ZP Nandurbar Recruitment 2024 : 15 वा वित्त आयोग अंतर्गत नागरी आरोग्यवर्धिनीकेंद्र व हिंदु हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे, आपला दवाखाना नंदुरबार जिल्ह्यासाठी पदभरती प्रक्रिया खाली दर्शविल्याप्रमाणे कंत्राटी व करार पध्दतीने तात्पुरत्या स्वरुपात मानधन तत्वावर खालील पदांसाठी पात्र उमेदवारांच्या मुलाखत व अर्ज मागविण्यात येत आहेत.
पदाचे नाव : वैद्यकीय अधिकारी – 07 जागा
शैक्षणिक अर्हता : मानतयताप्राप्त संस्थेतून MBBS उत्तीर्ण MBBS नसल्यास बीएएमएस.
शुल्क : खुल्या उमेदवारांनी रु 150/- व राखीव प्रवर्गासाठी रु. 100/- इतके चा अर्ज शुल्क राष्ट्रीयकृत बँकेचा डिमांड ड्राष्ट” District Integrated Health & Family Welfare Society, Nandurbar” या नावाने देय असलेला असावा. बँकेचा डिमांड ड्राफ्ट सादर न केल्यास आपला अर्ज अपात्र ठरविण्यात येईल.
मुलाखतीचा कालावधी :
M.B.B.S. पदवीधारक उमेदवारांनी थेट मुलाखत करिता दिनांक 30/08/2024 रोजी सळाळी 10:00 वाजता जिल्हा परिषद, नंदुरबार येथे आयोजित करण्यात आलेली आहे. थेट मुलाखती करिता उमेदवारांनी सर्व शैक्षणिक व अनुभवाचे मुळ दस्ताऐवज व छायांकित प्रत व मुद्दा क्र. 4 नुसार डिमान्ड ड्राफ्टसह उपस्थित राहावे तद्नंतर उमेदवार न मिळाल्यास दर आठवड्याच्या सोमवारी मुलाखत करिता उमेदवारांनी उपस्थित रहावे.
B.A.M.S. पदवीधारक इच्छुक उमेदवारांनी विहीत नमुन्यातील अर्ज 1) वयाचा पुरावा 2) पदवी/पदविका प्रमाणपत्र (सर्व वर्षाचे प्रमाणपत्र) 3) गुणपत्रिका 4) कौन्सील रजिस्ट्रेशन प्रमाणपत्र (As Applicable) 5) शासकीय संस्थामध्ये केलेल्या कामाचे अनुभव प्रमाणपत्र, नियुक्ती प्राधिका-याच्या आदेशाच्या प्रतिसह 6) जात प्रमाणपत्र इ. छायांकित प्रर्तीसह दि 26/08/2024 ते दि. 30/08/2024 रोजी सायं 6:00 वा. या कालावधीतपर्यंत रा.आ. अ. आरोग्य, विभाग, जिल्हा परिषद, नंदुरबार या पत्त्यावर पोष्टाद्वारे कुरियर अथवा प्रत्यक्षात (By Hand) सादर करण्यात यावे. दि. 30/08/2024 नंतर आलेल्या अर्जाचा विचार करण्यात येणार नाही.
पगार – M.B.B.S. पदवीधारक उमेदवार – 60000 रुपये, BAMS पदवीधारक वैद्यकिय अधिकारी पदाकरिता केंद्र शासनाच्या CPHC च्या मार्गदर्शक सुचनानुसार रु 25,000/- अधिक रु.15,000/-(PBI) कामावर आधारित मोबदला याप्रमाणे प्रति महिना रु.40,000/- मानधन मार्गदर्शक सुचनांनुसार अदा करण्यात येईल.
वयोमर्यादा : सामान्य प्रशासन विभाग, मंत्रालय मुंबई यांचे दिनांक 25 एप्रिल 2016 चे शासन निर्णयास अनुसन्ररुन अर्ज करण्याच्य शेवटच्या दिनांकास उमेदवाराचे किमान वय 18 वर्ष असणे आवश्यक आहे.
इतर सूचना :
- पदासमोर नमुद मानधन हे एकत्रित मानधन असुन त्या व्यतिरिक्त इतर कोणतेही भत्ते देय राहणार नाही.
- लहान कुटुंबाची अट दि.23/07/2020 पासून लागू करण्यात आली असून दि.23/07/2020 पासून दोनपेक्षा अधिक मुले असणारे उमेदवार 15 व्या वित्त आयोगाच्या पदभरतीसाठी अर्ज करण्यास पात्र ठरणार नाहीत.
- अर्जदाराला कंत्राटी कालावधीत त्यांचे सोईनुसार ठिकाण बदलुन मिळण्याची मागणी करता येणार नाही. अर्जदारांनी आपल्या अर्जावर त्यांच्या सध्या सुरु असलेला मोबाईल नंबर व ई-मेल आयडी अचुक नोंदवाव तसेच ते भरती प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत सुस्थितीत राहील याची दक्षता घ्यावी.
- भरती प्रक्रिये दरम्यान ज्या-ज्या उमेदवारांना बोलविण्यात येईल, त्या-त्या वेळी यांना स्वखर्चाने उपस्थित राहावे लागेल तसेच सदर उपस्थिती करीता कोणतेही मानधन अथवा प्रवास खर्च देय राहणार नाही.
- अर्जाचा नमुना जाहिराती सोबत प्रसिध्द करण्यात आलेला असुन सदरील नमुन्याप्रमाणे अर्ज नसल्यास उमेदवारांचा अर्ज ग्राहय धरण्यात येणार नाही.
- भरती प्रक्रियेच संपुर्ण अधिकार, पदे कमी जास्त करणे, भरती प्रक्रिया रद्द करणे, अटी व शतीमध्ये बदल करणे, पदस्थापनेच्या ठिकाणामध्ये बदल करणे, इत्यादी सर्व अधिकार हे या कार्यालयाचे असून निवड प्रक्रियेत कोणत्याही क्षणी बदल करण्याचे अधिकारी मा. मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद, नंदुरबार यांनी राखून ठेवलेले आहेत.
मूळ जाहिरात : डाउनलोड करा