लाईनमन,वायरमन व संगणक चालक पदांसाठी धाराशिव येथे मोठी भरती;लगेचच अर्ज करा

उमेदवाराने www.apprenticeshipindia.gov.in या संकेतस्थळावर नोंदणी केलेली असणे आवश्यक आहे. सदर भरती ही फक्त धाराशिव जिल्हयातील रहिवाशी असलेल्या उमेदवारांसाठी असून इतर जिल्ह्यातील उमेदवारांच्या अर्जाचा विचार केला जाणार नाही याची नोंद घ्यावी. ऑनलाईन अर्ज सादर केलेल्या उमेदवारांनी सर्व संबंधीत कागदपत्रांची (शैक्षणिक प्रमाणपत्र आयटीआय गुणपत्रक व सनद, एसएससी सनद, जातीचा दाखला, आधारकार्ड, रहिवाशी दाखला, बँक पासबुक पहिल्या पानाची छायांकीत प्रत, ई.) साक्षांकीत छायांकित प्रत दिनांक २७.१२.२०२४ पर्यंत महावितरण मंडळ कार्यालय, धाराशिव, सोलापुर रोड, धाराशिव येथे प्रत्यक्ष सादर करावी. तसेच शैक्षणिक व इतर कागदपत्रांची साक्षांकीत केलेली छायांकित प्रत सादर न करणा-या उमेदवाराच्या ऑनलाईन अर्जाचा विचार केला जाणार नाही.

व्हाट्सअप ग्रुप जॉईन व्हा
टेलिग्राम ग्रुप जॉईन व्हा

भरती प्रक्रियेत आवश्यकता भासल्यास कोणताही बदल करण्याचे अथवा भरतीच्या कोणत्याही टप्यावर रदद करण्याचे सर्व अधिकार निम्नस्वाक्षरीकार यांना राहतील. उमेदवाराने लोकप्रतिनीधी अथवा राजकिय व्यक्तिकडुन दबाव आणल्यास त्या उमेदवाराची उमेदवारी रदद करण्याचे अधिकार निम्नस्वाक्षरीकार यांना राहतील. भरती प्रक्रियेसाठी आवश्यक असलेल्या कागदपत्रांच्या संपुर्ण प्रती मंडळ कार्यालय, धाराशिव येथे सादर कराव्यात अपुर्ण कागदपत्रे असलेल्या उमेदवारांचा विचार केला जाणार नाही. याची नोंद घ्यावी. उमेदवारांना सुचित करण्यात येते की, अधिकारी यांना भ्रमणध्वनी / दुरध्वनीद्वारे संपर्क करू नये. प्रशिक्षण कालावधी एक वर्षाचा राहील. निवड झालेल्या शिकाऊ उमेदवारास प्रशिक्षण कालावधीत नियमाप्रमाणे विद्यावेतन अदा करण्यात येईल.

📑PDF जाहिरातयेथे क्लिक करा
💻अर्जाचा नमुनायेथे क्लिक करा