SIDBI Recruitment 2024 : भारतीय लघु उद्योग विकास बँकेमध्ये विविध पदासाठी भरतीची जाहिरात प्रकाशित करण्यात आलेली असून या पदभरती मध्ये ऑनलाईन पद्धतीने अर्ज सादर करायचे आहेत, हे अर्ज 08 नोव्हेंबर पासून 02 डिसेंबर 2024 पर्यंत स्वीकारल्या जाणार आहेत.
या पदभरती मध्ये असिस्टंट मॅनेजर ग्रेडA व मॅनेजर ग्रेड बी या पदाचा समावेश असणार आहे, एकूण 72 पदासाठी पदभरती राबविण्यात येत असून असिस्टंट मॅनेजर ग्रेड A या पदासाठीच्या 50 रिक्त जागा आहेत तर मॅनेजर ग्रेड बी या पदांसाठी 22 रिक्त जागांचा समावेश राहणार आहे.
विविध संवर्गासाठी रिक्त जागाचा तपशील जाहिरातीमध्ये दिलेला आहे, सिडबीच्या या रिक्त जागांसाठी फक्त ऑनलाईन पद्धतीने अर्ज सादर करायचे असून इतर पद्धतीने आलेल्या अर्ज ठिकाणी स्वीकारले जाणार नाही याची उमेदवाराने नोंद घ्यायची आहे.
अनुसूचित जाती/जमाती इतर मागासवर्गीय उमेदवार, आर्थिक दृष्ट्या दुर्बल घटकातील उमेदवार तसेच अपंग उमेदवारासाठी वेळोवेळी शासनाने जाहीर केल्यानुसार आरक्षण उपलब्ध राहणार आहे. या पदभरती मध्ये अर्ज करणाऱ्या उमेदवारांचे कमीत कमी वय 21 वर्ष असावे तर जास्तीत जास्त वय 33 वर्षापर्यंत दाखवण्यात आलेले आहे.
PDF जाहिरात | येथे क्लिक करा |
अधिक माहिती | येथे क्लिक करा |
तुम्ही या वयोमर्यादेमध्ये बसत असाल तर या ठिकाणी अर्ज करू शकता देण्यात वयाच्या शिथिलतेसाठी मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचावी, यामध्ये तुम्ही भारतीय नागरिक असणे आवश्यक आहे व तुम्ही कॉमर्स, इकॉनॉमिक्स, मॅथेमॅटिक्स मध्ये पदवी धारण केलेली असणे गरजेचे आहे.
हे पदवीचे शिक्षण तुम्ही 60 टक्के मार्कसह उत्तीर्ण झालेल्या असणं गरजेचे असेल किंवा तुम्ही सीएस, सीए किंवा एमबीए केलेल्या असल्यास या ठिकाणी अर्ज सादर करू शकणार आहात. या पदभरती मध्ये निवड प्रक्रिया परीक्षेद्वारे होणार आहे.
सर्वप्रथम फेज वन ची पूर्व एक्झाम होईल व त्यानंतर निवड झालेल्या उमेदवाराची फेज टू मधील एक्झाम घेण्यात येईल या परीक्षेमध्ये मिळालेल्या गुणांनुसार उमेदवाराची निवड या ठिकाणी करण्यात येणार आहे,अर्जासोबत विविध प्रकारचे कागदपत्र तुम्हाला जोडायचे आहेत. त्यामध्ये जाहिरातीमध्ये सांगितलेले सर्व कागदपत्रे असणे आवश्यक आहे.
अर्ज करतेवेळी उमेदवाराला परीक्षा शुल्क व अर्जाचे शुल्क म्हणून काही रक्कम भरायचे आहे त्यामध्ये अनुसूचित जाती जमाती व अपंग उमेदवाराला 175 रुपये आहे तर इतर उमेदवारांसाठी 1100 रुपये शुल्क भरावे लागणार आहे अर्ज कसा करावा यावीची सविस्तर माहिती जाहिरातीमध्ये पहावी जाहिरातीची लिंक दिलेली आहे.