Zilla Parishad Bharti 2024 : जिल्हा परिषदेमध्ये विविध पदांसाठी मोठी भरती; लगेचच अर्ज करा,पगार 56300 रुपये

Zilla Parishad Bharti 2024 : जिल्हा परिषद धुळे अंतर्गत जिल्हा एकात्मिक आरोग्य कुटुंब कल्याण सोसायटी धुळे येथे विविध पदासाठी भरतीची जाहिरात प्रकाशित करण्यात आली असून इच्छुक तसेच पात्र उमेदवारांकडून 9 ऑगस्ट 2024 पर्यंत ऑफलाइन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत.

व्हाट्सअप ग्रुप जॉईन व्हा
टेलिग्राम ग्रुप जॉईन व्हा

इच्छुक तसेच पात्र उमेदवार आणि अर्ज करण्याअगोदर खालील लिंक वर जाहिरात दिलेली आहे ती जाहिरात डाऊनलोड करा व्यवस्थित रित्या वाचावी आणि ऑफलाइन पद्धतीने अर्ज सादर करावा.

पदांचा तपशील

1.आयुष डी पी एम – 01 जागा

व्हाट्सअप ग्रुप जॉईन व्हा
टेलिग्राम ग्रुप जॉईन व्हा

शैक्षणिक पात्रता : आयुष आणि हेल्थकेअर मॅनेजमेंट मध्ये एमबीए किंवा पोस्ट ग्रॅज्युएट डिप्लोमा इन हॉस्पिटल मॅनेजमेंट यासोबतच संगणक चालवण्याचे ज्ञान असावे.

पगार : 35000 रुपये दरमहा

2.वैद्यकीय अधिकारी – 3 जागा

शैक्षणिक पात्रता : एमबीबीएस किंवा बी ए एम एस असावा.

पगार : एमबीबीएस – 60000 रुपये, बीएमएस 40000 रुपये

3.पब्लिक हेल्थ मॅनेजर – 01 जागा

शैक्षणिक पात्रता : एमबीबीएस किंवा बीएएमएस असावा.

पगार : 32000 रुपये दरमहा

अर्ज करण्याची पद्धत 

इच्छुक तसेच पात्र उमेदवाराने विहित नमुन्यातील अर्ज आवश्यक कागदपत्राच्या छायांकित प्रतिसह खालील दिलेल्या पत्त्यावर पाठवायचे आहेत.

अर्ज पाठवण्याचा पत्ता

विहित नमुन्यातील अर्ज संपूर्ण कागदपत्राच्या सत्यप्रती सह राष्ट्रीय आरोग्य अभियान, जिल्हा रुग्णालय आवार, साक्री रोड, धुळे येथे पाठवायचे आहेत, हे अर्ज पोस्टाने तेव्हा समक्ष जाऊन जमा करावेत.

अर्ज करण्याचा कालावधी

या पदभरतीसाठी 30 जुलै 2024 पासून 9 ऑगस्ट 2024 संध्याकाळी पाच वाजेपर्यंत अर्ज स्वीकारले जाणार आहेत त्यानंतर आलेल्या अर्ज विचारात घेतले जाणार नाहीत.

अर्जाचे शुल्क 

खुल्या प्रवर्गातील उमेदवारांनी 150 रुपये व राखीव प्रवर्गातील उमेदवारांनी 100 रुपयेचा डिमांड ड्राफ्ट डिस्टिक इंटिग्रेटेड हेल्थ अँड फॅमिली हेल्पर सोसायटी धुळे या नावाने काढायचे आहेत

वयोमर्यादा

अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय जाहिरात प्रसिद्ध झालेल्या दिवशी खुल्या प्रवर्गासाठी 38 वर्ष व मागासवर्गीयांसाठी 43 वर्ष राहील.

अर्ज सोबत जोडायची कागदपत्रे

  • शैक्षणिक अर्हते बाबतचे प्रमाणपत्र व गुणपत्रिका
  • जातीचे प्रमाणपत्र
  • शाळा सोडल्याचा/जन्म तारखेचा दाखला
  • पासपोर्ट आकाराचे दोन फोटो
  • शासकीय अनुभव असलेबाबतचे प्रमाणपत्र
  • लहान कुटुंबाचे प्रमाणपत्र
  • पोलीस कार्यालयाच्या चारित्र्य पडताळणी प्रमाणपत्र दाखला इत्यादी पाठवणे आवश्यक आहे.

उमेदवारासाठी सूचना 

  • जाहिरातीतील पदे राज्य शासनाचे नियमित पदे नसून निवडक अंतर्डे स्वरूपातील पदे आहेत.
  • अर्जदारा संबंधित पदासाठी शारीरिक मानसिक दृष्ट्या सक्षम असा तसेच अर्जदाराविरुद्ध कोणत्याही फौजदारी गुन्हा दाखल झालेला नसावा.
  • अनुभवी व उच्च शिक्षण धारकास या ठिकाणी प्राधान्य दिले जाणार आहे.
  • एकापेक्षा अधिक पदाकरिता अर्ज करताना अर्ज सोबत पदाचा प्राधान्यक्रम मुलाखतीच्या पूर्वी कार्यालयात सादर करावा.
  • अर्जदाराला कंत्राटी कालावधीमध्ये सोयीनुसार ठिकाण बदलून मिळण्याची मागणी करता येणार नाही.

मूळ जाहिरात व अर्जाचा नमुना : डाऊनलोड करा

हे ही वाचा…

DTP Bharti 2024 : नगररचना आणि मूल्य निर्धारण विभाग भरती; 261 रिक्त जागा,10वी पास आवश्यक