महाराष्ट्र विमानतळ विकास प्राधिकरण मुंबई येथे विविध पदांसाठी भरती;पगार 39 ते 60 हजार

MADC Mumbai Bharti 2024 : महाराष्ट्र विमानतळ विकास संस्था मर्यादित अंतर्गत विविध पदे भरण्यासाठी जाहिरात प्रकाशित करण्यात आली असून यासाठी इच्छुक तसेच पात्र उमेदवाराकडून जाहिरातीमध्ये दिलेल्या विहित नमुन्यात 12 ऑगस्ट 2024 पर्यंत अर्ज मागविण्यात येत आहेत.

व्हाट्सअप ग्रुप जॉईन व्हा
टेलिग्राम ग्रुप जॉईन व्हा

ही भरती मुंबई येथे असून उमेदवाराला अर्ज सुद्धा या ठिकाणीच पाठवायचे आहेत तरुणासाठी चांगली सुवर्णसंधी महाराष्ट्र विमानतळ विकास प्राधिकरणामध्ये उपलब्ध झाली असून नोकरीची आवश्यकता असलं तर उमेदवारांनी या नोकरीचा लाभ घ्यावा.

पदांचा तपशील

1.संपर्काधिकारी – 01 जागा

शैक्षणिक पात्रता : मान्यताप्राप्त विद्यापीठातून कोणत्याही शाखेतून पदवीधर

व्हाट्सअप ग्रुप जॉईन व्हा
टेलिग्राम ग्रुप जॉईन व्हा

वयोमर्यादा : जास्तीत जास्त 45 वर्ष

पगार : 15600 ते 39100 रुपये

2.सहाय्यक अभियंता इलेक्ट्रिकल – 01 जागा

शैक्षणिक पात्रता : मान्यताप्राप्त विद्यापीठातून इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग मधून पदवी धारण केलेली असावी.

वयोमर्यादा : जास्तीत जास्त 35 वर्ष

पगार : 60000 दरमहा

3.सहाय्यक कार्यकारी अभियंता इलेक्ट्रिकल – 01 जागा

शैक्षणिक पात्रता : मान्यता प्राप्त संस्थेमधून पूर्ण वेळ इंजिनिअरिंग इलेक्ट्रिकल पदवी धारण केलेले असावी.

पगार : सातव्या वेतन आयोगानुसार पगार दिला जाईल.

अनुभव (MADC Bharti 2024)

सर्व पदांसाठी वेगवेगळ्या क्षेत्रातील अनुभव आवश्यक असून सविस्तर माहिती जाहिरातीमध्ये दिलेले आहे त्यानुसार उमेदवारांनी संपूर्ण जाहिरात खालील लिंक करून डाऊनलोड करावी व अनुभव विषयाचे सविस्तर माहिती वाचावी.

अर्ज करण्याची पद्धत

उमेदवाराला ऑफलाइन पद्धतीने अर्ज सादर करायचे असून विहित अर्जाचा नमुना जाहिरातीमध्ये दिलेला आहे त्या अर्जाच्या नमुन्यातच उमेदवाराने अर्ज सादर करायचे आहेत इतर पद्धतीने आलेल्या अर्ज स्वीकारले जाणार नाही याची नोंद घ्यावी.

अर्ज करण्याची शेवटची तारीख

12 ऑगस्ट 2024 पर्यंत उमेदवाराने अर्ज सादर करायचे आहेत त्यानंतर आलेल्या अर्ज तसेच पोस्टाने विलंबाने आलेले अर्ज विचारात घेतले जाणार नाहीत याची नोंद घ्यावी.

अर्ज पाठवण्याचा पत्ता 

व्हाईस चेअरमन अँड मॅनेजमेंट डायरेक्टर, महाराष्ट्र एअरपोर्ट डेव्हलपमेंट कंपनी लिमिटेड, आठवा मजला ,सेंटर एक, वर्ड ट्रेड सेंटर, कफ परेड, मुंबई – 400 005

आवश्यक कागदपत्रे

इच्छुक तसेच पात्र उमेदवाराने अर्जासोबत खालील कागदपत्राच्या साक्षांकित प्रति अर्जासोबत जोडाव्यात.

  • दहावीचे गुणपत्रक तसेच प्रमाणपत्र
  • बारावीचे गुणपत्रक तसेच प्रमाणपत्र
  • पदवीचे गुणपत्रक व प्रमाणपत्र
  • पदव्युत्तर पदवीचे गुणपत्रक व प्रमाणपत्र
  • अनुभवाचे प्रमाणपत्र
  • पॅन कार्ड
  • आधार कार्ड

निवड प्रक्रिया 

उमेदवाराची निवड मुलाखतीद्वारे घेण्यात येणार असून प्राप्त झालेल्या अर्जाची पडताळणी करून उमेदवाराची शॉर्टलिस्ट काढल्या जाईल व त्यानंतर उमेदवाराला मुलाखतीसाठी बोलून उमेदवाराची निवड केली जाईल.

उमेदवारासाठी सूचना

  • वर नमूद केलेल्या पद संख्येमध्ये बदल करण्याचा पदभरती रद्द करण्याचा अधिकार Apply MADC Mumbai Bharti 2024 कडे राखून ठेवलेला आहे.
  • अर्ज करण्या अगोदर उमेदवाराने संपूर्ण जाहिरात व्यवस्थितरित्या वाचावी व त्यानंतर अर्ज सादर करावा.
  • उमेदवार जर इतर सरकारी संस्थांमध्ये कामाचा असेल त्यांना ना हरकत प्रमाणपत्र सादर करणे आवश्यक असेल.
  • उमेदवाराला मराठी भाषा येणे आवश्यक आहे.
  • निवड झालेल्या उमेदवाराला महाराष्ट्र मध्ये कुठेही काम करावे लागेल याची नोंद घ्यावी.
  • उमेदवाराने अर्ज फक्त स्पीड पोस्टाने पाठवावे कुरिअरने किंवा इतर पद्धतीने आलेले अर्ज स्वीकारले जाणार नाहीत.

मूळ जाहिरात व अर्जाचा नमुना : डाऊनलोड करा

नवीन अपडेटेड जॉब्स पहा !!

Jilhadhikari Karyalay Parbhani Bharti : जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये शिपाई व संगणक ऑपरेटर पदांसाठी भरती;येथे करा अर्ज