जिल्हाधिकारी कार्यालय भरती 2025 | विविध पदांसाठी अर्ज प्रक्रिया सुरु;पगार 35 हजार रुपये | Collector Office Bharti 2025

Collector Office Bharti 2025 : जिल्हाधिकारी कार्यालयांतर्गत महसूल व वन विभाग महाराष्ट्र शासन द्वारे काहीपदे भरायचे असून यासाठी इच्छुक तसेच पात्र उमेदवारांकडून 10 जानेवारी 2025 पर्यंत अर्ज मागविण्यात येत आहेत. तरी इच्छुक उमेदवारांनी संपूर्ण जाहिरात व्यवस्थितरित्या वाचून अर्ज सादर करावा.

व्हाट्सअप ग्रुप जॉईन व्हा
टेलिग्राम ग्रुप जॉईन व्हा
Government of Maharashtra has to fill some posts under Collectorate Revenue and Forest Department and applications are invited from interested and eligible candidates till 10th January 2025. However, interested candidates should read the entire advertisement properly and submit the application.

पदांचा तपशील व वेतन

या पदभरतीमध्ये विधी अधिकारी हे पद भरायचे आहे यासाठी उमेदवार मान्यता प्राप्त विद्यापीठ विद्यापीठाचा कायद्याचा पदवीधर असावा व सनद धारक असणे आवश्यक आहे, विधी अधिकारी या पदासाठी वकील व्यवसायाचा किमान सात वर्षाचा अनुभव असणे आवश्यक आहे. या पदासाठी दर महिना एकत्रित मानधन 30000 व दूरध्वनी व प्रवास खर्च 5000 असे एकूण 35 हजार रुपये मासिक वेतन उमेदवाराला दिले जाणार आहे.

वर नमूद केलेल्या पदाच्या कर्तव्य जबाबदाऱ्यासाठी मूळ जाहिरात डाउनलोड करावी व त्या जाहिरातीमध्ये दिलेल्या सर्व अटी शर्ती वाचून घ्याव्यात त्यासोबतच कर्तव्य जबाबदारी सुद्धा वाचून घ्याव्यात. ही पदभरती 10 जानेवारी 2025 पर्यंत असून 10 जानेवारी पूर्वी तुम्हाला अर्ज सादर करायचे आहेत त्यानंतर पात्र अपात्र उमेदवारांची यादी प्रसिद्ध करून उमेदवारांची निवड केल्या जाणार आहे.

उमेदवारासाठी सूचना

वरील शैक्षणिक पात्रता व अनुभव मधील सर्व कागदपत्रे उमेदवाराकडे असणे आवश्यक आहे व या कागदपत्रांच्या साक्षंकित प्रति सोबत जोडणे बंधनकारक राहील व मूळ कागद पत्रे मुलाखतीच्या वेळेस सादर करणे बंधनकारक राहील.

व्हाट्सअप ग्रुप जॉईन व्हा
टेलिग्राम ग्रुप जॉईन व्हा

सदर जाहिरात व सदर पदाकरिता विहित नमुन्यातील अर्ज, लहान कुटुंबाचे प्रतिज्ञापत्र खाली दिलेल्या लिंक वरून तुम्ही डाऊनलोड करू शकता. उमेदवाराने विहित नमुन्यातील अर्ज कागदावर ए४ टंकलिखित किंवा संगणकृत करून जिल्हाधिकारी तथा अध्यक्ष जिल्हा निवड समिती अधिकारी, जिल्हाधिकारी कार्यालय, चंद्रपूर या पत्त्यावर 10 जानेवारी 2025 संध्याकाळी 6.15 वाजेपर्यंत सादर करायचा आहे.

अंतिम निवड झालेल्या उमेदवाराचे नाव कार्यालयाच्या सूचना फलकावर तसेच संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात येईल. निवड झालेल्या उमेदवाराने विहित नमुन्यात करारनामा करून देणे बंधनकारक आहे.

करारनामा करून दिल्यानंतर निवड झालेल्या उमेदवारास कंत्राटी पद्धतीने नेमणूक करिता असल्याचे आदेश देण्यात येईल या प्रक्रियेमध्ये बदल करण्याचा स्थगित रद्द करण्याचा अधिकार जिल्हाधिकारी तथा अध्यक्षा जिल्हा निवड समिती चंद्रपूर यांना राहणार आहे.

तुम्ही सुद्धा या पद भरतीसाठी इच्छुक असाल तर खालील लिंक करून जाहिरात व अर्जाचा नमुना डाऊनलोड करू शकता व 10 जानेवारी 2025 पूर्वी ऑफलाइन पद्धतीने अर्ज सादर करू शकता वर दिलेली माहिती असू शकते त्यामुळे उमेदवाराने संपूर्ण जाहिरात वाचूनच अर्ज सादर करावा.

मूळ जाहिरात व अर्जाचा नमुना : डाऊनलोड करा