Created by Ashish, 08 March 2025
Mahatransco Bharti 2025 :महाराष्ट्र राज्य विद्युत पारेषण कंपनी अंतर्गत लिपिक पदासाठी तब्बल 260 रिक्त जागावर भरतीची जाहिरात प्रकाशित करण्यात आली असून यासाठी ऑनलाइन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत. इच्छुक तसेच पात्र उमेदवारांनी ऑनलाइन अर्ज सादर करावे ऑनलाईन अर्ज सादर करण्याकरिता लिंक आणखी तयार झालेली नसून ही लिंक लवकरच तयार होईल त्यानंतर उमेदवाराने त्या लिंक वरून अर्ज सादर करायचे आहेत.
Maharashtra State Electricity Transmission Company has published a recruitment advertisement for 260 vacant posts for the post of Clerk and applications are being invited online. |
◾भरतीचा विभाग : हि भरती महाराष्ट्र राज्य विद्युत पारेषण कंपनी अंतर्गत निघाली आहे.
◾भरतीचा प्रकार : पर्मनंट सरकारी नोकरीची संधी
◾पदांचे नाव : निम्नस्तर लिपिक
◾शैक्षणिक पात्रता : मान्यताप्राप्त विद्यापीठातून वाणिज्य शाखेत पदवी धारण केलेली असावी.
◾अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाईन अर्ज अर्ज सादर करावा.
◾पदांचे नाव व आवश्यक अर्हता
▪️निम्नस्तर लिपिक – 260 जागा
▪️शैक्षणिक पात्रता : मान्यताप्राप्त विद्यापीठातून वाणिज्य शाखेत पदवी धारण केलेली असावी व MSCIT परीक्षा उत्तीर्ण असावी.
▪️अनुभव : संबंधित क्षेत्रातील अनुभव असल्यास प्राधान्य देण्यात येईल.
◾नोकरीचे ठिकाण : अमरावती, छत्रपती संभाजीनगर, नाशिक, नागपूर, कराड, पुणे, वाशी
◾वयोमर्यादा : उमेदवारांनाच वय कमीत कमी 18 वर्षे व जास्तीत जास्त 38 वर्षे असावे.
◾अर्ज करण्याची शेवटची तारीख : लवकरच कळविण्यात येईल.
◾अर्जाचे शुल्क : खुल्या प्रवर्गासाठी 600 रुपये व राखीव प्रवर्गासाठी 300 रुपये
◾मासिक वेतन : निवड झालेल्या उमेदवाराला 34000 ते 86865 रुपये मासिक वेतन दिले जाणार आहे.
◾अधिकृत संकेतस्थळ : https://www.mahatransco.in/
◾उमेदवारांसाठी अटी व शर्ती
◾ऑनलाईन अर्ज सादर करण्याकरीता URL Link तयार करण्याचे काम सुरु आहे. अर्ज करण्याकरीताची URL Link तयार झाल्यानंतर त्याबाबतची अधिसूचना तातडीने व स्वतंत्रपणे कंपनीच्या संकेतस्थळावर प्रसारित करण्यात येईल व अर्ज सादर करण्याची सुविधा अर्जदारांना उपलब्ध करुन देण्यात येईल. तरी संभाव्य अर्जदारांनी कंपनीच्या संकेतस्थळावर लक्ष ठेवावे.
◾जाहिरातीत दर्शविण्यात आलेली अर्हता ही ‘किमान’ अर्हता आहे आणि केवळ ही किमान अर्हता धारण केली आहे हाच निकष मानून उमेदवार संबंधित पदाच्या निवडीसाठी पात्र ठरु शकणार नाही.
◾ या जाहिरातीला अनुसरुन पात्र उमेदवारांनी ऑनलाईन पध्दतीने विहित मुदतीत सादर केलेलेच अर्ज विचारात घेतले जातील. अन्य पध्दतीने सादर केलेले अर्ज विचारात घेतले जाणार नाही.
◾ उमेदवाराने महाराष्ट्र नागरी सेवा (लहान कुटुंबाचे प्रतिज्ञापत्र) नियम, २००५ मधील तरतुदीप्रमाणे एक आवश्यक बाब म्हणून ‘लहान कुटुंब’ असल्याचे प्रतिज्ञापत्र भरुन देणे आवश्यक आहे.
PDF जाहिरात | येथे क्लिक करा |
ऑनलाईन अर्ज | येथे क्लिक करा |
Discover more from Job Placement
Subscribe to get the latest posts sent to your email.