ये गोयल यांनी म्हटलं की, शरद पवारांच्या गटात हवा बदलताना दिसत आहे.

भारताला 2047 पर्यंत विकसीत भारत बनवण्यासाठी महायुतीचं सरकार पुन्हा येईल, असा मला विश्वास आहे. जनगणना प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर लोकसभा आणि राज्य विधानसभेत 33 टक्के महिला खासदार असतील. मुख्यमंत्रीपदाच्या उमेदवाराबाबत गोयल म्हणाले, आम्ही निवडणूक संपल्यावर निर्णय घेऊ अशी माहिती दिली.

लाडक्या बहिणीला लखपती करणार

या योजनेच्या विरोधात काँग्रेससह व महाविकास आघाडीचे काही लोक न्यायालयात गेले आहेत. पण आम्ही आमच्या लाडक्या बहि‍णींसाठी फक्त 1500 रुपयेच नाही तर, त्यामध्ये वाढ करून आमच्या बहि‍णींना आम्ही येत्या काही दिवसात लखपती करू असे शिंदे म्हणाले.

एएनआयला दिलेल्या मुलाखतीत शिंदे यांनी विरोधकांचा चांगलाच समाचार घेतला, यावेळी ते म्हणाले, केंद्राने 1 रुपया दिला तर शेवटी येईपर्यंत लोकांना त्यातील15 पैसे मिळतात. मात्र आता मोदींनी 1 रुपया दिल्यावर शेवटच्या नागरिकाला एक रुपयाच मिळतो.

आम्ही सर्व मार्गदर्शक तत्वच पालन करुन या योजनेची अंमलबजावणी करत आहोत, कोणीही मायका लाल आला तरी हि योजना बंद करु शकणार नाही. या योजनेमुळे विरोधक पुरते घाबरले आहेत. ते म्हणतात, हि योजना आम्ही बंद करु आणि सत्ताधार्यांना तुरूंगात टाकू, पण अशा विरोधकांना माझ्या लाडक्या बहिणी येणाऱ्या विधानसभेच्या निवडणुकीत घरी बसवतील.

पैसे कधी येणार पाहण्यासाठी येथे क्लिक करा