अर्ज करण्यासाठीची महत्वाची सूचना –
1. ऑनलाईन अर्जामध्ये उमेदवाराने त्यांच्या पात्रतेनुसार काळजीपूर्वक संपूर्ण अचूक व खरी माहिती भरणे आवश्यक व बंधनकारक आहे. ऑनलाईन पद्धतीने अर्ज भरताना काही चुका झाल्यास किंवा त्रुटी राहिल्यास किंवा दिशाभूल करणारी माहिती दिली गेल्यामुळे भरतीच्या कोणत्याही टप्प्यावर अर्ज नाकारला गेल्यास त्याची सर्वस्वी जबाबदारी संबंधित उमेदवाराची राहील. याबाबत उमेदवाराची कसल्याही स्वरुपाची तक्रार विचारात घेतली जाणार नाही. ऑनलाईन अर्जात भरलेली माहिती अर्ज सादर केल्यानंतर बदलता येणार नाही. त्यामुळे ऑनलाईन अर्जाची माहिती उमेदवारांनी काळजीपूर्वक भरावी. जाहिरातीमध्ये नमूद केलेल्या सर्व अटी, शैक्षणिक अर्हता व मागणीनुसार आरक्षण, वयोमर्यादा शिथिलीकरण वगैरेची पात्रता तपासूनच ऑनलाईन अर्ज भरावा.
2. ऑनलाईन अर्ज प्रक्रियेच्या सर्व टप्प्यातील माहिती परिपूर्ण भरुन विहित परीक्षा शुल्क भरलेल्या उमेदवारांची स्थिती, परीक्षेची रुपरेषा/वेळापत्रक/परीक्षाकेंद्र / बैठक क्रमांक इ. बाबतची माहिती संकेतस्थळावर उपलब्ध राहिल. याबाबत स्वतंत्र पत्रव्यवहार केला जाणार नाही.
3. उमेदवाराला परीक्षा तसेच कागदपत्रे पडताळणीसाठी सर्व संबंधित ठिकाणी स्वखर्चाने उपस्थित राहावे लागेल.
![]()
| PDF जाहिरात | येथे क्लिक करा |
| ऑनलाईन अर्ज | येथे क्लिक करा |