Chikhali Urban Bank Bharti 2024 : दि. चिखली अर्बन कॉपरेटिव बँक लिमिटेड अंतर्गत विविध पदे भरण्यासाठी इच्छुक तसेच पात्र उमेदवारांकडून 08 ऑक्टोबर 2024 पर्यंत खालील नमूद केलेल्या ई-मेल आयडीवर अर्ज मागविण्यात येत आहेत.
इच्छुक तसेच पात्र उमेदवाराने सविस्तर जाहिरात वाचावी व त्यानंतर दिलेल्या इमेल आयडीवर 08 ऑक्टोबर 2024 पूर्वी अर्ज सादर करावा.
◾पदांचा तपशील
कनिष्ठ अधिकारी, वसुली सहायक,कनिष्ठ लिपिक, सुरक्षा रक्षक, शिपाई इत्यादी.
◾शैक्षणिक पात्रता :
- कनिष्ठ अधिकारी – मान्यता प्राप्त विद्यापीठातून पदवीधर.
- वसुली सहायक – मान्यताप्राप्त विद्यापीठातून पदवी धारण केलेल्या असावी किंवा बारावी पास असेल तरी अर्ज करू शकता.
- कनिष्ठ लिपिक – मान्यताप्राप्त विद्यापीठातून पदवी धारण केलेली असावी
- सुरक्षा रक्षक,शिपाई/ड्राइवर – मान्यताप्राप्त विद्यापीठातून कमीत कमी दहावी पास असावा (ड्राइवर साठी लायसन्स असणे आवश्यक)
◾वयोमर्यादा : जास्तीत जास्त 50 वर्षापर्यंत
◾अनुभव : विविध पदानुसार अनुभव वेगवेगळा दर्शविण्यात आला असून इच्छुक उमेदवाराने सविस्तर माहितीसाठी जाहिरात डाउनलोड करून वाचावी.
◾कामाचे ठिकाण : चिखली अर्बन बँक को.ऑप.बँक लि. चिखली,’सहकार समृद्धी’ डॉ.शामाप्रसाद मुखर्जी मार्ग,मुख्य कार्यालय,चिखली (जिल्हा-बुलढाणा) 443201
◾अर्ज करण्याची पद्धत : इच्छुक तसेच पात्र उमेदवाराने hr@cucb.co.in या ईमेल आयडीवर अपडेट केलेल्या CV सहित आवश्यक कागदपत्रासह अर्ज सादर करावा.
◾अर्ज करण्याची शेवटची तारीख : इच्छुक तसेच पात्र उमेदवारांनी 08 ऑक्टोबर 2024 पर्यंत ई-मेल आयडीवर अर्ज पाठवणे बंधनकारक राहील.
◾निवड प्रक्रिया : प्राप्त झालेल्या अर्जाची पडताळणी करून उमेदवारांची निवड केल्या जाईल निवड केलेल्या उमेदवाराला मुलाखतीसाठी बोलवण्यातील व त्याची माहिती मोबाईलद्वारे किंवा ईमेलद्वारे देण्यात येईल
◾उमेदवारासाठी सूचना
- मुलाखतीसाठी उमेदवाराने स्वखर्चाने हजर राहणे आवश्यक असेल
- मुलाखती उमेदवाराने आवश्यक ते सर्व शैक्षणिक कागदपत्र तसेच इतर महत्त्वाची कागदपत्र सोबत ठेवणे गरजेचे आहे सर्व कागदपत्राच्या मूळ प्रतिवर साक्षांकित प्रति सोबत असणे गरजेचे असेल.
- पदभरती रद्द करण्याचा अथवा पदांच्या संख्येत बदल करण्याचा अधिकार बँकेने राखून ठेवलेला आहे.
- तुम्ही सुद्धा या पदभरतीसाठी इच्छुक असाल तसेच पात्र असाल तर खालील जाहिरात डाउनलोड करा व्यवस्थित रित्या वाचा आणि त्यानुसार अर्ज सादर करा.
मूळ जाहिरात : डाऊनलोड करा
👉राष्ट्रीय कृषी आणि ग्रामीण विकास बँकेमध्ये 10वी पासवर 108 जागांसाठी मेगा भरती;ऑनलाईन अर्ज सुरु
👉नाशिक महानगरपालिकेमध्ये कॉम्पुटर ऑपरेटर,प्रयोगशाळा परिचर,स्टाफ नर्स व इतर पदांसाठी भरती