स्पर्धात्मक ऑनलाईन परीक्षा स्थगित वा रद्द करणे, परीक्षेचे स्वरूप, तारीख व ठिकाणात बदल करणे, पदसंख्या, अनुशेष व आरक्षण यात वाढ किंवा घट करण्याचे अंतिम अधिकार महामंडळास राहतील. वर दर्शविण्यात आलेल्या समांतर आरक्षणाचा पात्र उमेदवार प्राप्त न झाल्यास सामाजिक आरक्षणाच्या त्याच राखीव प्रवर्गातील इतर पात्र उमेदवारांचा नियमानुसार विचार केला जाईल.भरती प्रक्रिये संदर्भातील तक्रारींवर निर्णय घेण्याचा अंतिम अधिकार सिडको व्यवस्थापनाकडे राहील, याबाबत कोणत्याही पत्रव्यवहाराची दखल घेतली जाणार नाही. 4) ज्या उमेदवारांनी यापूर्वी त्यांचे नाव रोजगार व स्वयंरोजगार मार्गदर्शन केंद्राकडे सेवायोजन कार्यालय / समाज कल्याण / आदिवासी विकास प्रकल्प अधिकारी / जिल्हा सैनिक बोर्ड अपंग कल्याण कार्यालय इ. कार्यालयात नोंदविलेले आहे, अशा उमेदवारांनादेखील परीक्षेसाठी स्वतंत्ररित्या ऑनलाईन अर्ज करणे आवश्यक राहील.
सदर पदभरतीसाठी निव्वळ ऑनलाईन पद्धतीने अर्ज स्विकारले जातील, उमेदवारांचे अर्ज ऑनलाईन (Online) पध्दतीने स्विकारण्यात येणार असल्याने अर्ज करतांना शैक्षणिक कागदपत्रे, अन्य प्रमाणपत्रे जोडणे आवश्यक नाही. तथापि ऑनलाईन अर्जामध्ये उमेदवाराने त्यांच्या पात्रतेनुसार काळजीपूर्वक संपूर्ण व खरी माहिती भरणे आवश्यक आहे. ऑनलाईन पध्दतीने अर्ज भरतांना काही चुका झाल्यास किंवा त्रुटी राहील्यास व त्यामुळे भरतीच्या कोणत्याही टप्यावर अर्ज नाकारला गेल्यास त्याची सर्वस्वी जबाबदारी संबंधित उमेदवाराची राहील. याबाबत उमेदवारास तक्रार करता येणार नाही. ऑनलाईन अर्जात भरलेली माहिती बदलता येणार नाही. जाहिरातीत नमूद केलेल्या सर्व अटी तसेच शैक्षणिक अर्हता, आरक्षण, वयोमर्यादा, शिथीलीकरण इत्यादी पात्रता तपासूनच उमेदवारांनी ऑनलाईन अर्ज भरावा.
PDF जाहिरात | येथे क्लिक करा |
ऑनलाईन अर्ज | येथे क्लिक करा |