Thane Mahanagarpalika Jobs 2024 : ठाणे महानगरपालिकेमध्ये विविध पदे भरण्यासाठी जाहिरात प्रकाशित करण्यात आली असून इच्छुक तसेच पात्र उमेदवाराने ऑफलाइन पद्धतीने जाहिरातीमध्ये दिलेल्या विहित नमुन्यात अर्ज सादर करायचे आहेत.
हे अर्ज 07 सप्टेंबर 2024 पर्यंत सादर करणे आवश्यक असेल, नमूद केलेल्या तारखेनंतर आलेले अर्ज स्वीकारले जाणार नाहीत याची नोंद घ्यावी.
◾पदांचा तपशील
- वैद्यकीय अधिकारी -12 जागा
- परिचारिका महिला – 11 जागा
- परिचारिका पुरुष – 01 जागा
- बहुउद्देशीय कर्मचारी -12 जागा
◾शैक्षणिक पात्रता
- वैद्यकीय अधिकारी – एमबीबीएस तसेच सरकारी निमसरकारी क्षेत्रातील कामाचा अनुभव आवश्यक.
- परिचारिका महिला व पुरुष – बीएस्सी नर्सिंग
- बहुउद्देशीय कर्मचारी : बारावी पास तसेच पॅरामेडिकलचा बेसिक ट्रेनिंग कोर्स किंवा सॅलिटरी इन्स्पेक्टरचा कोर्स झालेला असणे आवश्यक.
◾वयोमर्यादा : कमीत कमी 18 वर्षे व जास्तीत जास्त 65 वर्ष
◾मानधन : निवड झालेल्या उमेदवाराला कमीत कमी 18 हजार ते जास्तीत जास्त 60 हजार रुपये पर्यंत पदानुसार मानधन दिले जाणार आहे, पदाकरिता सविस्तर मानधन जाहिरातीमध्ये दिलेले आहे, उमेदवारांनी जाहिरात वाचावी व त्यानंतर अर्ज सादर करावा.
◾अर्ज करण्याची पद्धत : उमेदवाराने तर खालील लिंक वर अर्ज करण्यासाठीचा गुगल फॉर्म ची लिंक दिलेली आहे उमेदवारांनी त्या लिंक वर जाऊन अर्ज सादर करावा.
◾अर्ज सादर करण्याचा कालावधी : इच्छुक तसेच पात्र उमेदवाराने 29 ऑगस्ट 2024 ते 7 सप्टेंबर 2024 पर्यंत अर्ज सादर करावेत.
◾अर्ज सादर करण्याचा पत्ता : इच्छुक तसेच पात्र उमेदवाराने विहित नमुन्यातील अर्ज ठाणे महानगरपालिका भवन, सरसेनानी जनरल अरुण कुमार वैद्य मार्ग, चंदनवाडी, पाच पाखडी, ठाणे, पश्चिम -400201 येथे सादर करावेत.
◾अर्जाचे शुल्क : अर्ज सोबत उमेदवाराला राष्ट्रीयकृत बँकेचा धनाकर्षण सोबत जोडायचा आहे खुल्या प्रवर्गातील उमेदवारा करिता दीडशे रुपये व राखीव प्रवर्गातील उमेदवारांकरिता शंभर रुपये रकमेचा धनाकर्ष इंटिग्रेटेड हेल्थ अँड फॅमिली वेल्फेअर सोसायटी ठाणे या या नावाने काढून अर्ज सोबत पाठवायचा आहे.
◾निवड प्रक्रिया : उमेदवाराची निवड थेट मुलाखतीद्वारे व गुणांकन पद्धतीने होणारा असून प्राप्त झालेल्या अर्जाची पडताळणी करून पुढची प्रक्रिया केली जाणार आहे.
◾उमेदवारासाठी सूचना
- उमेदवाराने स्वतः पूर्ण नाव माध्यमिक शाळा प्रमाणपत्र का प्रमाणेच अचूकपणे नोंदवावे.
- अर्जासोबत माध्यमिक शालांत परीक्षा प्रमाणपत्राची प्रत जोडावी, माध्यमिक शालांत परीक्षा प्रमाणपत्र मध्ये नमूद जन्मतारीख अर्जामध्ये नमूद करावी.
- अर्जात उमेदवाराची लिंग याबाबतची माहिती नमूद करणे आवश्यक आहे तसेच अंतिम वर्षाच्या सीजीपीएस ग्राह्य धरण्यात येणार नाहीत.
- अर्ज करीत असताना अर्जदार विवाहित असल्यास विवाह नोंदणी प्रमाणपत्र तसेच नाव बदल असल्यास गॅझेट अर्ज सोबत जोडणे आवश्यक आहे.
- गुगल फॉर्म परिपूर्ण भरल्यानंतर त्याची प्रिंट काढावी पूर्ण भरलेल्या गुगल फॉर्मची प्रत, सर्व कागदपत्र एकत्र करून प्रत्यक्ष अथवा कुरियरने वर नमूद केलेल्या पत्त्यावर पाठवायचे आहे, टपालने कुरिअरने सादर केलेले अर्ज विहित कालावधीत या कार्यालयात पोहोचतील याची दक्षता उमेदवाराने घेणे आवश्यक असेल.
Thane Mahanagarpalika Bharti 2024
मूळ जाहिरात : डाऊनलोड करा
ऑनलाईन गुगल फॉर्म लिंक : येथे क्लिक करा
हे हि वाचा…
◾शासकीय विभागात 394 रिक्त जागांसाठी भरती; लगेचच अर्ज करा | MSRLM Bharti 2024
◾राष्ट्रीय केमिकल अँड फर्टिलायझर्स मुंबई येथे 12 वी पासवर भरती;पगार 60000 रुपये | RCFL Bharti 2024
◾जिल्हा परिषद पुणे अंतर्गत विविध पदांसाठी भरती; लगेचच करा अर्ज | ZP Pune Bharti
◾बृहन्मुंबई महापालिकेत ग्रंथपाल पदांसाठी मेगा भरती;लगेचच अर्ज करा | BMC Librarian Bharti