PMC Recruitment 2025 : महानगरपालिकेत सरकारी नोकरी शोधणाऱ्या उमेदवारांसाठी मोठी सुवर्णसंधी उपलब्ध झाली आहे,पुणे महानगरपालिकेमध्ये विविध पदांसाठी भरतीची नवीन जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली आहे.
पुणे येथे चांगली जॉबची संधी आली आहे. यासाठी इच्छुक व पात्र उमेदवारांनी सविस्तर जाहिरात वाचून ऑफलाईन पद्धतीने आवश्यक त्या सर्व कागदपत्रांसह दिलेल्या तारखे अगोदर अर्ज सादर करायचे आहेत.
PMC Recruitment 2025 Details
◾भरतीचा विभाग : हि भरती पुणे महानगरपालिके मध्ये निघाली आहे,विविध पदांसाठी भरतीची जाहिरात प्रकाशित करण्यात आली आहे.
◾भरतीचा प्रकार : सरकारी नोकरीची संधी.
◾पदांचे नाव : विविध पदांसाठी भरती आहे (मूळ जाहिरात वाचावी)
◾शैक्षणिक पात्रता : पदानुसार शैक्षणिक पात्रता असून उमेदवाराने जाहिरात वाचून अर्ज सादर करावा.
◾अर्ज करण्याची पद्धत : ऑफलाईन पद्धतीने अर्ज सादर करायचा आहे.
◾वयोमर्यादा : जास्तीत जास्त 60 वर्ष (शिथिलतेसाठी मूळ जाहिरात वाचावी)
🔺वरील लेखात माहिती अर्धवट असू शकते संपूर्ण माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात काळजीपूर्वक वाचावी व अर्ज सादर करावा या भरतीद्वारे होणाऱ्या कोणत्याही नुकसानीस आम्ही जबाबदार नाही.
पदांचे नाव व आवश्यक अर्हता (PMC Bharti Post Details)
▪️बालरोगतज्ज्ञ – 11 जागा
1]शैक्षणिक पात्रता: मान्यताप्राप्त विद्यापीठातून MD Pead / DNB / DCH उत्तीर्ण आवश्यक.
2]अनुभवी उमेदवारास प्राधान्य देण्यात येईल.
3]दरमहा उमेदवाराला 35000 रुपये एवढे मानधन देण्यात येईल.
▪️प्रसूती व स्त्री रोगतज्ज्ञ – 12 जागा
1]शैक्षणिक पात्रता: मान्यताप्राप्त विद्यापीठातून MD / MS Gyn / DNB /DGO उत्तीर्ण आवश्यक.
2]अनुभवी उमेदवारास प्राधान्य देण्यात येईल.
3]दरमहा उमेदवाराला 32000 रुपये एवढे मानधन देण्यात येईल.
इतर आवश्यक माहिती (PMC Bharti other information)
◾नोकरीचे ठिकाण : पुणे, महाराष्ट्र
◾निवड प्रक्रिया : शिक्षण,अनुभव व प्राप्त गुणांवर आधारित गुणांकन पद्धतीने निवड केल्या जाईल.
◾अर्ज स्वीकारण्याची शेवटची तारीख : 28 जानेवारी 2025 पर्यंत अर्ज स्वीकारले जातील.
◾पत्ता : इंटिग्रेटेड हेल्थ अँड फॅमिली वेल्फेअर सोसायटी फॉर पुणे म्युनिसिपल कॉर्पोरेशन नविन इमारत (कोव्हीड वॉर रूम), ४ था मजला, पुणे महानगरपालिका, पुणे ४११००५
◾आवश्यक कागदपत्रे : अर्जा सोबत जन्म तारखेकरीता (वयाचा दाखला/दहावीची टीसी, जन्म प्रमाणपत्र), फोटो आयडी, रहिवाशी दाखला, शैक्षणिक अर्हता प्रमाणपत्र (शेवटच्या वर्षाची गुणपत्रिका, रजिस्ट्रेशन प्रमाणपत्र, अतिरिक्त शैक्षणिक अर्हतेची MMC नोंदणी प्रमाणपत्र, नोंदणी नुतनीकरण प्रमाणपत्र, अनुभव प्रमाणपत्र, जातीचे प्रमाणपत्र,
◾अधिकृत संकेतस्थळ : https://www.pmc.gov.in/
महत्वाच्या सूचना (PMC Jobs important Instruction)
◾अर्जात स्वतःचे नाव, जन्म दिनांक, भ्रमणध्वनी क्रमांक व ईमेल आयडी इत्यादी माहिती काळजीपूर्वक भरावी. शासकीय, निमशासकीय संस्थामध्ये केलेल्या कामाचे अनुभव प्रमाणपत्र यामध्ये राष्ट्रीय आरोग्य अभियान मध्ये काम केलेल्या उमेदवारांना प्राधान्य देण्यात येईल. सद्याचा पासपोर्ट साईज फोटोसह अर्ज सादर करावा.
◾उमेदवारांकडून सदर अर्ज अर्धवट, अपूर्ण, वाचण्यायोग्य नसलेला अर्ज सादर केला असल्यास संबंधित उमेदवाराचा अर्ज नाकारला गेल्यास अथवा अपात्र ठरला गेल्यास त्याबाबतची सर्वस्वी जबाबदारी संबंधित उमेदवारांची राहिल. याबाबत उमेदवारांकडून कोणत्याही स्वरुपाची तक्रार स्वीकारली जाणार नाही.
◾महिला उमेदवारांनी त्यांच्या नावात काही बदल असल्यास (लग्नापूर्वीचे नाव, लग्नानंतरचे नाव) त्या संदर्भात आवश्यक कागदपत्रे, विवाह नोंदणी दाखला जमा करणे आवश्यक आहे.
◾सदर भरतीची प्रक्रिया पुर्ण झालेनंतर भविष्यात एखादया ठिकाणी कर्मचारी यांनी राजीनामा दिलेमुळे जागा रिक्त झालेस प्रतिक्षा यादीतील पुढील उमेदवारास नविन भरती प्रक्रिया न करता नियुक्ती आदेश दिले जातील, सदर अंतिम यादी ही तयार झालेनंतर पुढील 01 वर्षासाठी वैध राहील.
PDF जाहिरात व अर्जाची लिंक (PMC Vacancies Advertisement & Application)
💻ऑनलाईन अर्ज | येथे क्लिक करा |
📑PDF जाहिरात | येथे क्लिक करा |
🖱️अधिक माहिती | येथे क्लिक करा |
Discover more from Job Placement
Subscribe to get the latest posts sent to your email.