व्हाट्सअप ग्रुप जॉईन व्हा
टेलिग्राम ग्रुप जॉईन व्हा       

Maharashtra Home Guard Recruitment : 10 वी पासवर 9000 होमगार्ड पदांसाठी मेगा भरती सुरु;जिल्ह्यांनुसार अर्ज करा

Maharashtra Home Guard Recruitment : येत्या काही दिवसांमध्ये 9000 हून अधिक होमगार्ड पदांसाठी जागा भरायच्या असून यासाठी महाराष्ट्र शासनाने परिपत्रक जाहीर केलेले आहे याच धर्तीवर जिल्हा होमगार्ड साठी सुद्धा नोंदणी करण्यात येत असून या नोंदणीसाठी अर्ज मागविण्यात येत आहेत.

देशातल्या जास्तीत जास्त नागरिकांना सैनिकी तसेच आपत्कालीन मदत कार्याची कायदा व सुव्यवस्था सुरक्षित राखण्याचे प्रशिक्षण देऊन जबाबदार व शिस्तप्रिय नागरिक घडविणे होमगार्ड संघटनेचा उद्देश असतो.

महाराष्ट्रातल्या होमगार्ड संघटना ही शासन संचालित पूर्णतः मानसवी तत्त्वावर आधारित असणारी संस्था आहे या संस्थेच्या सदस्य होणे म्हणजे कोणत्या प्रकारचे नोकरी अथवा रोजगार मिळवणे असे नाहीये.

जर तुम्ही या संघटनेचे नोंदणी घेतली तर तुम्हाला या संघटनेमार्फत पोलीस दलाच्या मागणीप्रमाणे कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी, पोलीस दलासोबत बंदोबस्त कर्तव्य, आपत्कालीन परिस्थितीमध्ये अग्निशमन, विमोचन पूर विमोचन तसेच रोगराई, महामारीच्या काळात संपाच्या काळात प्रशासनास मदत कार्य करण्याची कर्तव्य दिले जात असतात.

पगार किती मिळतो (Salary of Maharashtra Home Guard Recruitment)

होमगार्ड साठी तुम्ही नोंदणी केल्यानंतर तुम्हाला बंदोबस्ताच्या काळात जे काम कराल त्यासाठी 570 रुपये एवढा कर्तव्य भत्ता, 100 रुपये उपहार भत्ता दिला जातो तसंच प्रशिक्षण काळात 35 खिसाभत्ता, 100 रुपये भोजन भत्ता व साप्ताहिक कवायतीसाठी 90 रुपये कवायत भत्ता दिला जातो.

नोंदणी सुरु

महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यामध्ये होम गार्ड साठी जाहिराती प्रकाशित झाल्या असून त्यासाठी अर्ज मागविण्यात येत आहेत. 15 जुलैपासून वेगवेगळ्या जिल्ह्यांनुसार 17 ऑगस्ट 2024 पर्यंत अर्ज मागविण्यात येत आहेत, नोंदणी करण्यासाठी तुम्ही कमीत कमी दहावी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.

होमगार्ड पात्रतेचे निकष

शैक्षणिक पात्रता : कमीत कमी दहावी उत्तीर्ण असावा
शारीरिक पात्रता : वय 20 वर्षे पूर्ण ते 50 वर्षाचा आत उंची पुरुषाकरिता 162 सेंटीमीटर महिला करिता 150 सेंटीमीटर, छाती फक्त पुरुषांकरिता न फुगवता 76 सेंटीमीटर व पाच सेंटीमीटर फुगवणे आवश्यक आहे .

आवश्यक कागदपत्र (Documents required Maharashtra Home Guard Recruitment)

  • रहिवासी पुरावा आधार कार्ड, मतदान ओळखपत्र.
  • शैक्षणिक अर्हता प्रमाणपत्र
  • जन्म दिनांक पुरावा करीत एसएससी बोर्ड प्रमाणपत्र
  • शाळा सोडल्याचा दाखला
  • तांत्रिक धारण करीत असल्यास त्याचे प्रमाणपत्र
  • खाजगी नोकरी करीत असल्यास मालकाचे ना हरकत प्रमाणपत्र
  • तीन महिन्याचे आतील पोलीस चरित्र पडताळणी प्रमाणपत्र

नोंदणी अर्ज भरणे संदर्भातील सूचना

  • होमगार्ड नोंदणी चार्ज 15 जुलै 2024 ते वेगवेगळ्या जिल्ह्यांनुसार 17 ऑगस्ट 2024 पर्यंत खालील लिंक वरून फक्त इंग्रजी भाषेतून भरायचे असून अर्ज भरताना सर्व माहिती काळजीपूर्वक वाचून भरायची आहे अर्ज सबमिट केल्यानंतर प्रिंट रजिस्ट्रेशन फॉर्म मेनू मध्ये जाऊन त्याची छायांकित प्रत काढायची आहे.
  • त्यावर उमेदवारांनी भरलेले सर्व मजकूर छापून येईल त्यावर आपला वर्तमानातील एक फोटो चिकटवावा मराठी मधील नाव उमेदवारांनी स्वतः पेनाने लिहायचे आहे इतर कोणतीहि माहिती उमेदवारांनी भरू नये.
  • ऑनलाइन अर्ज भरण्याची अंतिम मुदत 17 ऑगस्ट 2024 संध्याकाळी 05 .00 वाजेपर्यंत राहील सर्व (Information Maharashtra Home Guard Recruitment) अर्जाची छाननी झाल्यानंतर कागदपत्र पडताळणी व शारीरिक क्षमता चाचणी करिता तारीख जाहीर करण्यात येईल.
  • तुम्ही सुद्धा होमगार्ड भरतीसाठी इच्छुक असाल तर आत्ताच खाली दिलेल्या लिंक वरून नोंदणी करून रिक्त जागा निघाल्या नंतर अर्ज सादर करू शकता.

जिल्ह्यांनुसार PDF जाहिरात : डाऊनलोड करा

ऑनलाइन नोंदणीसाठी अर्ज : येथे क्लिक करा

हे हि वाचा…

LIC Bharti 2024 : भारतीय जीवन विमा निगम लिमिटेड मध्ये 200 रिक्त जागांसाठी भरती;त्वरित अर्ज करा

व्हाट्सअप ग्रुप जॉईन व्हा
टेलिग्राम ग्रुप जॉईन व्हा