India Post Payment Bank Loan : भारतीय टपाल खात्याअंतर्गत चालवण्यात येणारी बँक म्हणजे इंडिया पोस्ट पेमेंट बँक या बँकेमध्ये तुम्हाला विविध प्रकारच्या सुविधा दिल्या जातात. त्याच्यामध्ये सेविंग अकाउंट, करंट अकाउंट, आधार अपडेट किंवा इतर ठेवी यांसारख्या गोष्टी तुम्ही पोस्ट पेमेंट बँकेमध्ये जाऊन करू शकता.
त्यांच्या वेगवेगळ्या प्रॉडक्ट सोबतच वेगवेगळ्या सर्विसेस सुद्धा ही बँक तुम्हाला देऊ करते यासोबतच ही बँक इन्शुरन्स आणि कर्ज सुद्धा देते कर्जामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे कर्ज तुम्हाला मिळतात.
या कर्ज प्रकारात होम लोन, लोन अगेन्स्ट प्रॉपर्टी, वेहिकल लोन, गोल्ड लोन, पर्सनल लोन, किसान क्रेडिट कार्ड लोन, बिझनेस लोन सुद्धा दिले जाते. या पोस्ट पेमेंट बँकेचा विविध बँकासोबत टाय-अप आहे.
यामध्ये आधार हाऊसिंग, ॲक्सिस बँक, एचडीएफसी बँक, होम फर्स्ट बँक, महिंद्रा फायनान्स सोबत इंडिया पोस्ट पेमेंट बँकेचा टाय-अप आहे. या अंतर्गत ही बँक वेगवेगळ्या प्रकारच्या कर्जाचा पुरवठा करते.
तुम्हाला जे लोन हवे असेल ते लोन या बँकेकडून तुम्ही घेऊ शकता हे कर्ज घेण्यासाठी तुम्हाला खाली लिंक दिलेल्या आहेत त्या लिंक वर जाऊन सर्व प्रक्रिया फॉलो करायची आहे.
कर्ज घेण्याची प्रक्रिया
सगळ्यात अगोदर दिलेल्या लिंकवर जायचं आहे त्या लिंक वर गेल्यानंतर इतर प्रोडक्स मध्ये लोन रेफरल सर्विसेस हा पर्याय निवडायचा आहे.
तिथे गेल्यानंतर तुम्हाला लोनचे वेगवेगळे पर्याय दिसतील त्यामधून तुम्हाला कोणतं लोन घ्यायचा आहे त्याची डिटेल्स तुम्ही पाहू शकता.
कोणत्या प्रकारचे लोन आहे त्यावर किती व्याज दर येणार आहे याची माहिती कर्जाच्या समोर दिली आहे, तुम्हाला ज्या बँकेमार्फत कर्ज घ्याचे आहे तुम्ही त्या बँकेचे निवड करायची आहे.
बँकेची निवड केल्यानंतर अप्लाय नाऊ या बटनाला क्लिक करायचं आहे अप्लाय नाऊ या बटनाला क्लिक केल्यानंतर आवश्यक असलेली सर्व माहिती भरायची आहे.
या माहितीमध्ये तुमचं नाव असेल, मोबाईल नंबर असेल, ईमेल आयडी असेल, पत्ता असेल, जवळचे पोस्ट ऑफिस असेल हे सगळे माहिती भरून तुम्हाला त्यांच्या अटी व शर्तीला मान्य करून टेक्स्ट वेरिफिकेशन कोड टाकून सबमिट या बटनाला क्लिक करायचं आहे .
एवढे सगळे माहिती भरल्यानंतर तुम्हाला इंडिया पोस्ट पेमेंट बँकच्या अधिकाऱ्याकडून कॉल येईल व त्यानंतर तुम्ही कर्जाचे पुढची प्रक्रिया पार पाडू शकता.