Created By Aditya, Date : 12.12.2024
Zilha Parishad Bharti 2024 : जिल्हा परिषदेमध्ये सरकारी नोकरी शोधणाऱ्या उमेदवारांसाठी मोठी सुवर्णसंधी उपलब्ध झालेली आहे,जिल्हा परिषद मध्ये लिपिक पदांसाठी भरतीची नवीन जाहिरात प्रकाशित करण्यात आलेली आहे.
यासाठी इच्छुक व पात्र उमेदवारांनी सविस्तर जाहिरात वाचून अर्ज ऑफलाईन पद्धतीने आवश्यक त्या सर्व कागदपत्रांसह खाली दिलेल्या पत्त्यावर अर्ज सादर करावेत. इच्छुक व पात्र उमेदवाराने या संधीचा फायदा घ्यावा, जिल्हा परिषद अमरावती अंतर्गत हि भरती जाहीर झाली असून पदांच्या तपशीलसह सविस्तर माहिती खाली दिलेली आहे.
Zilla Parishad has published a new recruitment advertisement for the posts of Clerk. For this, interested and eligible candidates should read the detailed advertisement and submit the application in offline mode along with all the necessary documents to the address given below. |
◾भरतीचा विभाग : हि भरती जिल्हा परिषद अमरावती मध्ये निघाली आहे,विविध पदांसाठी भरतीची जाहिरात प्रकाशित करण्यात आली आहे.
◾भरतीचा प्रकार : जिल्हा परिषद अमरावती मध्ये सरकारी नोकरी
◾पदांचे नाव : लिपिक
◾शैक्षणिक पात्रता : पदानुसार शैक्षणिक पात्रता असून उमेदवाराने जाहिरात वाचून अर्ज सादर करावा.
◾अर्ज करण्याची पद्धत : ऑफलाईन पद्धतीने जाहिरातीमध्ये दिलेल्या विहित नमुन्यात अर्ज सादर करायचे आहेत.
PDF जाहिरात | येथे क्लिक करा |
अधिक माहिती | येथे क्लिक करा |
◾पदांचे नाव व आवश्यक अर्हता
▪️लिपिक – 01 जागा
पात्रता आणि अटी:-
1] अर्जदार हा जिल्हा परिषदेचा सेवानिवृत्त कर्मचारी असणे आवश्यक आहे.
2]अर्जदाराच्या सेवाकालात कोणत्याही प्रकारची शिस्तभंगाची कारवाई झालेली नसावी.
3]उमेदवारास संगणकावर डेटा एंट्री, लेखाविषयक नोंदी व अन्य पत्रव्यवहाराचे काम सांभाळण्यांचा अनुभव आवश्यक आहे.
4]निवड झालेल्या उमेदवाराला 15000 एवढे मानधन दिले जाणार आहे.
◾नोकरीचे ठिकाण : जिल्हा परिषद अमरावती,महाराष्ट्र
◾निवड प्रक्रिया :अर्जदाराच्या सेवा इतिहास, संगणक ज्ञान व लेखाविषयक कामाच्या अनुभवाच्या आधारे उमेदवारांना मुलाखतीसाठी बोलावले जाईल.
◾शेवटची तारीख : आपले अर्ज 15 डिसेंबर 2024 पूर्वी खाली दिलेल्या पत्त्यावर कागद्पत्रसह सादर करावेत.
◾मुलाखतीचा पत्ता : मा.मुख्य कार्यकारी अधिकारी तथा अध्यक्ष, कर्मचारी कल्याण निधी,जिल्हा परिषद अमरावती.
◾अर्जाचे शुल्क : कोणतेही शुल्क नाही
◾अधिकृत संकेतस्थळ : https://zpamravati.gov.in/
PDF जाहिरात | येथे क्लिक करा |
अर्जाचा नमुना | येथे क्लिक करा |
उमेदवारांसाठी महत्त्वाच्या सूचना
◾अर्जासोबत : १. शैक्षणिक प्रमाणपत्रे २. MS-CIT प्रमाणपत्र ३. सेवानिवृत्ती प्रमाणपत्र ४ ओळखपत्र (आधारकार्ड किंवा इतर) कागदपत्रे जोडणे आवश्यक आहे.
◾उमेदवारांनी मुलाखतीला जाताना जाहिरातीमध्ये दिलेला अर्जाचा नमुना नीट भरावा त्यामध्ये स्वतःचा सद्यस्थितीत चालू असलेला ई-मेल पत्ता व मोबाईल क्रमांक अचूक नमूद करायचा आहे.
◾अर्धवट भरलेले अर्ज स्वीकारले जाणार नाहीत तसेच वर दिलेल्या तारखेनंतर मुलाखतीला हजर राहता येणार नाही याची नोंद घ्यावी.
◾उमेदवाराने अर्जामध्ये दिलेली माहिती खोटी अथवा चुकीची आढळल्यास त्या उमेदवाराची निवड रद्द केल्या जाईल..
◾वरील लेखामध्ये माहिती अर्धवट असू शकते, संपूर्ण माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात काळजीपूर्वक वाचावी व मुलाखतीला जावे.