ZP Thane Bharti 2024 : जिल्हा परिषद ठाणे अंतर्गत विविध पदाची भरतीची जाहिरात प्रकाशित करण्यात आली असून यासाठी इच्छुक तसेच पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत.
इच्छुक तसेच पात्र उमेदवाराने जाहिरातीमध्ये दिलेल्या तारखेस आवश्यक त्या कागदपत्रासह थेट मुलाखतीला हजर राहायचे आहे मुलाखतीला जाण्यापूर्वी उमेदवाराने खाली दिलेल्या लिंकवरून ऑनलाईन अर्ज सादर करावा.
पदांचा तपशील : वैद्यकीय अधिकारी (महिला) व स्टाफ नर्स
वयोमर्यादा : इच्छुक तसेच पात्र अर्जदाराचे वय 18 ते 38 वर्षापर्यंत असावे, मागासवर्गीयांसाठी जास्तीत जास्त वय ४३ वर्ष राहील.
मासिक मानधन : निवड झालेल्या उमेदवाराला दरमहा 18000-60000 रुपये एवढे मानधन दिले जाईल या व्यतिरिक्त इतर कोणतेहि लाभ उमेदवारास दिले जाणार नाहीत
मुलाखतीचा कालावधी : जाहिरातीमध्ये नमूद केल्याप्रमाणे दिनांक 20 ऑगस्ट आणि 21 ऑगस्ट रोजी पदानुसार मुलाखत घेतल्या जाणार आहे.
मुलाखतीचा पत्ता : 20 ऑगस्ट आणि 21 ऑगस्ट रोजी सकाळी दहा ते दोन या वेळेत वागळे इस्टेट,रोड नंबर २२ सर्कल,जीएसटी भवन समोर,ठाणे (पश्चिम-400601) या ठिकाणी उपस्थित रहावे.
मुलाखतीसाठी अर्जदारांनी किमान एक तास अगोदर उपस्थित राहावे, अन्यथा मुलाखतीला बोलविण्यात येणार नाही याची नोंद घ्यावी.
उमेदवारासाठी सूचना
- सदर भरतीची प्रक्रिया पुर्ण झालेनंतर भविष्यात जर एखादया ठिकाणी कर्मचारी यांनी राजीनामा दिलेमुळे जागा रिक्त झालेस गुणानुक्रमे मेरिटमधील पुढील उमेदवारास नविन भरती प्रक्रिया न करता नियमानुसार नियुक्ती आदेश दिले जातील.
- सदर निवड यादी ही तयार झालेनंतर पुढील ११ महिन्यापर्यंत वैध राहील. अर्जदाराला कंत्राटी कालावधीत त्यांचे सोईनुसार ठिकाण बदलून मिळण्याची मागणी करता येणार नाही.
- अर्जदारांनी आपल्या अर्जावर त्यांच्या सध्या सुरु असलेला मोबाईल नंबर, पत्ता व ई-मेल आयडी अचूक नोंदवावा तसेच ते भरतीप्रक्रिया पूर्ण होईपर्यंत सुस्थितीत राहील याची दक्षता घ्यावी.
- भरती प्रक्रिये दरम्यान ज्या-ज्या उमेदवारांना बोलविण्यात येईल, त्या-त्या वेळी त्यांना स्वखर्चाने उपस्थित राहावे लागेल. सदर उपस्थितीकरीता कोणतेही मानधन अथवा प्रवास खर्च देय राहणार नाही.
- उमेदवारास एका पेक्षा जास्त पदांकरिता अर्ज करावयाचा असल्यास वेगवेगळे अर्ज सादर करावे लागतील तसेच वेगवेगळे डिमांड ड्राफट् सादर करणे अनिवार्य राहील.
- सोबत अर्जाचा नमुना हा https://forms.gle/S24D8bvg3YrXZJ307 प्रसिध्द करण्यात येत आहे.
- भरतीप्रक्रिया पार पाडून निवड झालेल्या उमेदवारांना नियुक्ती आदेश देणे इ. बाबत सविस्तर
तपशिल वेळोवेळी www.aarogya.maharashtra.gov.in & https://www.zpthane.maharashtra.gov.in या संकेत स्थळावर प्रसिध्द करणेत येईल याची उमेदवारांनी नोंद घ्यावी. - सदर विषयी कार्यालयात विचारणा करण्यात येऊ नये. तसेच उमेदवारास एसएमएस (SMS) इमेल (E-mail) दुरध्वनिदवारे कळविण्यात येणार नाही उमेदवारांनी वेळोवेळी वरिल संकेत स्थळांवरुन नोद घ्यावी.
- तुम्ही सुद्धा या पदभरतीसाठी इच्छुक असेल तसेच पात्र असाल तर खालील लिंक वरून जाहिरात डाऊनलोड करून नमूद केलेल्या तारखेस मुलाखतीला उपस्थित रहावे.
ZP Thane Recruitment 2024
मूळ जाहिरात : डाउनलोड करा
ऑनलाईन अर्ज : येथे क्लिक करा
हे हि वाचा…
ZP : जिल्हा परिषदेत नोकरीची संधी ! 539 जागांकरिता मेगा भरती सुरू; कोणतीही फी नाही