नाशिक महानगरपालिकेमध्ये विविध पदांसाठी नवीन भरती सुरु;पगार 25000 रुपये | Nashik Mahanagarpalika Bharti 2025

Nashik Mahanagarpalika Bharti 2025 : नाशिक महानगरपालिका सार्वजनिक आरोग्य विभाग अंतर्गत खालील पदे मानधन पध्दतीने भरण्यासाठी अर्हताधारक उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. किमान शैक्षणिक अर्हता धारण करणाऱ्या संबंधित उमेदवारांनी आवश्यक त्या सर्व प्रमाणपत्रासह जाहिरात वरील विहित नमुन्यातील अर्ज डाऊनलोड करुन व्यवस्थित भरून सर्व आवश्यक कागदपत्रांसह सादर करावा.अर्ज दाखल करतांना मुळ प्रमाणपत्र सोबत ठेवावीत. मुळ प्रमाणपत्रांची खात्री करुनच अर्ज दाखल करता येईल अन्यथा दाखल करुन घेतला जाणार नाही.

व्हाट्सअप ग्रुप जॉईन व्हा
टेलिग्राम ग्रुप जॉईन व्हा

शैक्षणिक पात्रता व इतर निकष

इच्छुक उमेदवार मान्यताप्राप्त विद्यापीठातून बी.ई./बी.टेक. उत्तीर्ण असावा व संबंधित क्षेत्रातील किमान 02 वर्षाचा अनुभव असणे आवश्यक आहे. सदर पदांकरिता कमाल वयोमर्यादा 58 वर्षापर्यंत राहील याची नोंद घ्यावी.

अर्जाचे शुल्क

अर्जाच्या शुल्काची माहिती जाहिरातीमध्ये दिलेली नसून शहानिशा करूनच आर्थिक व्यवहार करावा.

निवड प्रक्रिया

पात्रतेसाठी एकुण 100 गुण असतील व त्यांची विभागणी अंतिम वर्षाचे गुण, संबधित विषयामध्ये अधिकची शैक्षणिक अर्हता, संबंधीत पदाशी निगडीत अनुभव या प्रमाणे असेल.

व्हाट्सअप ग्रुप जॉईन व्हा
टेलिग्राम ग्रुप जॉईन व्हा

अर्ज स्विकारण्याचे ठिकाण

सार्वजनिक वैद्यकिय विभाग, 3 रा मजला. राजीव गांधी भवन, शरणपूर रोड, नाशिक

अर्ज करण्याचा कालावधी

अर्ज कार्यालयीन सुटटी व सार्वजनिक सुट्टी वगळून सकाळी 10.00 ते 05.00 वाजेपर्यंत स्विकारण्यात येतील. अर्ज स्विकारण्याची अंतिम तारीख व वेळ 08 ऑगस्ट 2025 सायं 5.00 वाजेपर्यंत. तदनंतर आलेल्या अर्जाचा विचार केला जाणार नाही.

पदाचे नाव व तपशील

बायोमेडीकल इंजिनियर – 02 जागा

मासिक वेतन (NMMC Bharti 2025)

निवड झालेल्या उमेदवाराला कमीत कमी 25,000 रुपये एवढे मासिक वेतन असेल याशिवाय केंद्र सरकार द्वारे मिळणारे भत्ते व इतर फायदे सुद्धा उमेदवाराला मिळणार आहेत.

अर्जाच्या शुल्कव्यतिरिक्त इतर कोणतेही शुल्क किंवा आर्थिक देवाण-घेवाण करू नये किंवा कोणी नोकरी मिळवून देतो म्हणून पैसे उकळत असेल तर अश्या भूलथापांना बाली पडू नये. या भरती विषयीची अधिक माहिती https://nmc.gov.in/ या संकेतस्थळावर जाऊन तपासू शकता.

अटी व शर्ती
  • शासकीय / निमशासकीय / स्थानिक स्वराज्य संस्थेकडील / खाजगी रुग्णालयातील संबंधित विषयातील अनुभवास प्राधान्य. (अनुभव प्रमाणपत्र आवश्यक)
  • सदरील पदांचा मनपा, नाशिक मनपाच्या स्थायी आस्थापनेशी कोणत्याही प्रकारचा संबंध राहणार नाही.
  • सदरची नियुक्ती हि निव्वळ कंत्राटी स्वरुपाची असेल.
  • मनपा कायम पदांना मिळणारा लाभ या पदांकरिता लागु राहणार नाही.
  • सदरील पदे ही तात्पुरत्या स्वरुपाची एकत्रित मानधनावर भरावयाची असून सदर पदावर निवड झालेल्या उमेदवारांचा नाशिक मनपा सेवेत कायम करुन घेणेचा व मुदतवाढीचा दावा मान्य केला जाणार नाही. सुरुवातीस निवड झालेल्या उमेदवारांना प्रथमतः ६ महिन्यासाठी तात्पुरत्या स्वरुपात कामाचे आदेश दिले जातील. तसेच त्यानंतर सदर उमेदवारांची आवश्यकता असल्यास सक्षम प्राधिकरणाच्या मान्यतेने पुढील कामाचे आदेश दिले जातील.
  • उच्च शैक्षणिक अर्हता प्राप्त उमेदवार यांना प्राधान्य देणेत येईल.
  • उमेदवारांनी कुठल्याही प्रकारचा राजकीय दबाव आणल्यास त्यांना नियुक्तीस अपात्र ठरविण्यात येईल.
  • नियुक्तीबाबतचा अंतिम अधिकार मा. आयुक्त तथा प्रशासक सो., मनपा, नाशिक यांनी राखून ठेवला आहे.
PDF जाहिरातयेथे क्लिक करा
अर्जाचा नमुनायेथे क्लिक करा
FAQ (Frequently Asked Question)

1.हि भरती कुठे आहे?
Ans : हि भरती नाशिक महानगरपालिका राबविण्यात येणार आहे.

2.या भरतीसाठी अर्ज कसा करावा?
Ans : विहित अर्जाचा नमुना भरून वर दिलेल्या पत्त्यावर पाठवायचा आहे.

3.पगार किती मिळेल?
Ans : दरमहा 25000 रुपये पर्यंत पगार मिळेल.

4.निवड कशी होईल?
Ans : परीक्षा व मुलाखतीद्वारे निवड केली जाईल.

5.अर्ज शुल्क किती आहे?
Ans : अर्जाच्या शुल्काची माहिती जाहिरातीमध्ये दिलेली नाही.