ISRO Recruitment 2024 : भारत सरकारच्या अखत्यारित येणाऱ्या व अंतरिक्ष विभागांतर्गत कार्य करणाऱ्या भारतीय अंतरिक्ष अनुसंस्थान म्हणजे इस्रो मार्फत विविध पदे भरण्यासाठी जाहिरात प्रकाशित करण्यात आली आहे.
यासाठी इच्छुक तसेच पात्र उमेदवारांकडून 23 ऑक्टोबर 2024 पूर्वी अर्ज मागविण्यात येत आहेत या पदभरतीमध्ये वेगवेगळ्या पदाचे समावेश असून त्यासोबतच आवश्यक असलेले शैक्षणिक पात्रता सुद्धा दाखवण्यात आलेले आहे.
खालील लिंक वरून तुम्ही इस्रोची जाहिरात डाऊनलोड करू शकता तसेच ऑनलाईन अर्ज ची लिंक दिलेली आहे त्या लिंक वर जाऊन अर्ज सुद्धा सादर करू शकता या पदभरती मध्ये वैद्यकीय अधिकारी, वैज्ञानिक संरचनात्मक डिझाईन,इन्स्ट्रुमेंटेशन इंजीनियरिंग,सुरक्षा व विश्वसनीयता इंजिनिअरिंग,औद्योगिक उत्पादन औद्योगिक इंजीनियरिंग, इंडस्ट्रियल सेफ्टी, थर्मल इंजीनियरिंग यांचा समावेश आहे.
विविध पदांचा शैक्षणिक पात्रता वेगवेगळ्या असून पदवीधर ते पदव्युत्तर उमेदवार या ठिकाणी अर्ज करून इच्छित असाल तर ऑनलाईन पद्धतीने अर्ज सादर करू शकता, उमेदवाराची निवड लेखी परीक्षा केव्हा कम्प्युटरवर आधारित असणाऱ्या परीक्षेत द्वारे घेतल्या जाईल.
इस्रो मध्ये टेक्निकल असिस्टंट म्हणून सुद्धा काही पदे भरण्यात येत असून याच्यामध्ये मेकॅनिकल इलेक्ट्रॉनिकल व इलेक्ट्रिकल, फोटोग्राफी, मायक्रोबायोलॉजी इत्यादींचा समावेश आहे. यासाठी मान्यताप्राप्त विद्यापीठातून इंजिनिअरिंगचा किंवा संबंधित विषयाचा डिप्लोमा केलेला असेल असे अर्जदार अर्ज करू शकणार आहेत.
यासोबतच टेक्निशियन ब मध्ये फिटर 22 जागा, इलेक्ट्रॉनिक 12 जागा, एसी रेफ्रिजरेशन 1 जागा, वेल्डर दोन जागा,इलेक्ट्रिकल 3 जागा, टर्नर 1 जागा, ग्राइंडर 1 जागा या पदाचा समावेश असेल यासाठी दहावी पास व आवश्यकता विषयातून आयटीआय झालेला असणार गरजेचा आहे याची निवड सुद्धा लेखी परीक्षेद्वारे व स्किल टेस्ट द्वारे करण्यात येणार आहे.
विविध पदाचा समावेश आहे ज्याच्यामध्ये मेकॅनिकल सिविल या पदाचा समावेश असेल यासाठी सुद्धा दहावी पास व संबंधित विषयांमध्ये डिप्लोमा असणे गरजेचे असेल या उमेदवाराची निवड सुद्धा लेखी परीक्षेद्वारे व स्किल टेस्ट द्वारे घेतल्या जाणार आहे या व्यतिरिक्त सहाय्यक पदासाठी सुद्धा इसरो मध्ये पदभरती जाहीर झालेली आहे.
सहाय्यक राजभाषा साठी एकूण पाच रिक्त जागाचा समावेश असून भाषेनुसार त्यांची शैक्षणिक पात्रता वेगवेगळ्या असणार आहे याचे निवड लेखी परीक्षेद्वारे व स्किल टेस्ट द्वारे घेतल्या जाणार आहेत या ठिकाणी कमीत कमी मासिक वेतन 25500 ते जास्तीत जास्त 287000 पर्यंत मासिक वेतन दिल जाणार आहे.
अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय कमीत कमी 18 वर्षे असावे जास्तीत जास्त वयासाठी वेगवेगळ्या पदांनुसार वयोमर्यादा देण्यात आलेले आहेत त्या वयोमर्यादेमध्ये शासनाच्या नियमानुसार शेतीला ठेवण्यात आलेले आहे या ठिकाणी ऑनलाइन पद्धतीने तुम्ही अर्ज करू शकणार असून 23 ऑक्टोबर 2024 पर्यंत ही लिंक उपलब्ध राहणार आहे त्या अगोदर इच्छुक तसेच पात्र उमेदवाराने अर्ज भरावे.
त्यासोबत अर्जाचे शुल्क म्हणून 750 रुपये भरावे लागते हे शुल्क तुम्ही ऑनलाईन पद्धतीने कार्ड किंवा यूपीआय द्वारे सुद्धा भरू शकणार आहात. अर्ज करते वेळेस यासंबंधीची माहिती तुम्हाला मिळणार आहे सर्व पदांसाठी लेखी परीक्षा व कौशल्यावर आधारित चाचणी घेतल्या जाईल त्यानुसार उमेदवाराची निवड केल्या जाईल.
सविस्तर माहिती जाहिरातीमध्ये दिलेले आहे ते व्यवस्थित वाचून तुम्ही लेखी परीक्षेसाठी महाराष्ट्रामध्ये मुंबई या ठिकाणी ही परीक्षा घेतली जाईल तिथे हजर राहावे लागणार आहे या पदभरतीसाठी तुम्हाला जर मुलाखतीला बोलवण्यात आलं तर त्याचा भत्ता इस्रो मार्फत त्या उमेदवाराला दिला जाईल.
जाहिरातीमध्ये दर्शवण्यात आलेल्या पदाच्या संख्येत बदल केला जाऊ शकतो किंवा पदभरती सुद्धा रद्द केली जाऊ शकते याचा पूर्ण अधिकार इस्रोणे राखून ठेवलेला आहे तुम्ही सुद्धा इच्छुक असाल तसंच पात्र असाल तर आत्ताच खालील लिंक वर जाऊन जाहिरात डाऊनलोड करा जाहिरात व्यवस्थितरीत्या वाचून खाली लिंक वरूनच ऑनलाईन पद्धतीने अर्ज सादर करा.
मूळ जाहिरात : डाउनलोड करा
ऑनलाईन अर्ज : येथे क्लिक करा
👇या महिन्यातील महत्त्वाचे जॉब्स👇
👉पाटबंधारे विभागात विविध पदांसाठी भरती; सरकारी नोकरीची चांगली संधी | Patbandhare Vibhag Bharti 2024