ZP Recruitment 2024 : जिल्हा परिषदेमध्ये बारावी पासवर “डेटा एन्ट्री ऑपरेटर” पदांसाठी भरती;पगार 20650 रुपये

ZP Recruitment 2024 : जिल्हा परिषद सातारा अंतर्गत बारावी पास वर नोकरीची संधी प्राप्त झाली असून जिल्हा परिषद सातारा मध्ये डाटा एन्ट्री ऑपरेटर साठी चार रिक्त पदे भरायचे आहेत.

व्हाट्सअप ग्रुप जॉईन व्हा
टेलिग्राम ग्रुप जॉईन व्हा

यासाठी इच्छुक तसेच पात्र उमेदवाराने 19 ऑगस्ट 2024 पूर्वी अर्ज सादर करायचे आहेत अर्ज सादर करण्यापूर्वी उमेदवाराने खालील दिलेल्या लिंक वरील जाहिरात व्यवस्थितरित्या वाचावे व जाहिरातीमधील दिलेल्या विहित नमुन्यातच अर्ज सादर करावा.

पदांचा तपशील

डाटा एन्ट्री ऑपरेटर – 04 जागा

व्हाट्सअप ग्रुप जॉईन व्हा
टेलिग्राम ग्रुप जॉईन व्हा

शैक्षणिक पात्रता

  • किमान इयत्ता बारावी पास (पदवीधर उमेदवार असल्यास प्राधान्य देण्यात येईल)
  • मराठी टंकलेखन 30 शब्द प्रतिमिनिट इंग्रजी टंकलेखन 40 शब्द प्रति मिनिट
  • एम एस सी आय टी किंवा समकक्ष परीक्षा उत्तीर्ण

पगार (Salary ZP Recruitment 2024)

20 हजार 650 रुपये

वयोमर्यादा

उमेदवाराचे वय 18 वर्षे कमाल 35 वर्ष या दरम्यान असावे

अर्ज करण्याची पद्धत

जाहिरातीमध्ये दिलेल्या विहित नमुन्यात उमेदवाराने अर्ज सादर करायचे आहेत ऑफलाइन पद्धतीने अर्ज सादर करायच्या असून समक्ष अथवा पोस्टाने खाली दिलेल्या पत्त्यावर अर्ज जमा करायचे आहेत.

अर्ज करण्याची शेवटची तारीख (Last Date ZP Recruitment 2024)

इच्छुक तसेच पात्र उमेदवार आणि दिनांक 19 ऑगस्ट 2024 पर्यंत सकाळी १०.30 ते ०६.00 या वेळेत समक्ष अथवा पोस्टाने सुट्टीचे दिवस वगळून अर्ज सादर करावेत.

उमेदवारासाठी सूचना

  • शैक्षणिक व्यावसायिक अटी व शर्ती पूर्ण करणाऱ्या उमेदवारास इयत्ता दहावी व इयत्ता बारावी मध्ये मिळालेल्या गुणांची टक्केवारी यांचे एकत्रित बेरीज करून त्यामध्ये उमेदवार पदवीधर असल्यास १० गुण बोनस देण्यात येतील.
  • गुणांकन करून उमेदवाराची गुणवत्ता यादी तयार करण्यात येईल गुणवत्ता यादीतील उमेदवारांना संगणक परीक्षे करिता एका पदासाठी 12 उमेदवार याप्रमाणे बोलविण्यात येतील.
  • उमेदवारांनी विहित नमुन्यात अलीकडच्या काळातील साक्षंकित पासपोर्ट साईज फोटोसह अर्ज सादर करावा सदर अर्जाच्या पाकिटावर डाटा एन्ट्री ऑपरेटर पदाकरिता अर्ज असे नमूद करावे.
    अर्जासोबत शैक्षणिक पात्रता, व्यवसायिक पात्रता, वय, अनुभव इत्यादी संदर्भातील कागदपत्राच्या प्रति जोडाव्यात.
  • पात्र उमेदवारांची यादी प्रसिद्ध झाल्यानंतर त्या उमेदवारांनी जिल्हा परिषदेच्या (Apply ZP Recruitment 2024) अधिकृत संकेतस्थळावरून परीक्षेचे प्रवेश पत्र डाऊनलोड करावे.
  • त्यावर उमेदवाराचा अलीकडील काळातील पासपोर्ट आकाराचा फोटो चिकटवून साक्षांकित करून प्रवेशपत्रामध्ये नमूद असलेल्या परीक्षेच्या ठिकाणी नमूद केलेल्या वेळेच्या अगोदर उपस्थित राहणे बंधनकारक असेल, इतर सूचना प्रवेश पत्रावर दिल्या जातील.
  • डाटा एन्ट्री ऑपरेटर म्हणून नियुक्त केलेल्या कंत्राटी पद्धतीच्या कर्मचाऱ्यास नियमित सेवेचे कोणतेही लाभ मिळणार नाहीत.
  • अंतिम निवड यादी प्रसिद्ध करण्यापूर्वी रिक्त पदाची संख्या वाढल्यास याच यादी मधून रिक्त पदे भरण्याची कारवाई करण्यात येईल.
  • भरती प्रक्रियेच्या वेळापत्रकामध्ये बदल करणे पदाची संख्या कमी जास्त करण्यात व भरती प्रक्रिया स्थगिती करण्याचे सर्वाधिकार जिल्हा परिषद निवड समितीकडे राखून ठेवण्यात आलेले आहेत.

मूळ जाहिरात व अर्जाचा नमुना : डाऊनलोड करा

अधिकृत संकेतस्थळ : www.zpsatara.gov.in

हे ही वाचा…

ZP Ahmednagar Bharti 2024 : जिल्हा परिषद अहमदनगर अंतर्गत विविध पदांसाठी भरती;पगार 72000 रुपये