वसई विरार महानगरपालिकेत वैद्यकीय अधिकारी पदांसाठी 17 जागांवर मोठी भरती सुरु!

वसई विरार शहर महानगरपालिकेच्या कार्यक्षेत्रात महानगरपालिकेची रुग्णालये व माताबाल संगोपन केंद्रांसाठी वैद्यकीय अधिकारी स्त्रीरोग तज्ञ (पूर्णवेळ) पदव्युत्तर पदवी, वैद्यकीय अधिकारी शल्यचिकित्सक (पूर्णवेळ) पदव्युत्तर पदवी व वैद्यकीय अधिकारी एम.बी.बी.एस. पदवी उत्तीर्ण संवर्गातील रिक्त पदे कंत्राटी स्वरुपात करारपध्दतीने ६ महिन्याच्या कालावधीसाठी मानधन तत्वावर तात्पुरत्या स्वरुपात भरावयाची असल्याने विहित अर्हता धारण करणाऱ्या इच्छुक व पात्र उमेदवारांच्या थेट मुलाखत (Walk in Interview) दि.१८/०३/२०२५ रोजी सकाळी ११.०० ते दुपारी ३.०० वाजेपर्यंत वसई विरार शहर महानगरपालिका, मुख्य कार्यालय, सामान्य परीषद कक्ष, “ए” विंग, सातवा मजला, यशवंत नगर, विरार (प.) येथे घेण्यात येणार असुन आवश्यक कागदपत्रांच्या मूळप्रती व स्वसाक्षांकित सत्यप्रतीसह विहीत नमुन्यातील भरलेल्या अर्जासह उपस्थित राहावे. अर्जाचा नमुना वसई विरार शहर महानगरपालिकेच्या www.vvcmc.in या अधिकृत संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आला आहे.

व्हाट्सअप ग्रुप जॉईन व्हा
टेलिग्राम ग्रुप जॉईन व्हा
PDF जाहिरातयेथे क्लिक करा
अर्जाचा नमुनायेथे क्लिक करा