बृहन्मुंबई महानगरपालिकेत 178 रिक्त जागांवर नोकरीची संधी;पगार 92300 रुपये | BMC Recruitment 2024

BMC Recruitment 2024 : बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या करनिर्धारण व संकलन खाते या संवर्गाची पदे भरण्यासाठी जाहिरात प्रकाशित करण्यात आली आहे.

व्हाट्सअप ग्रुप जॉईन व्हा
टेलिग्राम ग्रुप जॉईन व्हा

यासाठी इच्छुक तसेच पात्र उमेदवार नियुक्तीसाठी अर्ज मागविण्यात येत आहेत इच्छुक तसेच पात्र उमेदवाराने संपूर्ण जाहिरात वाचावी व त्यानंतर पात्र असल्यास अर्ज सादर करावा, ऑनलाईन पद्धतीने अर्ज सादर क्राययचे असून हे अर्ज 19 ऑक्टोबर 2024 पूर्वी सादर करणे आवश्यक आहे.

◼️पदांचा तपशील : निरीक्षक – 178 जागा

◼️शैक्षणिक अर्हता

व्हाट्सअप ग्रुप जॉईन व्हा
टेलिग्राम ग्रुप जॉईन व्हा

अ) उमेदवार मान्यता प्राप्त विद्यापीठातून कोणत्याही शाखेतून पदवी उत्तीर्ण होणे आवश्यक आहे

(ब) उमेदवार महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाची शालांत परीक्षा वा तत्सम परीक्षा किमान 50 गुणांची प्रश्नपत्रिका असलेला मराठी विषय घेऊन उत्तीर्ण झालेला असावा.

(क) उमेदवारांना संगणकाचे ज्ञान अवगत करणे आवश्यक आहे. त्याने / तिने (डी.ओ.ई., ए.सी.सी.) सोसायटीचे (सी.सी.सी.) किंवा (ओ स्तर) किंवा (ए स्तर) किंवा (बी स्तर) किंवा (सी स्तर) स्तरावरील प्रमाणपत्र किंवा महाराष्ट्र राज्य आणि तांत्रिकी शिक्षण मंडळाचे एम. एस.सी.आय.टी. किंवा जी.ई.सी.टी. चे प्रमाणपत्र धारण करणे आवश्यक आहे.

◼️वेतन : दरमहा 29200 -92300 रुपये एवढे मानधन देण्यात येईल.

◼️अर्ज करण्याची पद्धत : इच्छुक तसेच पात्र उमेदवाराने खाली दिलेल्या लिंक वरून ऑनलाईन पद्धतीने व्यवस्थित रित्या भरून नमूद केलेल्या तारखेच्या अगोदर सादर करावा.

◼️अर्ज करण्याची तारीख : इच्छुक उमेदवाराने विहित नमन्यातील अर्ज 20 सप्टेंबर 2024 पासून 19 ऑक्टोबर 2024 या कालावधी मध्ये सादर करायचे आहेत.

◼️निवड प्रक्रिया : बहुपर्यायी वस्तुनिष्ठ प्रश्नांची ऑनलाईन परीक्षा घेण्यात येणार आहे, या परीक्षेच्या गुणांच्या आधारे उमेदवारांची निवड करण्यात येईल.

◼️अर्जाचे शुल्क : अराखीव-1000 रुपये, मागास व अनाथ उमेदवार-900 रुपये,

◼️उमेदवारांसाठी सूचना

  1. नियुक्तीनंतर कोणत्याही क्षणी उमेदवाराने चुकीची माहिती / प्रमाणपत्रे/कागदपत्रे सादर केल्याचे किंवा कोणतीही माहिती दडवून ठेवल्याचे निदर्शनास आल्यास त्यांची उमेदवारी रद्दबातल करण्यात येईल.
  2. तसेच नियुक्ती झाली असल्यास कोणतीही पूर्व सूचना न देता त्यांची नियुक्ती समाप्त करण्यात येईल.
  3. प्रशासकीय किंवा अन्य कारणास्तव निवड प्रक्रिया कोणत्याही वेळेस कोणत्याही टप्प्यावर थांबविण्याचे अधिकार महानगरपालिका आयुक्त याना आहेत.
  4. उमेदवाराने संकेतस्थळावर नमूद केलेल्या अटी व शर्तीचे पालन करणे बंधनकारक आहे.

मूळ जाहिरात अर्जाचा नमुना : डाऊनलोड करा

ऑनलाईन अर्ज करण्यासाठी : इथे क्लिक करा

👇👇या महिन्यातील लेटेस्ट जॉब्स👇👇

👉सहकारी पतसंस्थेमध्ये शिपाई,लिपिक व वाचमन पदांसाठी मोठी भरती;परीक्षा नाही | Sahakari Patsanstha Bharti 2024

👉जिल्हा व सत्र न्यायालयामध्ये 10वी,12वी व पदवीधरांना नोकरीची संधी; कोणतीही परीक्षा न देता नोकरी | District Court Recruitment 2024

👉मीरा भाईंदर महानगरपालिकेमध्ये विविध पदांसाठी मेगा भरती; पगार 35000 रुपये | MBMC Recruitment 2024