Bombay High Court Bharti 2025 : मुंबई उच्च न्यायालयाच्या मूळ शाखेच्या स्थापनेवर सफाई कामगार पदासाठी भरतीची जाहिरात प्रकाशित करण्यात आले असून यासाठी इच्छुक तसेच पात्रता धारक उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत.
निरोगी, इच्छुक व पात्र उमेदवारांनी त्यांचे अर्ज जाहिरातीमध्ये दिलेल्या विहित नमुन्यामध्ये सादर करावेत अर्ज सादर करताना आवश्यक कागदपत्रे प्रमाणपत्र तसेच किंवा डिमांड ड्राफ्ट इत्यादी सहित 20 जानेवारी 2025 पर्यंत किंवा त्या अगोदर पोहचतील असे बेताने पाठवायचे आहेत, हे अर्ज फक्त स्पीड पोस्टाने पाठवायचे आहेत याची उमेदवारांनी नोंद घ्यावी.
पदांचा तपशील शैक्षणिक पात्रता
या पदभरतीमध्ये सफाई कामगार हे पद भरले जाणार असून या पदाच्या एकूण रिक्त जागांची माहिती जाहिरातीमध्ये दिलेली आहे नियमाप्रमाणे निवड झालेल्या उमेदवाराला 16600 ते 52400 रुपये व महागाई भत्ता व इतर नियमाप्रमाणे लागू असणारे सर्व भत्ते देण्यात येणार आहेत. ही भरती कायमस्वरूपी असून इच्छुक व पात्रताधारक उमेदवारांना नोकरीची चांगली संधी चालून आलेली आहे.
तुम्ही सुद्धा या पद्धतीसाठी इच्छुक असाल तर तुम्ही भारताचे नागरिक असणे आवश्यक आहे, कमीत कमी सातवी पास असणे आवश्यक आहे व मराठी हिंदी भाषा लिहिता वाचता बोलता येणे आवश्यक असेल. तुम्हाला शौचालय ,स्नानगृह स्वच्छता, झाडू कामाचा तसेच कार्यालय परिसर स्वच्छतेचा पुरेसा अनुभव असेल तर या ठिकाणी अर्ज सादर करू शकणार आहेत.
अर्ज कसा करावा?
अर्जाचा नमुना जाहिरातीमध्ये दिलेला आहे अर्जाचा नमुना तुम्हाला व्यवस्थित रित्या भरून महाप्रबंधक, मूळ शाखा, उच्च न्यायालय मुंबई, वेतन व आस्थापना विभाग, दुसरा मजला, पीडब्ल्यूडी इमारत, फोर्ट मुंबई 400032 या ठिकाणी पाठवायचा आहे. स्पीड पोस्ट व्यतिरिक्त इतर कोणत्या माध्यमातून किंवा वरील नमूद केलेले दिनांकानंतर मिळालेल्या अर्जाचा विचार केला जाणार नाही.
लिफाफ्यावर सफाई कामगार पदासाठी अर्ज असे लिहावे सदर प्रक्रियेत दरम्यान घेतल्या जाणारा प्रात्यक्षिक परीक्षा, शारीरिक क्षमता चाचणी आणि मुलाखतीसाठी उमेदवाराला स्वखर्चाने हजर राहावे लागेल, नियुक्ती व अल्पसूची सर्वाधिकार प्रशासन उच्च न्यायालय मूळ शाखा मुंबई यांनी स्वतःकडे राखून ठेवलेले आहे.
अर्जाचे शुल्क (Bombay High Court Sweeper Bharti)
या पदभरतीसाठी अर्ज करते वेळेस तुम्हाला अर्ज शुल्क म्हणून 300 रुपये एवढे शुल्क भरावे लागेल हे शुल्क तुम्हाला पोस्टल ऑर्डर किंवा डिमांड ड्राफ्ट ने भरावे लागणार आहे हे डिमांड ड्राफ्ट पोस्टल ऑर्डर तुम्हाला बॉम्बे हायकोर्ट ओरिजनल साईड यांच्या नावाने काढलेला असाव, अर्जच शुल्क भरल्याशिवाय कोणत्या अर्ज विचारात घेतले जाणार नाहीत. व भरलेले शुल्क ना-परतावा असेल याची उमेदवाराने नोंद घ्यावी.
निवड पद्धत व आवश्यक कागदपत्रे
उमेदवारीची निवड मूल्यांकन पद्धतीने होणार आहे यामध्ये एकूण 50 गुण ठेवले जाणार असून त्यामध्ये सर्वाधिक गुण प्राप्त केलेल्या उमेदवाराची निवड या ठिकाणी केली जाणार आहे.
अर्ज सोबत जोडण्याची कागदपत्र उमेदवाराने अर्ज सोबत जन्मतारखेचा पुरावाचा दाखला, शैक्षणिक पात्रतेचे प्रमाणपत्र गुणपत्रक, अनुभवाचा दाखला,लहान कुटुंब बाबत घोषणापत्र, जातीचा दाखला, महाराष्ट्राचे अधिवास प्रमाणपत्र, उमेदवार शासकीय कर्मचारी असल्यास त्याच्या कार्यालयाचे ना हरकत प्रमाणपत्र, पोस्टल ऑर्डर/ डिमांड ड्राफ्ट व इतर आवश्यक कागदपत्र, आधार कार्ड व पॅन कार्ड सोबत जोडावे.
उमेदवारासाठी सूचना
अर्ज विहित नमुन्यातच सादर करावा अर्जातील संपूर्ण माहिती अचूक भरणे उमेदवारास बंधनकारक आहे उमेदवाराने अर्ज भरताना संपूर्ण नाव, पत्ता, मोबाईल नंबर, ईमेल आयडी, जन्मतारीख त्यांच्याजवळ उपलब्ध असल्यामुळे कागदपत्रानुसार अचूक नमूद करावी.
उमेदवाराने एकापेक्षा जास्त अर्ज सादर केल्या शुल्कासह त्याचा शेवटचा अर्ज विचारात घेतला जाईल मुलाखतीसाठी बोलावण्यात येणारे उमेदवारांनी अर्ज सादर करताना दाखल केलेलय कागदपत्राच्या प्रति पडताळणीसाठी सोबत आणाव्यात.
तुम्ही सुद्धा या पदभरतीसाठी इच्छुक असाल तर खाली दिलेल्या लिंक वरून जाहिरातीचा नमुना डाऊनलोड करा व्यवस्थित रित्या भरून आवश्यक त्या अर्जाचा शुल्क व कागदपत्रासह दिलेल्या तारखेअगोदर पाठवावा वर दिलेले माहिती अर्धवट असू शकते त्यामुळे उमेदवाराने संपूर्ण जाहिरात व्यवस्थितरीत्या वाचूनच अर्ज सादर करावे ही विनंती.
मूळ जाहिरात व अर्जाचा नमुना : डाऊनलोड करा