(MHADA) म्हाडा मुंबई येथे विविध पदांसाठी नवीन भरती प्रक्रिया सुरु | MHADA Mumbai Bharti 2025

Created by Ashish, 19 February 2025

व्हाट्सअप ग्रुप जॉईन व्हा
टेलिग्राम ग्रुप जॉईन व्हा

MHADA Mumbai Bharti 2025 : महाराष्ट्र गृहनिर्माण व क्षेत्र विकास प्राधिकरण अंतर्गत विविध पदासाठी भरतीची जाहिरात प्रकाशित करण्यात आलेली आहे यासाठी इच्छुक तसेच पात्र उमेदवारांनी खालील दिलेल्या लिंक वरून ऑनलाईन पद्धतीने अर्ज सादर करायचे आहेत हे अर्ज 21 फेब्रुवारी 2025 पर्यंत सादर करायचे असून अर्ज सादर करण्या अगोदर उमेदवारांनी व्यवस्थितरित्या जाहिरात वाचावी आणि पात्र असेल तरच अर्ज सादर करावा ऑनलाईन अर्ज बरोबरच तुम्ही ऑफलाइन पद्धतीने सुद्धा अर्ज सादर करू शकणार आहात अर्जाचा नमुना जाहिरातीमध्ये दिलेला आहे खालील लिंक वरून अर्जाचा नमुना व जाहिरात डाऊनलोड करू शकता तसेच ऑनलाइन पद्धतीने अर्ज सुद्धा सादर करू शकता.

Maharashtra Housing and Area Development Authority has published the recruitment advertisement for various posts, interested as well as eligible candidates have to submit their applications through online mode from the link given below and submit their applications by 21st February 2025.

◾भरतीचा विभाग : हि महाराष्ट्र गृहनिर्माण व क्षेत्रविकास प्राधिकरणांतर्गत निघालेली आहे.
भरतीचा प्रकार : सरकारी नोकरीची संधी
पदांचे नाव : विविध पदांसाठी भरती
शैक्षणिक पात्रता : पदानुसार शैक्षणिक पात्रता असून उमेदवाराने जाहिरात वाचून अर्ज सादर करावा.
अर्ज करण्याची पद्धत : मुलाखतीद्वारे निवड होणार आहे.

पदांचे नाव व आवश्यक अर्हता

व्हाट्सअप ग्रुप जॉईन व्हा
टेलिग्राम ग्रुप जॉईन व्हा

▪️स्थापत्य अभियंता -02 जागा
शिक्षण : मान्यताप्राप्त विद्यापीठातील स्थापत्य अभियांत्रिकेमध्ये पदविका,पदवी अथवा पदव्युत्तर पदवी धारण केलेली असावी.
▪️माहिती व्यवस्थापन प्रणाली तज्ज्ञ -02 जागा
शिक्षण : मान्यताप्राप्त विद्यापीठातील संगणक विज्ञान,एमसीए अथवा समकक्ष पात्रता धारण केलेली असावी.

एकूण पदसंख्या : 04 जागा
नोकरीचे ठिकाण : वांद्रे,मुंबई, महाराष्ट्र
वयोमर्यादा : अर्जदाराचे वय जास्तीत जास्त खुल्या प्रवर्गासाठी 38 वर्षे आणि मागासवर्गींसाठी 43 वर्षापेक्षा अधिक नसावे.
शेवटची तारीख : आवश्यक त्या कागदपत्रासह 21 फेब्रुवारी 2025 पर्यंत अर्ज सादर करावेत.
अर्ज पाठविण्याचा पत्ता : रुम नं. 168, पोट मजला, कोकण गृहनिर्माण व क्षेत्रविकास मंडळ, गृहनिर्माण भवन, कलानगर, वांदे (पूर्व), मुंबई – 400051
मासिक वेतन : निवड झालेल्या उमेदवाराला 40000 – 70000 मासिक वेतन दिले जाणार आहे.

अधिकृत संकेतस्थळ : https://www.mhada.gov.in/
ईमेल आयडी : konkanmhada2008@gmail.com
अर्जासोबत जोडावयाचे आवश्यक कागदपत्रेः
a) उमेदवाराने अर्जासोबत वयाचा दाखला म्हणून शाळा सोडल्याचा दाखला/ शालांत परिक्षा प्रमाणपत्र.
b) आधारकार्डची छायांकीत प्रत.
c) शैक्षणिक अर्हताचे छायांकीत प्रत.
d) अनुभव असल्यास अनुभव प्रमाणपत्र व मुलाखतीच्या अनुषंगाने इतर आवश्यक मुळ कागदपत्रांच्या स्वसाक्षांकीत प्रती.
e) इतर आवश्यक कागदपत्रे.

उमेदवारांसाठी अटी व शर्ती

◾निवड प्रक्रिये संदर्भात उमेदवारांशी करण्यात येणारा संपूर्ण पत्रव्यवहार आणि सूचना या उमेदवारांनी अर्जात नमूद केलेल्या ई-मेल आयडीवरच कळविण्यात येतील. यामुळे उमेदवारांनी मोबाईल क्र. व ई-मेल आयडी अर्जात काळजीपूर्वक व अचूक नमूद करण्याबाबत विशेष दक्षता घ्यावी.
◾उमेदवाराने A-4 साईजच्या पांढऱ्या कागदावर सोबत दिलेल्या विहीत नमुन्यातील अर्ज सादर करावा. अर्ज स्वतःच्या अक्षरात भरलेला व वाचनीय असावा,
◾उमेदवाराने अर्जावर अलीकडच्या काळातील एक पासपोर्ट साईज फोटो चिटकावून फोटोवर उमेदवारांनी स्वतःची स्वाक्षरी करावी.
◾उमेदवारास मुलाखती करिता स्वखर्चाने यावे लागेल व त्याबाबतीत कोणत्याही प्रकारचा मोबदला या कार्यालयाकडून देण्यात येणार नाही.

PDF जाहिरातयेथे क्लिक करा
अर्जाचा नमुनायेथे क्लिक करा

Discover more from Job Placement

Subscribe to get the latest posts sent to your email.

Discover more from Job Placement

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading