बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या सार्वजनिक आरोग्य खात्यांतर्गत प्रमुख वैद्यकीय अधिक्षक व खाते प्रमुख (माध्यमिक आरोग्य सेवा) यांच्या अखत्यारित असलेल्या १६ उपनगरीय रुग्णालयांच्या आस्थापनेवरील खाली नमूद करण्यात आलेली विविध संवर्गातील पदे तात्पुरत्या स्वरुपात कंत्राटी तत्त्वावर ०२ वर्षाच्या कालावधीकरीता (प्रत्येक १७९ दिवसानंतर खंड देऊन) ठोक मानधनावर भरावयाची आहेत. त्यासाठीची निवड यादी बनविण्याकरिता सदर पदांच्या नमूद केलेल्या अर्हता व अटींची पूर्तता करणा-या इच्छुक उमेदवारांकडून अर्ज शुल्क रु. ७१०/- १८% जीएसटी १२८/- रु. ८३८/- इतके भरुन अर्ज वितरीत करण्यात येतील.
सदर अर्जाची विक्री व स्विकृती दि. २८.०१.२०२५ ते दि.१२.०२.२०२५ पर्यंत (कार्यालयीन वेळेत) संध्या. ४.०० वाजेपर्यंत प्रमुख वैद्यकीय अधिक्षक व खाते प्रमुख (माध्यमिक आरोग्य सेवा) यांचे कार्यालय, ७ वा मजला, बांद्रा भाभा रुग्णालय इमारत, वांद्रे पश्चिम, मुंबई ४०००५० येथे करण्यात येणार आहेत.
PDF जाहिरात | येथे क्लिक करा |
अधिकृत संकेतस्थळ | येथे क्लिक करा |