Legrand Scholarship 2024 : लीग्रँड ग्रुप इंडिया तर्फे लीग्रँड इम्पॉरिंग स्कॉलरशिप प्रोग्राम 2024-25 मध्ये स्कॉलरशिप देण्यासाठी बी टेक व इतर अंडरग्रॅज्युएट पदविकांसाठी प्रवेश घेतलेला उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत.
यामध्ये अभियांत्रिकी तसेच इतर पदवी साठी शिक्षण घेत असलेले विद्यार्थी या ठिकाणी अर्ज करू शकणार आहेत, बीएससी बीकॉम जर तुम्ही करत असाल तर तुम्ही प्रवेश घेतलेल्या कोर्सच्या 60% रकमेपर्यंत येथे शिष्यवृत्ती दिल्या जाणार आहे.
ही रक्कम कमीत कमी 60 हजार रुपये व जास्तीत जास्त एक लाखापर्यंत मिळू शकते विद्यार्थ्यांच्या (Legrand Scholarship 2024) शालेय प्रगतीनुसार ही शिष्यवृत्ती त्यांना दिली जाते.
ही शिष्यवृत्ती फक्त मुलींसाठी असून ज्या मुली वर दिलेल्या पदवीचे शिक्षण घेत असतील अशा मुलींना लीग्रँड इम्पॉरिंग स्कॉलरशिप प्रोग्राम तर्फे देण्यात येते अपंग व कोविड आफ्फेक्टेड विद्यार्थ्या असतील तर त्यांच्यासाठी ही रक्कम एक लाखापर्यंत वाढवली जाऊ शकते.
अर्ज कोण करू शकते
- भारतामध्ये राहणाऱ्या व पदवीचे शिक्षण घेणाऱ्या मुली.
- विद्यार्थ्यांनीने बारावी मध्ये दहावी मध्ये कमीत कमी 70 टक्के गुण प्रदान केलेल्या असावे.
- 2023-24 मध्ये बारावी पास झालेल्या असावी व कुटुंबाचे उत्पन्न पाच लाखापेक्षा जास्त नसावे.
शिष्यवृत्ती चे फायदे (Legrand Scholarship 2024)
तुम्ही कोणत्याही पदवी अभ्यासक्रमाला प्रवेश घेतलेला असेल किंवा शिकत असाल तर या ठिकाणी अर्ज करू शकणार आहात, तुम्ही भरत असलेल्या फि च्या 60% रक्कम व जास्तीत जास्त 60 हजार रुपये रक्कम दरवर्षी विद्यार्थिनींना पदवीचे शिक्षण पूर्ण करण्यासाठी दिल्या जाते.
आवश्यक कागदपत्रे
अर्ज करतेवेळी उमेदवाराने खालील कागदपत्रे जोडणे आवश्यक आहे
- फोटो सहित ओळखपत्र
- वयाचा पुरावा यामध्ये जन्म प्रमाणपत्र, आधार कार्ड, पासपोर्ट, दहावीचे प्रमाणपत्र जोडू शकता.
- पत्त्याचा पुरावा आधार कार्ड, आधार कार्ड नसेल तर इतर कागदपत्रांमध्ये बँकेचे पासबुक, गॅसचे बिल व मतदान कार्ड चालेल.
- उत्पन्नाचा पुरावा किंवा फॉर्म 16 व बँकेचे मागच्या सहा महिन्याचे स्टेटमेंट.
- अर्जदाराचे बँक डिटेल्स अर्जदाराचे बँक डिटेल नसेल तर पालकांची बँक डिटेल चालेल.
- पासपोर्ट साईज फोटो अर्जदाराचा.
- कॉलेजमध्ये किंवा विद्यापीठामध्ये प्रवेश घेतल्याचा पुरावा तसेच फी भरल्याचा पुरावा जोडावा.
अर्ज कसा करावा
- खाली लिंक दिलेली आहे त्या लिंक वर जाऊन तुम्ही अर्ज सादर करू शकता येथे गेल्यानंतर तुम्हाला जनरल कॅटेगरी एप्लीकेशन शोधावे लागेल.
- त्यामध्ये स्टार्ट अप्लिकेशन बटनला क्लिक करायचे आहे व्यवस्थित माहिती भरायचे आहे आवश्यक असलेले कागदपत्र भरायचे आहेत आणि टर्म्स अँड कंडिशन्स ला क्लिक करून प्रिव्ह या बटनाला क्लिक करायचं आहे.
- सर्व माहिती व्यवस्थित आहे का नाही चेक करायचे आणि त्यानंतर सबमिट या बटन क्लिक करून हा अर्ज सादर करायचा आहे.
लीग्रँड मार्फत 60000 शिष्यवृत्ती मिळवण्यासाठी : येथे क्लिक करा
हे हि वाचा…