Ladki Bahin Yojana Update : राज्याच्या विधानसभा निवडणुकीत “माझी लाडकी बहीण योजना” गेम चेंजर ठरली, जुलै 2024 मध्ये अर्थमंत्री व उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी विधानसभेच्या पावसाळी अधिवेशनामध्ये हि योजना अंमलात आणली.
या योजनेचे आतापर्यंत 5 हप्ते पात्र महिलांच्या खात्यात जमा झाले आहेत त्यामुळे आता पुढचा हप्ता कधी मिळणार याची प्रतीक्षा महिलांना आहे शिंदे सरकारने विधानसभेच्या निवडणुकीपूर्वी सुरू केलेली ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना’ महिला मतदारांमध्ये खूप लोकप्रिय ठरली आहे.
या योजनेअंतर्गत राज्यातील महिलांना दर महिन्याला 1500 रुपये चा आर्थिक लाभ देण्यात येतो. महिलांना आर्थिक पाठबळ देण्यासाठी ही योजना सुरू करण्यात आली असली, तरी तिच्यावर राजकीय वर्तुळात वेगवेगळ्या प्रतिक्रिया उमटत होत्या. दरम्यान महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत महायुतीला या योजनेमुळे मोठा कल मिळाला आहे. त्यामुळे आता लाडक्या बहणीचे पैसे कधी येणार, असा प्रश्न विचारला जात आहे.
‘माझी लाडकी बहीण’ योजना हा केवळ राजकीय डावपेच नसून महिलांसाठी आर्थिक बळकटीचा स्त्रोत आहे, हे दाखविण्याचे आव्हान आता महायुती सरकारपुढे आहे.
निवडणुकीमध्ये योजनेची भूमिका
महायुती सरकारच्या या योजनेवर विरोधकांनी टीका करताना ही योजना फक्त महिला मतदारांना आकर्षित करण्यासाठी सुरू केली आहे असा आरोप केला होता. तसेच, ही योजना जास्त दिवस टिकणार नाही, असे भाकीत देखील केले होते. मात्र, विधानसभा निवडणुकीत महायुतीला मोठा प्रतिसाद मिळाल्यानंतर महिलांमध्ये आनंदाचे खूप वातावरण आहे.
आता, लाडक्या बहिणींना दिलेला शब्द पाळणार का? असा प्रश्न महिलांनी उपस्थित केला आहे. तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी प्रचारादरम्यान या संदर्भात स्पष्ट आश्वासन दिले होते.
हप्ता कधी मिळेल?
प्रचारादरम्यान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले होते, “ही योजना फक्त घोषणांसाठी नाही आम्ही या योजनेसाठी पूर्ण आर्थिक नियोजन केले आहे. 20 नोव्हेंबर रोजी मतदान होईल आणि 23 नोव्हेंबरला निवडणुकीचा निकाल लागल्यानंतर डिसेंबर महिन्याचा हप्ता सरळ खात्यात टाकला जाईल.
याशिवाय, पुढील कालावधीसाठीही पुरेसे नियोजन केले आहे मुख्यमंत्री शिंदे यांनी आणखी एक महत्त्वाची घोषणा केली. “आम्ही फक्त 1500 रुपये देणार नाहीत, तर योजनेचा लाभ वाढवून 2100 रुपये करणार आहोत,” असे ते बोलले होते.
जाहीर सभेत मोठ्या घोषणा
महायुतीच्या प्रचारादरम्यान, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी कोल्हापूरमध्ये महिलांसाठी 10 मोठ्या घोषणा केल्या. त्यापैकी सर्वात महत्त्वाची घोषणा म्हणजे ‘लाडकी बहीण’ योजनेत दर महिन्याचा हप्ता 1500 वरून 2100 रुपये करण्यात येणार.
महिला सुरक्षेला प्राधान्य देत मुख्यमंत्री म्हणाले, “राज्यातील महिलांच्या सुरक्षिततेसाठी 25000 महिलांची पोलीस दलात भरती करण्यात येईल महिला सक्षमीकरणासाठी सरकार नेहमी पुढाकार घेईल.”
लाडक्या बहिणींना वाढीव रक्कम देण्याचे उद्दिष्ट
महायुती सरकारने महिलांच्या आर्थिक सक्षमीकरणासाठी अनेक योजना सुरू केल्या आहेत. ‘लाडकी बहीण योजना’ ही त्यातील एक महत्त्वाकांक्षी योजना असून ती महिलांच्या आर्थिक स्वावलंबनासाठी प्रभावी ठरणार आहे.
महायुतीच्या योजनेवर महिलांचा विश्वास?
राजकीय वर्तुळात टीकेच्या झळा सहन करत, महायुती सरकारने महिलांसाठी खास योजना सादर केल्या आहेत. महिला मतदारांसाठी ‘लाडकी बहीण’ योजना ही केवळ निवडणुकीपुरती मर्यादित राहणार नसून तिचा फायदा आगामी काळातही मिळत राहील, अशी अपेक्षा संपूर्ण महिला वर्गामध्ये आहे.