Land Documents : भूमी अभिलेख खात्याकडून जमिनीच्या नकाशामध्ये मोठे बदल करण्यात आले असून तुम्ही तुमचा नवीन नकाशा खाली दिलेल्या लिंकवरून पाहू शकता.
शेतकरी बंधुनो, आपल्याला जर, जमिनीशी संबंधित कोणताही खरेदी विक्रीचा व्यवहार करायचा असल्यास, त्या जमिनीचा पूर्वीचा इतिहास माहीत असणे महत्त्वाचे असते.

जमिनीचा नकाशा पाहण्यासाठी येथे क्लिक करा
तर हा जमिनीचा इतिहास म्हणजे नेमकं काय? तर ती जमीन कोणाच्या नावावर होती? आणि दिवसेंदिवस त्या जमिनीचा अधिकार, अभिलेखात काय काय बदल होत गेले, याची संपूर्ण सविस्तर माहिती आपल्याला असणे आवश्यक असते.
आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की, ही सर्व माहिती कुठे असते. तर हे सर्व माहिती तहसीलदार कार्यालयात किंवा भूमी अभिलेख कार्यालयात उपलब्ध असते, येथे सातबारा उतारा खाते उतारा फेरफार या पत्रिकांमध्ये ही माहिती नमूद केलेली असते.
आता शेतकरी मित्रांसाठी एक खुशखबर आहे, म्हणजेच महाराष्ट्र सरकारने ही सर्व प्रकारची सेवा आता ऑनलाईन पद्धतीने उपलब्ध करून दिली आहे, महाराष्ट्र सरकारच्या ई अभिलेख या प्रकल्प अंतर्गत म्हणजेच या कार्यक्रमाद्वारे राज्यातील सगळ्या जिल्ह्यातल्या 30 कोटी अभिलेख उताऱ्यांचे संगणकीकरण करण्याचा निर्णय घेतला आहे.
(Land Documents) ऑनलाईन पहा
आता सर्व प्रकारचे फेरफार उतारे सरकार ऑनलाईन उपलब्ध करून देत आहे पण हे उत्तरे ऑनलाईन कसे पाहायचे याची माहिती आपण आता पाहणार आहोत, या जमिनीचा अधिकार अभिलेखांमध्ये कोणाकडे आहे त्या जमिनीचे काय झाले आहे? त्या जमिनीचा व्यवहार झाला आहे का झाला असेल तर कोणा कोणा मध्ये झाला आहे, तो व्यवहार कधी झाला आहे याची सविस्तर माहिती यामध्ये दिलेली आहे. या जमिनीचा सातबारा उतारा आणि आठ अ इत्यादी सुद्धा पाहू शकता.

जमिनीचा नकाशा पाहण्यासाठी येथे क्लिक करा
सातबारा, गाव नकाशा, ८- अ या शब्दांसारखाच जमिनीशी निगडित ऐकण्यात येणारा शब्द म्हणजे ‘फेरफार’. जमिनीचा फेरफार म्हणजे गाव नमुना-६ होय.
Created By – Manoj Mahale, Date- 23.01.2025
Discover more from Job Placement
Subscribe to get the latest posts sent to your email.