Close Visit JobPlacement

बृहन्मुंबई महानगरपालिकेत 10वी,12वी पासवर नोकरीची उत्तम संधी !! पगार.. | BMC Bharti 2025

BMC Bharti 2025 : बृहन्मुंबई महानगरपालिकेतील सार्वजनिक आरोग्य खात्यांतर्गत मुरली देवरा महानगरपालिका नेत्र रुग्णालयाच्या आस्थापनेवरील ‘प्रयोगशाळा तंत्रज्ञ’ व ‘नोंदणी सहाय्यक’ या संवर्गाची रिक्त पदे कंत्राटी तत्वावर भरण्यासाठी मंजुरी प्राप्त झाली आहे.

व्हाट्सअप ग्रुप जॉईन व्हा
टेलिग्राम ग्रुप जॉईन व्हा

सदर मंजुरीच्या अनुषंगाने ‘प्रयोगशाळा तंत्रज्ञ’ व ‘नोंदणी सहाय्यक’ या संवर्गाची अर्हता/पात्रता धारण करणा-या व अटींची पुर्तता करणा-या इच्छूक उमेदवारांकडून विहीत नमुन्यात अर्ज मागिवण्यात येत आहेत. सदर पदे कंत्राटी तत्वावर आवश्यकतेप्रमाणे भरली जातील.

बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या रुग्णालयाकरिता विविध पदे भरण्यासाठी जाहिरात प्रकाशित करण्यात आलेली आहे यासाठी इच्छुक तसेच पात्र उमेदवारांकडून ऑफलाइन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत.

तरुणांना नोकरीची चांगली संधी मुंबई महानगरपालिके मध्ये उपलब्ध झाली असून इच्छुक तसेच पात्र उमेदवाराने खाली दिलेली संपूर्ण जाहिरात व्यवस्थितरित्या वाचावी व पात्रता धारण करत असल्यास अर्ज सादर करावा. कमीत कमी 10वी, 12वी पास उमेदवार अर्ज करू शकतील त्यासाठीच्या अटी व इतर पात्रता उमेदवाराने वाचायच्या आहेत आणि त्यानंतर अर्ज सादर करायचा आहे.

व्हाट्सअप ग्रुप जॉईन व्हा
टेलिग्राम ग्रुप जॉईन व्हा

पदाचा तपशील

  • प्रयोगशाळा तंत्रज्ञ – 01 जागा
  • नोंदणी सहायक – 01 जागा

शैक्षणिक पात्रता व इतर निकष

  • प्रयोगशाळा तंत्रज्ञ : उमेदवार मान्यताप्राप्त विद्यापिठाची विज्ञान शाखेतील (Degree in B.Sc) पदवी धारण करणारा असावा आणि मान्यताप्राप्त विद्यापिठाची (MSBTE) ची /डी.एम.एल.टी (D.M.L.T.) पदविका उत्तीर्ण असावा. (B.Sc. + D.M.L.T.) किंवा उमेदवाराने 12 वी नंतर महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापिठ यांचेकडील निम वैद्यकीय तंत्रज्ञान या शाखेतील लॅबोरेटरी मेडीसीन या विषयातील (Bachelor of Paramedical Technology in Laboratory Medicine) पदवी धारण करणारा असावा.
  • नोंदणी सहायक : मराठी, हिंदी व इंग्रजी विषयांसह किमान 50% गुणांसह 10वी उत्तीर्ण. उमेदवाराचे हस्ताक्षर सुस्पष्ट असावे.
  • उमेदवाराचे वय जाहिरात परिषदेच्या दिवशी कमीत कमी 18 वर्षे जास्त 38 वर्ष असावे त्यापेक्षा जास्त असू नये.

निवडीचे निकष (BMC Bharti 2025)

१) सदर पदाची विहित केलेली शैक्षणिक अर्हता व मुलाखतीच्या प्राप्त झालेल्या गुणांच्या आधारे उमेदवारांची गुणवत्ता तयार करण्यात येईल. गुणवत्ता यादीतील उमेदवारांमधून निवड यादी तयार करण्यात येईल.

२) प्रथम प्रयत्नात उत्तीर्ण झालेल्या उमेदवारांना प्राधान्य देण्यात येईल. उमेदवार दोन किंवा तीन प्रयत्नांत उत्तीर्ण झाला असेल तर अंतिम गुणांमधून 5 गुण, 10 गुण वजा करण्यात येतील. तीन पेक्षा जास्त प्रयत्नांत परीक्षा उत्तीर्ण झालेल्या उमेदवारांचा विचार केला जाणार नाही. समान गुण धारण करणा-या अर्हता प्राप्त उमेदवारांना जन्मतारखेनुसार वयोजेष्ठतेने प्राधान्य देण्यात येईल. (पदवीस प्राधान्य देण्यात येईल.)

३) निवड यादी रूग्णालयाच्या स्थानिक सूचना फलकावर प्रदर्शित करण्यात येईल.

अर्ज करण्याची पद्धत व कालावधी

उमेदवारांनी ऑफलाइन पद्धतीने अर्ज सादर करायचा असून 21 ऑगस्ट 2025 ते 10 सप्टेंबर 2025 पर्यंत ऑफलाइन पद्धतीने उमेदवाराने अर्ज सादर करायचे आहेत.

उमेदवारांनी जाहिरातीमधील अर्जाचा नमुना व्यवस्थितरित्या भरून आवश्यक असलेल्या सर्व शैक्षणिक कागदपत्र जोडून प्रमुख वैद्यकीय अधिकारी, मुरली देवरा महानगरपालिका नेत्र रुग्णालय, प्रशासकीय कार्यालय, मौलाना शौकत अली रोड, दुर्गा देवी उद्यानासमोर, मुंबई- 400008. येथे दि.10.09.2025 रोजी सायंकाळी 05.00 वाजेपर्यंत सादर करावेत.

अर्जाचे शुल्क

मुरली देवरा महानगरपालिका नेत्र रुग्णालयाच्या कार्यालीन वेळेत कार्यालयातून चलन घेऊन अर्जदाराने अर्जाचे शुल्क रु.७९०/- +१८ जीएसटी रू.१४३/- रू.९३३/- एकुण शुल्क महानगरपालिकेच्या नागरी सुविधा केंद्रात (CFC) रोखीत भरावे. (सदर शुल्क ना परतावा राहिल व कोणत्याही परिस्थितीत परत केले जाणार नाही.)

शुल्क भरल्याची मूळ पावती अर्जासोबत जोडून, पूर्ण भरलेला अर्ज सोबत सर्व कागदपत्रे (स्वतः सांक्षांकीत केलेल्या प्रमाणपत्रांच्या छायांकित प्रतीसह) जोडून मुरली देवरा महानगरपालिका नेत्र रुग्णालयाच्या कार्यालीन वेळेत आवक जावक विभागात सादर करावे.

सर्वसाधारण अटी व सूचना

  • अर्ज विहित नमुन्यात स्वहस्ताक्षरात सर्व दृष्टीने पूर्ण असावेत. उमेदवाराचा भ्रमणध्वनी क्रमांक, ई-मेल आयडी आणि पत्रव्यवहारचा पत्ता (पिनकोड सह) सुस्पष्ट व पूर्ण असावा. विहित नमुन्यामध्ये नसलेले व अपूर्ण अर्ज विचारात घेतले जाणार नाही.
  • अलिकडच्या काळात काढलेले पारपत्र आकारातील उमेदवाराचे छायाचित्र त्याच्या स्वाक्षरीसह अर्जावर नमूद केलेल्या ठिकाणी चिकटवावे. त्याच छायाचित्राच्या दोन अतिरिक्त प्रती पुढील निवड प्रक्रियेसाठी उमेदवाराजवळ ठेवणे आवश्यक आहे.
  • महिला उमेदवारांनी विवाहनोंदणी प्रमाणपत्र, नावात बदल झाल्याचे राजपत्र सादर करावे. तसेच ते नसल्यास विवाहित महिला उमेदवार विवाहपूर्वीच्या नावाने अर्ज करू शकतात.
  • उमेदवाराने अर्जासोबत शाळा सोडलेल्या दाखल्याची प्रत, जन्म प्रमाणपत्र, दहावी, बारावी व पदवी प्रमाणपत्रे यांच्या स्वतः सांक्षांकीत केलेल्या छायांकित प्रती अर्जासोबत जोडवीत.
  • उमेदवाराला कोणत्याही न्यायायालयाने नैतिक अधःपतन किंवा फौजदारी स्वरुपाच्य खटल्यात शिक्षा दिली असल्यास तसेच उमेदवाराविरूद्ध पोलिस चौकशी न्यायालयीन प्रकरण प्रलंबित असल्यास / शिक्षा झालेली असल्यास उमेदवाराने त्याबद्दल माहिती देणे आवश्यक आहे.

मासिक वेतन (Brihanmumbai Municipal Corporation)

निवड झालेल्या उमेदवाराला दरमहा 18-20 हजार रुपये एवढे मासिक वेतन देण्यात येणार आहे या व्यतिरिक्त महानगरपालिकेकडून कोणताही भत्ता देण्यात येणार नाही याची उमेदवारांनी नोंद घ्यावी.

PDF जाहिरातयेथे क्लिक करा
अर्जाचा नमुनायेथे क्लिक करा

 

FAQ (Frequently Asked Question)

1.हि भरती कुठे आहे?
Ans : हि भरती बृहन्मुंबई महानगरपालिकेमध्ये राबविण्यात येणार आहे.

2.या भरतीसाठी अर्ज कसा करावा?
Ans : विहित अर्जाचा नमुना भरून वर दिलेल्या पत्त्यावर समक्ष जाऊन सादर करायचा आहे.

3.पगार किती मिळेल?
Ans : दरमहा 18-20 हजार रुपये पर्यंत पगार मिळेल.

4.निवड कशी होईल?
Ans : परीक्षा व मुलाखतीद्वारे निवड केली जाईल.

5.अर्ज शुल्क किती आहे?
Ans : 790 रुपये व जीएसटी 143 रुपये असे एकूण 933 रुपये