महाराष्ट्र शासनाकडून 10000 युवक-युवतींना परदेशात नोकरीची संधी; कमीत कमी 10 वी पास आवश्यक | Jobs in Maharashtra

Jobs in Maharashtra for Germany : जर्मनीतील बाडेन-वुटेनबर्ग या राज्यास महाराष्ट्रातील विविध क्षेत्रातील उपलब्ध कुशल मनुष्यबळ पुरवण्याबाबतच्या पथदर्शी प्रकल्पास मान्यता मिळालेली आहे. युरोपीय युनियन मधील बहुतांश देश औद्योगिकदृष्ट्या संपन्न आहेत तथापि मागील काही वर्षापासून या देशांना कुशल मनुष्यबळाची कमतरता भासत आहे.

व्हाट्सअप ग्रुप जॉईन व्हा
टेलिग्राम ग्रुप जॉईन व्हा

महाराष्ट्र राज्यात विविध क्षेत्रातील कुशल मनुष्यबळ मोठ्या प्रमाणात उपलब्ध आहे या मनुष्यबळासाठी एकतर तुलनेने रोजगाराच्या संधी कमी प्रमाणात उपलब्ध आहेत शिवाय जे काही रोजगार उपलब्ध आहेत त्यातून समाधानकारक अर्थार्जन होत नसल्याचे दिसून आले आहे.

राज्यात उपलब्ध असलेल्या कुशल मनुष्यबळाचा पुरवठा युरोपीय युनियन मधील देशांना करता यावा व त्यायोगे त्यांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्यात येऊन त्यांचे जीवनमान उंचावण्यास मदत व्हावी आणि दोन्ही देशांमधील संबंध सुदृढ होतील व अनेक सशक्त सामाजिक व आर्थिक बदलांची सुरुवात जागतिक स्तरावर होऊन मोठ्या प्रमाणात परकीय चलन व तंत्रज्ञान प्राप्त होईल हा शासनाचा दृष्टिकोन आहे.

यासाठी माननीय मंत्री (शालेय शिक्षण) यांच्या अध्यक्षतेखाली या विभागाच्या दिनांक 31.5.2023 रोजीच्या संदर्भ क्रमांक १ येथील शासन निर्णयान्वये कृतीदलाचे गठन करण्यात आले होते. या कृतीदलात या विभागाबरोबरच उच्च व तंत्र उद्योजकता, उद्योग, कृषी व वैद्यकीय शिक्षण या विभागांच्या मा. मंत्री महोदयांचा व सचिवांचाही समावेश आहे.

व्हाट्सअप ग्रुप जॉईन व्हा
टेलिग्राम ग्रुप जॉईन व्हा

कुशल मनुष्यबळाचा पुरवठा करण्यासाठी कार्यपद्धती निश्चित करण्याची जबाबदारी या कृतीदलाकडे सोपवण्यात आली होती. सन 2015 मध्ये जर्मनीतील बाडेन -वूटेनबर्ग या राज्याशी सिस्टर्स स्टेट रिलेशनशिप अंतर्गत महाराष्ट्र राज्याने कौशल्य वृद्धीबाबत सामंजस्य करार केला असल्याची पार्श्वभूमी विचारात घेऊन व या राज्याची कुशल मनुष्यबळाची मोठी गरज विचारात घेऊन त्या राज्यास कुशल मनुष्यबळाचा पुरवठा करणे उचित ठरेल या विचारांती कृतीदलाने त्या दृष्टीने प्रयत्न केले.

यासाठी दोन्ही बाजूच्या बैठका संपन्न झाल्या बाडेन -वूटेनबर्ग या राज्याशी सामंजस्य करार करण्यास परवानगी देण्याबाबतचा प्रस्ताव केंद्र शासनाच्या परराष्ट्र व्यवहार मंत्रालयात सादर करण्यात आला व त्यांच्या मान्यतेनंतर दोन्ही राज्यातील प्रमुख पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत दिनांक 25.2.2024 रोजी सामंजस्य करार करण्यात आले.

अर्ज कोणी करावा ?

  • महाराष्ट्र शासनाच्या शालेय शिक्षण व क्रीडा विभागामार्फत शालेय शिक्षण व क्रीडा विभाग, शासन निर्णय क्र.कौशल्य २०२४/प्र.क्र.५१/एसडी-६, दि.११ जुलै,२०२४.नुसार आयोजित जर्मन भाषा प्रशिक्षण तसेच त्यानंतर आयोजित होणारे आवश्यक कौशल्यवृद्धी प्रशिक्षण घेऊ इच्छिणाऱ्या उमेदवारांनीच सदरील अर्ज भरावा.
  • अंतिम निवड झाल्यानंतर आपणास बाडेन- वुटेनबर्ग राज्यात रोजगारासाठी शासन निर्णयातील नमूद 30 कौशल्यांनुसार काम करण्याकरिता महाराष्ट्र शासन आणि जर्मनी देशातील बाडेन वुटेनबर्ग यांच्या मार्गदर्शक तत्वे,कायदे,नियम आणि सूचनांचे पालन करावे लागेल.
  • शासन निर्णयात नमूद केल्यानुसार 30 कौशल्याधारित व्यवसायासाठी महाराष्ट्र राज्यातील अनुरूप व्यावसायिक पात्रता धारण केलेले उमेदवारच सदर अर्ज भरू शकतात.
  • सदर योजनेत सामील होण्यास इच्छुक उमेदवारांनी जर्मनी देशातील बाडेन-वुटेनबर्ग राज्यात किंवा जर्मनीमध्ये नोकरी मिळेलच असे ग्राह्य धरू नये. याकरिता उमेदवाराने जर्मन भाषेचे आवश्यक प्रमाणपत्र मिळविणे, शासन निर्णयातील नमूद कौशल्य विकास अभ्यासक्रम पूर्ण करणे व रोजगार भरती संदर्भातील एजन्सी /संस्था द्वारे घेतलेल्या परीक्षांमध्ये निवड होणे आवश्यक असेल.
  • रोजगाराकरिता जर्मनी देशातील बाडेन-वुटेनबर्ग या राज्यात जाण्याकरिता, व्हिजा मिळविण्याकरिता तसेच त्या ठिकाणी स्थायिक होण्याकरिताच्या सोयी अर्जदारास उपलब्ध करून देण्यासाठी महाराष्ट्र शासन आणि जर्मनी देशातील बाडेन-वुटेनबर्ग राज्य यांच्या समन्वयाने संपूर्ण सहकार्य करेल.
  • शासननिर्णयात नमूद 30 कौशल्यांसाठी व जर्मन भाषा कौशल्यांचे स्तरनिहाय प्रमाणपत्र वरील तक्त्याप्रमाणे अभ्यासक्रमाच्या अपेक्षित कालावधीत पूर्ण करणे आवश्यक आहे.
  • जर्मन भाषेचा स्तरनिहाय अभ्यासक्रम पूर्ण केल्यानंतर अर्जदाराने संबंधित कंपनीच्या अथवा राज्याच्या स्थानिक गरजेनुसार/मागणीनुसार आवश्यक निवासी तांत्रिक अभ्यासक्रम अंदाजे (०-४ महिन्याचा ) पूर्ण करणे आवश्यक आहे.
  • सदर कौशल्याच्या फरकावर आधारित निवासी अभ्यासक्रम उपलब्ध करून देणाऱ्या संस्थांची व अभ्यासक्रम कालावधीची यादी लवकरच प्रसिद्ध केली जाईल व प्रत्येक जिल्ह्यात असे केंद्र उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न केला जाईल.
  • उमेदवारास अधिक माहितीसाठी काही वेबसाइट्स, व्हिडिओ आणि कामाच्या स्वरूपाबाबत लिंक्स ईमेलवर पाठवल्या जातील.
  • या संपूर्ण प्रक्रियेच्या प्रत्येक टप्प्यावर सर्व मूळ कागदपत्रांची पडताळणी केली जाईल.
  • नोकरीसाठीच्या भरती प्रक्रियेच्या वेळी इतर आवश्यक कागदपत्रांसह जर्मन शासनाच्या नियमानुसार पोलीस विभागाचे चारित्र्य प्रमाणपत्र आणि नोंदणीकृत वैद्यकीय व्यावसायिकाकडून मागील तीन महिन्यातील असलेले वैद्यकीय प्रमाणपत्र उमेदवारास सादर करणे आवश्यक असेल.
  • अर्ज सादर करीत असताना विशिष्ट कौशल्यावर आधारित कामाच्या अनुभवाविषयी स्वतंत्र माहिती अर्जामध्ये नमूद करावी. नमूद करण्यात आलेल्या माहितीच्या आधारेच उमेदवाराची निवड केली जाईल.
  • या संपूर्ण अभ्यासक्रमाच्या शुल्काची जबाबदारी महाराष्ट्र शासन उचलणार असून अभ्यासक्रमाच्या कुठल्याही टप्प्यावर उमेदवाराकडून कोणतेही शुल्क आकारले जाणार नाही परंतु अनुत्तीर्णतेमुळे द्याव्या लागणाऱ्या जर्मन भाषेच्या फेरपरीक्षांचे शुल्क अर्जदारांना द्यावे लागेल गांभिर्य न दाखविणारे अर्जदार कायमस्वरूपी वगळण्यात येतील.
  • सदर अभ्यासक्रमासाठी निवड करण्यात आलेल्या उमेदवाराच्या पहिल्या प्रवासाचा प्रवास खर्च देखील करण्याचा प्रस्ताव महाराष्ट्र शासनाच्या विचाराधीन आहे.
  • शासकीय निधीचा अपव्यय टाळण्यासाठी जे उमेदवार खरोखर इच्छुक आणि पात्र आहेत त्यांनीच हा खालील अर्ज भरावा ही विनंती.

जर्मनी देशात नोकरीसाठी अर्ज करण्यासाठी : येथे क्लिक करा

जिल्हा परिषद नंदुरबार येथे विविध पदांसाठी भरती; पगार 40000 ते 60000 रुपये | ZP Nandurbar Recruitment