१५ वा वित्त आयोग अंतर्गत प्रकल्प अंमलबजावणी आराखड्यानुसार मंजूर कंत्राटी पदांपैकी रिक्त पदे भरण्याकरिता विविध कार्यक्रमांमधील रिक्त पदांची जाहिरात www.thanecity.gov.in या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात येत आहे. अर्ज करावयाच्या पध्दतीबाबत सर्वसाधारण सुचना / माहिती पुढीलप्रमाणे आहेत. सर्व सूचनांचे काळजीपूर्वक अवलोकन करून अर्ज विहित केलेल्या पध्दतीनुसारच सादर करावा. अर्जामध्ये दिलेली माहिती व कागदपत्रे यांच्या आधारे उमेदवाराची पात्रता / अपात्रता तपासण्यात येईल व त्या आधारे त्याचा समावेश पुढील निवड प्रक्रियेत करण्यात येईल. तथापि, अर्ज स्वीकारण्यात आला किंवा पुढील निवड प्रक्रियेत समावेश करण्यात आला म्हणजे उमेदवार त्या कंत्राटी पदाकरीता पात्र आहे असा अर्थ होणार नाही. निवड प्रक्रियेदरम्यान कोणत्याही वेळी किंवा निवडीनंतर अर्जदार विहित अर्हता धारण करीत नसल्याचे किंवा कोणत्याही कारणास्तव अपात्र ठरत असल्याचे निदर्शनास आल्यास अशा उमेदवाराची उमेदवारी वा निवड तात्काळ रद्द करण्यात येईल.
PDF जाहिरात | येथे क्लिक करा |
अर्जाचा नमुना | येथे क्लिक करा |