Yojana Doot Bharti 2024 : 50000 जागांसाठी योजना दूत भरती; GR आला !! पहा पगार,पात्रता व काम

Created By : Sanjana Yadav | Date : 10.08.2024

व्हाट्सअप ग्रुप जॉईन व्हा
टेलिग्राम ग्रुप जॉईन व्हा

Maharashtra Yojana Doot Bharti 2024 : महाराष्ट्र शासनाच्या कौशल्य रोजगार उद्योजकता व नाविन्यता विभागाने मुख्यमंत्री जनकल्याण कक्षांच्या मार्फत संयुक्तपणे मुख्यमंत्री युवा प्रशिक्षण योजना राबवण्यात येत आहे.

सदर शासन निर्णयातील परिच्छेद क्रमांक सहा नुसार महाराष्ट्र शासनाच्या विविध योजनांची प्रचार, प्रसिद्धी करणे व त्यांच्या जास्तीत जास्त नागरिकांना लाभ पोहोचण्यासाठी 50000 योजनादूत भरणार आहेत.

व्हाट्सअप ग्रुप जॉईन व्हा
टेलिग्राम ग्रुप जॉईन व्हा

महाराष्ट्र शासनाच्या विविध योजनांचा प्रचार प्रसिद्धी करणे व त्यांचे जास्तीत जास्त नागरिकांना लाभ मिळण्याचे दुरुस्तीने त्यांना साहाय्य करण्यासाठी 50000 योजनादूत भरती करण्यात येत आहेत, मुख्यमंत्री योजनादूत कार्यक्रमांतर्गत ही भरती करण्यात येणार आहे.

तपशील (Vacancies for Yojana Doot Bharti 2024)

योजनादूत – 50000 जागा

पात्रतेचे निकष

  • वयोमर्यादा 18 ते 35 असणारे उमेदवार अर्ज करू शकतील शिक्षण उमेदवार मान्यता प्राप्त विद्यापीठातून कोणत्याही शाखेचा पदवीधर असावा तसेच संगणक ज्ञान असणे आवश्यक आहे.
  • उमेदवाराकडे अद्यावत मोबाईल असणे आवश्यक आहे, उमेदवार महाराष्ट्रचा अधिवासी असणे आवश्यक आहे.
  • उमेदवारांच्या आधार कार्ड असावे त्यांच्या नावाने बँक खाते आधार संलग्न असावे.
  • ग्रामीण भागात प्रत्येक(Apply Yojana Doot Bharti 2024)  ग्रामपंचायत साठी एक व शहरी भागात 5000 लोकसंख्येसाठी एक योजनादूत या प्रमाणात 50 हजार योजनादूतची निवड करण्यात येणार आहे.
  • मुख्यमंत्री योजनादूत मध्ये निवड झालेल्या उमेदवाराला प्रत्येकी 10,000 प्रति महिना एवढं ठोक मानधन देण्यात येईल. प्रवास खर्च व सर्व भत्ते यामध्ये समाविष्ट असते.
  • निवड झालेल्या मुख्यमंत्री योजना सहा महिन्याचा करार केला जाईल व हा करार कोणत्याही परिस्थितीत वाढवण्यात येणार नाही.

आवश्यक कागदपत्रे (Required Documents for Yojana Doot Bharti 2024)

  • या योजनेत अर्ज करण्यासाठी उमेदवाराला विहित नमुन्यातील मुख्यमंत्री योजना दूत ऑनलाईन अर्ज करावा लागेल.
  • आधार कार्ड
  • पदवीधर असल्या बाबतचे पुरावे.
  • आधीवासाचा दाखला
  • वैयक्तिक बँक खात्याचा तपसिल
  • पासपोर्ट साईज फोटो
  • ऑनलाइन अर्जाचा नमुन्यातील हमीपत्र भरणे आवश्यक असेल.

योजना दुताची कामे

  • योजना दुत संबंधित जिल्हा माहिती अधिकारी यांचा संपर्क साधून जिल्ह्यात योजना ची माहिती घेतील प्रशिक्षित योजना दूतांना नेमून दिलेल्या ठिकाणी समक्ष जाऊन त्यांना ठरवून दिलेले काम पार पाडणे त्यांच्या बंधनकारक राहील.
  • योजना दूत राज्य शासनाच्या विविध योजनांची प्रचार आणि प्रसिद्धी करताना ग्राम पातळीवर नियंत्रणाचे समन्वय करून शासनाच्या योजनांची घरोघरी माहिती दिली यासाठी प्रयत्न करतील.
  • योजना दर दिवशी त्यांनी दिवसभर केलेल्या कामाचा विहित नमुना इतर माहिती तयार करून तो ऑनलाइन अपलोड करतील.
  • योजनादूत सोपविला जबाबदारीचा स्वतःचा स्वार्थासाठी नियमबाह्य कामासाठी उपयोग करणार नाही तसेच ते गुन्हेगारी स्वरूपाचे गैरवात वर्तन करणार नाहीत.
  • योजना दूत तसे करत असल्यास निदर्शनास आल्यास त्यांच्यासोबत करण्यात (Apply for Yojana Doot Bharti 2024) आलेल्या करार संपुष्टात आणण्यात येऊन त्यांच्या जबाबदारीतून मुक्त करण्यात येईल.
  • योजनादूत गैरहजर राहिल्यास किंवा जबाबदारी सोडून गेले असताना मानधन अनुज्ञेय राहणार नाही योजना दुताच्या भरतीसाठी शासन निर्णय जाहीर झाला आहे.
  • इच्छुक तसेच पात्र उमेदवारांना यासाठी ऑनलाईन अर्ज करायचे आहेत ऑनलाईन अर्ज सुरू झाल्यानंतर आपल्या ग्रुप वर कळविण्यात येईल यासाठी टेलिग्राम तसेच व्हाट्सअप ग्रुपला फॉलो करायला विसरू नका.

शासन निर्णय : डाऊनलोड करा

हे ही वाचा…

Navi Mumbai Mahanagarpalika Bharti : नवी मुंबई महानगरपालिकेत विविध पदांसाठी भरती; पगार 64551 रुपये