Created by Ashish, 16 February 2025
ZP Recruitment 2025 : जिल्हा परिषद भंडारा राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत विविध पदासाठी भरतीची जाहिरात प्रकाशित करण्यात आलेले आहे यासाठी इच्छुक तसेच पात्र उमेदवाराने ऑफलाइन पद्धतीने सादर करायचे आहे सादर करणे अगोदर उमेदवाराने सविस्तर जाहिरात वाचावी. या पदभरती मध्ये स्टाफ नर्स, प्रोग्राम असिस्टंट, टेक्निशियन, डेंटल असिस्टंट व इतर पदांचा समावेश आहे. तुम्ही सुद्धा या पदभरतीसाठी इच्छुक असाल तसेच पात्र असाल तर खाली दिलेल्या लिंक वरून जाहिरात डाऊनलोड करावी व जाहिरातीमधील अर्जाच्या नमुन्यातच खाली दिलेल्या पत्त्यावर 03 मार्च 2025 वाजेपर्यंत पोहोचतील अशा बेताने अर्ज सादर करावे.
Zilla Parishad Bhandara Rashtriya Arogya Abhiyan has published recruitment advertisement for various posts so interested as well as eligible candidates have to apply through offline mode, candidate should read detailed advertisement before submitting. |
◾भरतीचा विभाग : हि नोकरी जिल्हा परिषद अंतर्गत आरोग्य विभागामध्ये निघाली आहे,विविध पदांसाठी भरतीची जाहिरात प्रकाशित करण्यात आली आहे.
◾भरतीचा प्रकार : सरकारी नोकरीची संधी
◾पदांचे नाव : विविध पदांसाठी भरती
◾शैक्षणिक पात्रता : पदानुसार शैक्षणिक पात्रता असून उमेदवाराने जाहिरात वाचून अर्ज सादर करावा.
◾अर्ज करण्याची पद्धत : विहित नमुन्यात ऑफलाईन पद्धतीने दिलेल्या पत्त्यावर अर्ज पाठवायचे आहेत.
🔺वरील लेखात माहिती अर्धवट असू शकते संपूर्ण माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात काळजीपूर्वक वाचावी व अर्ज सादर करावा ,कोणत्याही भरतीसाठी आर्थिक व्यवहार करू नये.
◾पदांचे नाव व आवश्यक अर्हता
▪️स्टाफ नर्स, प्रोग्राम असिस्टंट, टेक्निशियन, डेंटल असिस्टंट व इतर- 64 जागा
◾शैक्षणिक पात्रता : मान्यताप्राप्त विद्यापीठातून १२वी पास व संबंधित विषयात पदवीधर अथवा पदव्युत्तर
◾नोकरीचे ठिकाण : जिल्हा परिषद भंडारा
◾वयोमर्यादा : अर्जदाराचे वय 38 वर्षापेक्षा अधिक नसावे.
◾शेवटची तारीख :या भरतीसाठी उमेदवाराने 03 मार्च 2025 पर्यंत पाठवायचे आहेत.
◾अर्ज पाठविण्याचा पत्ता : राष्ट्रीय आरोग्य अभियान,जिल्हा सामान्य रुग्णालय परिसर,भंडारा व जिल्हा कार्यक्रम व्यवस्थापक कक्ष,राष्ट्रीय आरोग्य अभियान कार्यालय,आरोग्य विभाग,जिल्हा परिषद परिसर,भंडारा
◾मासिक वेतन : निवड झालेल्या उमेदवाराला 35000-125000 मासिक वेतन दिले जाणार आहे.
◾अधिकृत संकेतस्थळ : https://bhandara.gov.in/
◾उमेदवारांसाठी अटी व शर्ती
◾उमेदवारांनी उपरोक्त पदाकरिता आपले अर्ज जिल्हा कार्यक्रम व्यवस्थापक कक्ष, राष्ट्रीय आरोग्य अभीयान कार्यालय, आरोग्य विभाग, जिल्हा परिषद परिसर, भंडारा येथे दिनांक 03 मार्च, 2025 रोजी पर्यंत कार्यालयीन वेळेत सुट्टीचे दिवस वगळून नोंदणीकृत पोस्टाद्वारे सादर करावे व त्यानंतर प्राप्त होणारे अर्ज स्विकृत करण्यात येणार नाही. तसेच नोंदणीकृत पोस्टाद्वारे शेवटच्या दिनांकानंतर प्राप्त अर्ज स्विकृत करण्यात येणार नाही, याची उमेदवारांनी नोंद घ्यावी.
◾मुलाखती/कौशल्य चाचणी करीता उपस्थीत राहण्याकरिता उमदेवारांना प्रवास भत्ता व इतर कुठलाही भत्ता देय राहणार नाही,
◾वरील पदावर दिलेल्या कर्मचाऱ्यांना त्यांच्या नियुक्तीच्या ठिकाणी राहणे बंधनकारक आहे. अशा प्रकारे उमदेवार राहत नसल्याचे निर्देशनास आल्यास त्या उमेदवाराच्या सेवा समाप्त करण्यात येतील.
◾पदभरती जाहीरातमध्ये राखीव प्रवर्गाकरिता असलेल्या पदांकरिता राखीव प्रवर्गाचे उमदेवार पुरेशा प्रमाणामध्ये उपलब्ध न झाल्यास रिक्त पदांच्या भरतीची आवश्यकता लक्षात घेऊन प्रतिक्षा यादीतील निवड केलेल्या खुल्या प्रवर्गातील पात्र उमेदवारांना तात्पुरती नियुक्ती देण्यात येईल व संबंधीत उमेदवार प्राप्त झाल्यानंतर त्यांची नियुक्ती संपुष्टात येईल.
PDF जाहिरात | येथे क्लिक करा |
अर्जाचा नमुना | येथे क्लिक करा |
Discover more from Job Placement
Subscribe to get the latest posts sent to your email.