DBSKKV Bharti 2025 : कृषी विद्यालय दापोली अंतर्गत वस्तीगृह विभागात चौथी व आठवी पास वर काही पदे भरण्यासाठी जाहिरात प्रकाशित करण्यात आली असून यासाठी इच्छुक तसेच पात्र उमेदवारांकडून आवश्यक कागदपत्रासह जाहिरातीमध्ये दिलेल्या नमुन्यात ऑफलाइन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत.
उमेदवाराने जाहिरात पूर्णपणे वाचून पात्र असाल तर जाहिरातीमध्ये दिलेल्या विहित नमुनात कृषी महाविद्यालय दापोली वस्तीगृह विभाग या ठिकाणी अर्ज सादर करायचे आहेत.
पदांचा तपशील व इतर माहिती
या ठिकाणी वाहन चालक हे पद भरले जाणार असून यासाठी इयत्ता आठवी पास किंवा जड वाहन चालवण्याचा सक्षम प्राधिकार्याने दिलेलं परवाना किंवा इयत्ता चौथी पास व वाहन चालवण्याचा सक्षम प्राधिकरनाणे दिलेला परवाना सह पाच वर्षे जडवाहन करण्याचा अनुभव अथवा या विद्यापीठात सेवेत वाहन चालक म्हणून तात्पुरत्या रोजंदारी स्वरूपात काम करीत असलेल्या दहा वर्षे किंवा त्याहून जास्त अनुभव तसेच जड वाहन चालवण्याचा सक्षम प्राधिकरण दिलेला परवाना असल्यास तुम्ही अर्ज करू शकणार आहात.
या पदाभरती मध्ये निवड झालेल्या उमेदवारांना दरमहा पंधरा हजार रुपये एवढे वेतन दिले जाणार आहे, उमेदवाराचे वय 38 वर्षापेक्षा जास्त नसावे, अनुसूचित जाती जमातीच्या अर्जदारांना नियमानुसार वयाच्या मर्यादेमध्ये सवलत दिली जाईल.
अर्ज कसा करावा
जाहिरातीमध्ये दिलेल्या अर्ज सोबत सविस्तर माहिती भरून कृषी महाविद्यालय दापोली वस्तीगृह विभाग (DBSKKV Bharti 2025) या नावाने व त्यांच्या कार्यालयात 03 जानेवारी 2025 पूर्वी अर्ज पोहोचतील अशा प्रकारे पाठवायचे आहेत त्यानंतर आलेले अर्ज विचारात घेतले जाणार नाहीत याची नोंद घ्यावी.
वाहन चालक पदासाठी अर्ज असा ठळक अक्षरात नमूद करावा, उमेदवाराची निवड मुलाखतीद्वारे व प्रात्यक्षिक परीक्षेद्वारे होणार आहे उमेदवाराने मुलाखतीला येताना अर्ज सोबत जोडलेल्या सर्व प्रमाणपत्राच्या मूळ प्रति सोबत ठेवाव्यात मुलाखतीसाठी कोणते भत्ता महाविद्यालयातर्फे दिले जाणार नाही याची उमेदवाराने नोंद घ्यावी.
उमेदवारांसाठी सूचना
नियुक्त केलेल्या उमेदवारास सहयोगी अधिष्ठाता, कृषी विद्यालय दापोली यांच्यामार्फत मूल्यमापन करण्यात येईल सदर उमेदवाराचे कामाला असमाधानकारक आढळल्यास करण्यात आलेली नियुक्ती दिलेल्या कालावधीच्या आधी समाप्त करण्याचे अधिकार सहयोगी अधिष्ठाता यांना असतील.
निवड झालेल्या उमेदवारास डॉक्टर बा.सा. कोकण कृषी विद्यापीठ दापोली या कार्यालयात कायमस्वरूपी नोकरी मिळण्यासाठी कोणताहि अधिकार नाही. उमेदवाराला नोकरी सोडायची असल्यास त्यांनी तसे एक महिना पूर्वी कळविण्यात यावे तसे न केल्यास त्याचे एक महिन्याचा पगार कापून घेण्यात येईल.
तुम्ही सुद्धा या पदभरतीसाठी इच्छुक असाल तर जाहिरातीमधील अर्जचा नमुना व्यवस्थित रित्या भरून 3 जानेवारी 2025 पर्यंत सादर करावा वर नमूद केलेली माहिती अपूर्ण असू शकते उमेदवाराने अर्ज सादर करण्या अगोदर सविस्तर जाहिरात वाचावी व त्यानंतर राज्य सादर करावे.