Pimpri Chinchwad Pune Bharti : पिंपरी चिंचवड पुणे स्मार्ट सिटी अंतर्गत लेखापाल पदांसाठी भरती;परीक्षा नाही,पगार 40000 रुपये दरमहा

Pimpri Chinchwad Pune Bharti : पिंपरी चिंचवड स्मार्ट सिटी अंतर्गत विविध पदे भरण्यासाठी जाहिरात प्रकाशित करण्यात आली असून यासाठी इच्छुक तसेच पात्र उमेदवारांकडून ऑफलाइन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत.

हे अर्ज 22 ऑगस्ट 2024 पर्यंत संध्याकाळी चार वाजेच्या आत पाठवणं बंधनकारक असेल पिंपरी चिंचवड पुणे येथे तरुण उमेदवारांना नोकरीची चांगली संधी उपलब्ध झाली आहे.

व्हाट्सअप ग्रुप जॉईन व्हा
टेलिग्राम ग्रुप जॉईन व्हा

इच्छुक उमेदवाराने खालील दिलेली संपूर्ण जाहिरात वाचावी व जाहिरातीमधील अर्जाचा विहित नमुना डाऊनलोड करून तो नमुना नमूद केलेल्या पत्त्यावर अंतिम तारखेच्या अगोदर पाठवणे बंधनकारक राहील.

पदांचा तपशील (Post Details Pimpri Chinchwad Pune Bharti)

लेखापाल -01 जागा

शैक्षणिक पात्रता

मान्यता प्राप्त विद्यापीठातून कॉमर्समधून पदवी आणि चार्टर्ड अकाउंट चे वैध मेंबरशिप असणे आवश्यक आहे यासोबतच कमीत कमी शून्य ते दोन वर्षाचा अकाउंटिंग किंवा फायनान्स मधील अनुभव व कम्प्युटर मधील एम एस ऑफिस टॅली व्यवस्थित रित्या हाताळता येणे आवश्यक आहे.

व्हाट्सअप ग्रुप जॉईन व्हा
टेलिग्राम ग्रुप जॉईन व्हा

वयोमर्यादा

जाहिरात प्रकाशित झालेल्या तारखेस जास्तीत जास्त 35 वर्ष

पगार (Salary Pimpri Chinchwad Pune Bharti)

निवड झालेल्या उमेदवाराला दरमहा 30000 ते 40000 या दरम्यान पगार देण्यात येईल उमेदवाराच्या मुलाखतीवर पगार ठरवलं जाईल.

अर्ज करण्याची पद्धत

इच्छुक तसेच पात्र उमेदवराने विहित नमुन्यात खाली दिलेल्या पत्त्यावर अर्ज सादर करायचा आहे अर्ज करण्याची पद्धत ऑफलाईन असून पोस्टाने अथवा कुरिअरने अर्ज पाठवू शकणार आहात.

अर्ज पाठवण्याचा पत्ता

द चीफ एक्झिक्युटिव्ह ऑफिसर, पिंपरी चिंचवड स्मार्ट सिटी लिमिटेड, पीसीएससीएल ऑफिस, दुसरा मजला, ऑटो क्लस्टर बिल्डिंग, प्लॉट नंबर १८१, एमआयडीसी चिंचवड, चिंचवड, पुणे – 411 019

अर्ज करण्याची अंतिम तारीख

इच्छुक तसेच पात्र उमेदवारांनी 22 ऑगस्ट 2024 पर्यंत संध्याकाळी 4 वाजेच्या आत अर्ज पाठवावेत.

निवड प्रक्रिया (Smart City Pimpri Chinchwad Pune Bharti)

प्राप्त झालेल्या अर्जाची पडताळणी करून पात्र उमेदवारास मुलाखतीस बोलवण्यात येईल व त्याद्वारे उमेदवाराची निवड करण्यात येईल.

अर्ज सोबत पाठवायची कागदपत्रे

  • व्यवस्थितरित्या भरलेला अर्ज
  • दहावीचे गुणपत्रक व प्रमाणपत्र
  • बारावीचे गुणपत्रक व प्रमाणपत्र
  • पदवीचे गुणपत्रक व प्रमाणपत्र
  • अनुभव प्रमाणपत्र
  • आधार कार्ड/पॅन कार्ड ची साक्षांकित प्रत
  • CA नोंदणी प्रमाणपत्र

उमेदवारासाठी सूचना

  • अर्ज करण्या अगोदर व्यवस्थितरित्या जाहिरात याचा सादर (Pimpri Chinchwad Smart City Pune Bharti) करावा.
  • आवश्यक असलेले कागदपत्र नसलेला, अपूर्ण भरलेला अर्ज ग्राह्य धरल्या जाणार नाही.
  • अंतिम दिनांकानंतर आलेला अर्ज स्वीकारला जाणार नाही याची उमेदवारांनी नोंद घ्यावी.
  • पदांमध्ये बदल करण्याचा, रद्द करण्याचा अधिकार चीफ एक्सएक्युटीव्ह ऑफिसर यांनी राखून ठेवलेला आहे.

मूळ जाहिरात व अर्जाचा नमुना : डाऊनलोड करा

हे ही वाचा…

Navi Mumbai Mahanagarpalika Bharti : नवी मुंबई महानगरपालिकेत विविध पदांसाठी भरती; पगार 64551 रुपये