CPDO Mumbai Bharti 2024 : केंद्रीय कुक्कुट विकास संस्था मुंबई येथे 10 वी पासवर भरती;पगार 56900 रुपये

CPDO Mumbai Bharti 2024 : भारत सरकारच्या पशुपालन मत्स्य पालन व डेअरी मंत्रालया अंतर्गत येणाऱ्या केंद्रीय कुकुट विकास संस्थेमध्ये विविध पदांसाठी भरतीची जाहिरात प्रकाशित करण्यात आली असून यासाठी इच्छुक तसेच पात्र उमेदवारांकडून ऑफलाइन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत.

व्हाट्सअप ग्रुप जॉईन व्हा
टेलिग्राम ग्रुप जॉईन व्हा

ही भरती गोरेगाव मुंबई या ठिकाणी असणार आहे तुम्ही सुद्धा या पदभरतीसाठी इच्छुक असाल तर जाहिरात प्रसिद्ध झाल्यापासून 30 दिवसाच्या आत ऑफलाईन अर्ज पोहोचतील या बेताने पाठवायचे आहेत.

पदांचा तपशील

पोल्ट्री अटेंडंट – 05 जागा (प्रवर्गनिहाय माहितीसाठी मूळ जाहिरात पहावी)

शैक्षणिक पात्रता (Education for CPDO Mumbai Bharti 2024)

मान्यताप्राप्त विद्यापीठातून दहावी उत्तीर्ण आवश्यक किंवा समकक्ष अर्हता धारण केलेली असावी तसेच पोल्ट्री फार्मिंग मधील सहा महिन्याचा अनुभव असलेल्या उमेदवाराला या ठिकाणी प्राधान्य दिले जाणार आहे.

व्हाट्सअप ग्रुप जॉईन व्हा
टेलिग्राम ग्रुप जॉईन व्हा

वयोमर्यादा

अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय कमीत कमी 18 वर्षे व जास्तीत जास्त 27 वर्षापर्यंत असावे, महाराष्ट्र शासनाच्या नियमानुसार राखीव संवर्गासाठी आरक्षण देण्यात आले असून सविस्तर माहिती मूळ जाहिरातीमध्ये नमूद करण्यात आलेली आहे.

अर्ज करण्याची पद्धत

इच्छुक तसेच पात्र उमेदवाराने जाहिरातीमध्ये नमूद दिलेला अर्जाचा विहित नमुना A4 पेपर वर डाऊनलोड करून व्यवस्थित रित्या भरावा आणि खाली नमूद केलेल्या पत्त्यावर पाठवावा.

अर्ज करण्याची शेवटची तारीख

इच्छुक तसेच पात्र उमेदवारांनी ऑफलाइन पद्धतीने अर्ज करायचे आहेत हे अर्ज जाहिरात प्रकाशित झाल्यापासून 30 दिवसाच्या आत सादर करायचे आहेत जाहिरात 18 जुलै 2024 रोजी प्रकाशित करण्यात आली असून यासाठी शेवटची तारीख 17 ऑगस्ट 2024 ही असणार आहे.

अर्ज पाठवण्याचा पत्ता

इच्छुक तसेच पात्र उमेदवारांनी व्यवस्थितरित्या भरलेल्या अर्ज सेंट्रल पोर्टी डेव्हलपमेंट ऑर्गनायझेशन, आरे मिल्क कॉलनी, गोरेगाव, मुंबई – 400065 या ठिकाणी पाठवायचे आहेत.

निवड प्रक्रिया (Selection Process of CPDO Mumbai Bharti 2024)

प्राप्त झालेल्या अर्जाचे पडताळणी करून पात्र असलेल्या उमेदवारांना लेखी परीक्षेसाठी बोलवण्यात येईल त्यानंतर मुलाखतीद्वारे उमेदवाराची निवड केल्या जाईल, मुलाखती दरम्यान उमेदवाराच्या कागदपत्राची तपासणी केल्या जाणार आहे यासाठी उमेदवाराने मूळ कागदपत्रे व एक छायांकित प्रत सोबत न्यावी.

उमेदवारासाठी सूचना

  • अर्ज सादर करण्या अगोदर उमेदवारांनी संपूर्ण जाहिरात व्यवस्थितरीत्या वाचावी आणि त्यानंतरच अर्ज सादर करावा.
  • उमेदवाराची निवड लेखी परीक्षा तसेच मुलाखती द्वारे घेतल्या जाणार आहेत परीक्षेला किंवा Important CPDO Mumbai Bharti 2024 येताना सर्व खर्च उमेदवाराला स्वतः करायचा आहे.
  • कायमस्वरूपी पदांसाठी ही भरती असून यासाठी दोन वर्षाचा प्रोबेशन पिरेड उमेदवाराला लागू असणार आहे.

मूळ जाहिरात व अर्जाचा नमुना : डाउनलोड करा

नवीन अपडेटेड जॉब्स पहा

NMMC Bharti 2024 : नवी मुंबई महानगरपालिकेत विविध पदांसाठी भरती; पगार 64551 रुपये