PF Interest 2024 : आतापर्यंतची सदस्य संख्या आणि त्याची रक्कम याची माहिती EPFO ने ट्विटद्ववारे काही दिवसापूर्वी दिली आहे, आणि व्याज जमा होण्यास सुरुवात होणार असल्याची माहिती सुद्धा सभेत सांगण्यात आली आहे.
कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संस्थेने (EPFO) सदस्यांना आनंदाची बातमी दिली आहे, EPFO संस्थेने या आर्थिक वर्षासाठी व्याज जमा करण्याची प्रक्रिया सुरु केली आहे.
लवकरच करोडो सदस्यांच्या खात्यात व्याज जमा झालेले दिसणार आहे, ईपीएफओने याबाबत ट्विट करुन कळवले आहे, जर कोणाचे व्याज जमा झाले नसेल तर खालील पद्धतीने चेक करून तुम्ही संबंधित विभागास तक्रार करू शकता.
40 हजार व्याज मिळणार (PF Interest Credited)
- जर तुमच्या पीएफ अकाउंटला 05 लाख बॅलन्स असेल तर तुम्हाला आताच्या व्याजदराने 40500 रुपये एवढे व्याज मिळेल.
पीएफचे व्याज चेक करण्यासाठी येथे क्लिक करा
यावर्षी (PF Interest) व्याज जमा होण्यास झाला उशीर
- सॉफ्टवेअर अपग्रेडेशनमुळे व्याज जमा होण्यास उशीर झाल्याचे अर्थ मंत्रालयाने सांगितले आहे.
व्याज जमा झाले ते मोबाईलवर कसे पाहणार?
- सदस्यांनी ईपीएफओच्या epfindia.gov.in या अधिकृत वेबसाईटवर जावे
- वेबसाईटवरील सर्व्हिस टॅबवर क्लिक करून फॉर एम्प्लॉइज या लिंकवर क्लिक करावे.
- या पेजवरील मेंबर पासबुक येथे क्लिक करून आपला यूएएन आणि पासवर्ड टाकावा.
- लॉगिन केल्यावर पासबुकचा पर्याय दिसेल, तेथे सर्व माहिती पाहता येईल, या पेजवर आर्थिक वर्ष निवडावे.
- तेथे सर्वात खाली व्याज जमा झालेले दिसेल.
किंवा
- UMANG मोबाइल अँप्लिकेशन मध्ये EPFO सेक्शन मध्ये जावे.
- आपला UAN नंबर व पासवर्ड टाकावा, लॉगिन झाल्यानंतर पासबुक या पर्यायाला क्लिक करावे.
- तिथे व्याज जमा झाले कि नाही ते कळेल ,पासबुक पीडीएफ स्वरूपात डाउनलोड करून सुद्धा तुम्ही जमा झालेली रक्कम पाहू शकता.
येथे तक्रार करा (PF Interest Credited)
- व्याज जमा झाले नसल्यास epfigms.gov.in येथे तक्रार करता येईल, या वेबसाईटवर Register Grievance लिंकवर क्लिक करून आवश्यक माहिती पुरवून तक्रार दाखल करावी.
मिस्ड कॉलद्वारे मिळवा माहिती
- UAN पोर्टलवर नोंदणीकृत सदस्य त्यांच्या नोंदणीकृत मोबाईल क्रमांकावरून 9966044425 वर मिस्ड कॉल देऊन त्यांचे तपशील EPFO कडून घेऊ शकतात.
- जर सभासदाचा UAN बँकेचा A/C क्रमांक, आधार आणि पॅन यांपैकी कोणतेही एक दस्तावेज अकाउंटला जोडलेले असले तर सदस्याला शेवटचे योगदान आणि पीएफ बॅलन्सचा तपशील मिळेल.